कोल्हापूरमध्ये ज्योतिषी श्वेता जुमानी यांच्या विरोधात अंनिसच तीव्र आंदोलन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर अंकशास्त्रनुसार भविष्य सांगणाऱ्या श्वेता जुमानी यांच्या विरोधात कोल्हापूरात आंदोलन करण्यात आलंय. पुरोगामी कोल्हापूरातून श्वेता जुमानी चले जाव, आकड्याचा खेळ बंद कराच्या जोरदार घोषणा करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. आजपासून पुढचे दोन दिवस श्वेता जुमानी कोल्हापूरातील कदमवाडी रोडवरील एका हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्याच हॉटेलच्या समोर हातात लक्षवेधी पोस्टर … Read more

कोल्हापूरमधील केर्ली,सातार्डे येथील दोन खासगी सावकारांविरोधात गुन्हे दाखल

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सहकार विभागाने गेल्या आठवड्यात नऊ खासगी सावकारांची घरे, दुकाने आणि त्यांच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यापैकी दोघा खासगी सावकारांवर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. केर्ली (ता. करवीर) येथील शहाजी विलास पाटील आणि सातार्डे (ता. पन्हाळा) येथील विनायक सुभाष लाड यांचा यामध्ये समावेश आहे. २८ जानेवारी रोजी सहकार विभागाच्यावतीने … Read more

कोल्हापुरात दोन गटांत झालेल्या हाणामारीत झालेल्या खूनप्रकरणी एकाला जन्मठेप

कोल्हापूर- आरळे (ता. करवीर) येथील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पांडूरंग रामचंद्र देसाई (वय ५५) यांचा राजकीय वैमनस्यातून झालेल्या वादातून गोळीबार करून खून केल्याप्रकरणी आरोपी सुरेश भाऊसाहेब पाटील (वय ४३, रा. आरळे, ता. करवीर ) याला दोषी ठरवत कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. विठलानी यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली.

कोल्हापूरमध्ये कडवे गावातील जहागीर इनाम जमिनी तब्बल 65 वर्षानंतर ‘सरकार’च्या बंधनातून मुक्त

गगनबावडा तालुक्यातील मौजे कडवे गावातील जहागीर इनाम जमिनीवरील ‘सरकार हक्काची’ नोंद कमी करुन कायदेशीर वहिवाटदार/कब्जेदारांना वर्ग 2 या भूधारणा पध्दती प्रमाणे पुन:प्रदान करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. या आदेशाने कडवे ग्रामस्थांची 65 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. कोणत्याही मध्यस्थाशिवाय सर्व जमिनी (शर्तभंग झालेल्या जमिनी वगळून) शेत साऱ्याच्या 6 पट नजराणा रक्कम 15 दिवसात तलाठ्याकडे भरावी, असे आवाहन करुन या आदेशाची प्रत गावातील प्रत्येक घरात पोहचविण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोल्हापूरात पैशाच्या हव्यासापोटी मद्यपीचा खून

पैशाची गरज असल्याने टेंबलाई नाका येथील सैन्यदलाच्या जागेत झुडपात झोपलेल्या मद्यपी बंडी नागार्जुन (वय ३०, रा.वेलदूर, जिल्हा मेहबूबनगर, आंध्रप्रदेश) याच्या डोक्यात काठीचे फटके मारुन खून केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी संशयित अमीर दिलावर तहसिलदार (वय २६, रा. टेंबलाई नाका, रेल्वे फाटक) याला रात्री राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.

कोल्हापूरात म्हशीला कुत्रा चावल्यानं, रेबिजच्या धास्तीनं नागरिकांनी घेतली रुग्णालयात धाव

कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील शिये येथे एक म्हैस पिसाळलेल कुत्रा चावल्यानं चार दिवसांपूर्वी मृत्युमुखी पडली होती. वैद्यकीय अहवालातून त्या म्हैशीला रेबीज झाल्याचे समोर येताच, शिये गावातील ग्रामस्थांची घाबरगुंडीच उडाली. या म्हैशीचे दूध ज्यांनी घरी वापरले होते त्या शेकडो ग्रामस्थांनी रेबीजची लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती.

किनी टोलनाक्यावर पोलिसांवर गोळीबार, कोल्हापूरात भितीचे वातावरण

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर कोल्हापूर येथील किनीटोलनाका येथे आज गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. कोल्हापूर पोलीस आणि राजस्थान येथील २५ गुन्ह्यांत आवश्यक असलेले तीन आरोपी यांच्यात फायरींग झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेमुळे किनीटोलनाका आणि परिसरात काहीकाळ भितीचे वातावरण पसरले होते. हाती आलेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील २५ गुन्ह्यांत आवश्यक … Read more

सरसकट कर्जमाफीसाठी चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरात काढला हजारो शेतकऱ्यांसोबत धडक मोर्चा

राज्य सरकारने केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात भाजपनं कोल्हापूरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत विराट मोर्चा काढला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धडक मोर्चा कोल्हापूरच्या दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे. महाविकासआघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि शर्ती रद्द व्हाव्या आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी भाजपनं हजारो शेतकऱ्यांच्या समवेत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढला.

कोल्हापुरात शिवभोजन योजनेला सुरुवात; मंत्री सतेज पाटीलांनी शिवथाळीचा घेतला आस्वाद

राज्य सरकारच्यावतीने दहा रुपयात शिवथाळी हा उपक्रम राज्यात सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरात देखील झाली आहे. कोल्हापूर शहरात चार ठिकाणी हा उपक्रम आजपासून सुरू झाला आहे. गोर गरीब आणि गरजू नागरिकांना दहा रुपयात शिव थाळी देण्यात आलेली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं .

कोल्हापूर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिला ३१ जानेवारीपर्यंत जिल्हा बंदीचा आदेश

कोल्हापूर जिल्ह्यात विविध पक्ष,संघटनांनी पुकारलेला बंद तसेच प्रजासत्ताकदिनी विविध मागण्यांसंदर्भात संभाव्य आंदोलन लक्षात घेऊन अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जिल्ह्यात बंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये 31 जानेवारी 2020 पर्यंत जिल्ह्यात बंदी लागू करण्यात आली आहे.