‘त्या’ १७ वर्षीय मुलीची आत्महत्याच! पोलीस तपासात खुलासा

कोल्हापूर जिल्हयातील कसबा तारळे येथील एका १७ वर्षीय कॉलेज युवतीचा मृतदेह मंदीरात घंटेला बांधलेल्या आढळून आला होता. एक तरुणीचा संशयास्पद मृतदेह सापडल्याने परिसरासह जिह्यात एकच खळबळ उडाली होती. पोलीस चौकशीत मृतक तरुणीचे कौसर नासिर नायकवडी असं असल्याचे कळाले होते. या तरुणीचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला होता त्यानुसार प्रथमदर्शी या तरुणीने स्वतः गळफास लावून घेतल्याची शक्यता वर्तवली जात होती.

लग्नाचा बनाव करून व्यापाऱ्यास ६ लाखाचा गंडा, ७ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

एका उच्चशिक्षित तरुणीबरोबर लग्न लावण्याचा बनाव करत, बनावट पालक व खोटी कागदपत्रे तयार करून ७ जणांच्या टोळीने येथील एका कापड व्यापाऱ्याची सोने, चांदी आणि रोख रकमेसह ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कापड व्यापारी भैरूलाल शांतिलाल भंडारी (वय ३५, आझाद चौक) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रस्ता दुरुस्तीच्या कामांची ऋतुराज पाटील यांच्याकडून पाहणी

फुुलेवाडी रिंगरोड ते कळंबा साईमंदिर रिंगरोडवर नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे सुरु आहेत. या कामाची पाहणी गुरुवारी आमदार ऋतुराज पाटील व स्थायी समिती सभापती शांरगधर देशमुख यांनी संबधीत अधिकाऱ्यांसमवेत केली. सदरची फिरती स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी आयोजीत केली होती.

अखेर छत्रपती शिवाजी मार्केटमधील लिफ्ट सुरु! महापौर, उपमहापौर यांनी केले उदघाटन

महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ शिवाजी मार्केट येथील लिफ्ट गेले वर्ष भरापासून बंद होती. मात्र सदरची लिफ्ट गुरुवार पासून सुरु करण्यात आली. या नुतनीकरण करण्यात आलेल्या लिफ्टचे उद्घाटन आज महापौर ऍ़ड. सौ.सुरमंजिरी लाटकर व उपमहापौर संजय मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महापौर ऍ़ड. सौ.सुरमंजिरी लाटकर यांनी बोलताना ”या लिफ्टचे नुतनीकरण केल्यामुळे वयस्कर नागरिक, कर्मचारी यांना कार्यालयीन कामाकरीता चौथ्या मजल्यापर्यंत जाण्यास मदत होणार आहे. मागील एक वर्षा पासूनचा होत असलेला त्यांना त्रास हा कमी होण्यास मदत होणार आहे” असे सांगितले.

लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणं पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला भोवलं

लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सत्ताप्पा चौगुले असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा कर्मचारी राधानगरी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेत डाटा एंट्रीच काम करतो. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

साखर आयुक्तांचा ७ साखर कारखान्यांना दणका ! ‘एफआरपी’ची रक्कम न भरल्याने परवाने रोखले

शासकीय भागभांडवला सह शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’ची रक्कम न दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा गाळप परवाना साखर आयुक्तांनी रोखून धरला आहे. यातील बहुतांशी कारखान्यांनी गेल्या दोन ते तीन वर्षातील एफआरपी ची रक्कम दिलेली नाही. यामध्ये हलकर्णी मधील दौलत , हमीदवाडा मधील मंडलिक यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. तर विभागातील सात कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला नसल्याची माहिती समोर आली. यामध्ये कोल्हापूर मधील दोन आणि सांगलीतील तीन कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी या दोन्ही जिल्ह्यातून 38 कारखान्यांनी हंगाम घेतला होता. मात्र यावर्षी सांगली जिल्ह्यातील किमान तीन ते चार कारखाने सुरू होणार नसल्याचे वास्तव आहे.

‘आघाडी’चा एकही आमदार फुटणारचं नाही – सतेज पाटील

सत्तास्थापनेचा संघर्ष सुरू असताना काँग्रेसचे आमदार कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूरच्या काँग्रेस कमिटीत येऊन मतदार संघाचा आढावा आणि इतर कामकाजाला सुरवात केली आहे. राज्यातील चालू राजकीय घडामोडीवर सुद्धा कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असून जयपूर, मुंबई दौऱ्यानंतर आता काँग्रेस आमदारांची कोल्हापूरात चर्चा सुरू झाली आहे.

चंद्रकांतदादांकडून कोथरूडच्या जागेपायी कोल्हापूरचा पालापाचोळा

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने ‘सेना-भाजपा’ला चितपट करत जोरदार मुसंडी मारली आहे. ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूरचे पालकमंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचा गड सांभाळण्यात सपशेल अपयश आलं आहे. विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघात भाजपा- सेनेला धक्का देत काँग्रेस- राष्ट्रवादीने धक्कादायक विजय मिळवला आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या या विजयामुळे कोल्हापूर हा महाआघाडीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक दिग्गज मातब्बरांना पराभव पत्करावा लागला आहे.   

कोल्हापूर स्फोटाचा सखोल तपास सुरु; २०१४ ची पुनरावृत्ती झाल्यामुळे खळबळ

पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूरचा एंट्री पॉइंट समजल्या जाणाऱ्या उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असून सुद्धा घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक तपासणी करत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. 

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, जनसुराज्य खाते उघडणार? ‘भाजपा-सेने’साठी धोक्याची घंटा !

विधानसभेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वही १० जागांसाठी अत्यंत अटीतटीचे सामने आहेत. प्रचाराला अवघे दोन दिवस उरले असताना हळूहळू कल स्पष्ट होऊ लागला आहे. त्यानुसार आठ जागा लढविणारी शिवसेना जिल्ह्यात ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे तसेच दोनच जागा लढविणाऱ्या मित्रपक्ष ‘भाजपा’च्या दृष्टीने धोक्याची घंटा वाजत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात कोरी पाटी राहिलेल्या काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाने यावेळी खाते उघडण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील यंदा पूर्णपणे ताकद लावून टक्कर देण्याचे ठरवले आहे. यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांनी लक्षवेधी हवा निर्माण केली आहे. गेल्या निवडणुकीत दोन जागा जिंकत अब्रू राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यंदा पूर्णपणे ताकद लावली आहे.