कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ‘पोस्टल मतदान’ प्रक्रिया सुरू

विधानसभेसाठी कोल्हापुरातील शासकीय कर्मचारी, पोलीस,होमगार्ड,सुरक्षारक्षक यांच्या मतदानाची प्रक्रिया आज पार पडली. कोल्हापूरातील दहाही मतदान केंद्रासाठी हे मतदान झाले. सकाळी ११ ते ५ ही या मतदानाची वेळ होती. बॅलेट पेपरवर हे मतदान घेण्यात आले असून पोस्टल मते म्हणून ते नोंदवण्यात आले आहेत.

निवडणूक फक्त आठ दिवसांवर, उमेदवारांच्या पायांना भिंगरी!

आठ दिवसांवर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक, गतिमान प्रचार यंत्रणा आणि उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून वाड्या वस्तीवर राबवलेला प्रचार, हे सर्व चित्र सध्या संपूर्ण शाहूवाडी तालुक्यातील वाडी वस्तीवर पाहायला मिळत आहे. जोरदार प्रचार, जोडण्या, वाटाघाटी, फोडाफोडी जोडाजोडी अशा घटना ग्रामीण भागात गतिमान होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या रात्री जागु लागल्या आहेत. त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी आता ‘रात्रीस खेळ चाले..’ ही राजकीय जोडण्यांची मालिका पुढील आठ दिवस सुरू राहील.

राजू शेट्टी यांना मोठा धक्का; स्वाभिमानीचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये

कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान काटे यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे झालेल्या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला.

यंदाच्या नवरात्रोत्सव काळात अंबाबाईचे साडे दहा लाख भाविकांनी घेतले दर्शन

यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे, पर्यटक व स्थानिक साडेदहा लाख भाविकांनी दर्शन घेतले. मांगल्यपूर्ण वातावरण सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची सोमवारी खंडेनवमीच्या पूजेने सांगता झाली.मंगळवारी विजयादशमीनिमित्त अंबाबाईची रथात बसलेल्या रुपात सालंकृत पूजा बांधण्यात येणार आहे. सोमवारी, खंडेनवमी दिवशी अंबाबाई मंदिरातील पारंपरिक शस्त्रांचे पूजन करण्यात आले. देवीची आयुधे, परंपरागत शस्त्रांना अभिषेक करण्यात आला. लव्हाळे, झेंडूची फुले वाहण्यात आली. त्यानंतर काशी अन्नपूर्णा रुपात अंबाबाईची जडावी सालंकृत पूजा बांधण्यात आली.

‘मतदानातील नोटा पर्याय लोकशाहीला घातक’ – चंद्रकांत पाटील

आज ‘विजयादशमी’चा उत्सव देशभरासह राज्यभरात देखील मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर देश आणि महाराष्ट्रातील मान्यवर जनतेला शुभेच्छा देत आहेत. ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यावेळी मतदारांना दिलेल्या नोटा पर्यायाबाबत त्यांनी विवादित वक्तव्य केले.

महापालिकेच्या गाळ्यांचे भाडे ‘रेडी रेकनर’ प्रमाणेच – कोल्हापूर महापालिका

कोल्हापूर प्रतिनिधी। महानगरपालिकेच्या गाळ्यांचे भाडे आकारणी करण्याची तरतूद कायद्यामध्ये नमूद आहे. तसेच मुदतवाढी संदर्भातील शासन निर्णय कायद्यातील प्रक्रियेनुसार पारित झाला असून, सदर शासन निर्णय महानगरपालिकेवर गाळे धारकांवर बंधनकारक आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पाचवे कनिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश ए. एस. गरड यांनी गाळे धारकांचे दावे गुणदोषांवर नामंजूर केले आहेत. त्यामुळे गाळे धारकांना यापुढे … Read more

‘जेल’ मधून येणार कोल्हापूरच्या अंबाबाईचा लाडू प्रसाद

कोल्हापूर प्रतिनिधी । (स्पेशल रिपोर्ट) साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचे असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई या देवस्थानची जगभर ओळख आहे. ‘नवरात्र उत्सव’ म्हटलं की इथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. येत्या रविवारपासून नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे. या निमित्त देवस्थान समिती आणि श्री पूजकांची त्यांच्या पातळीवर तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे देवीच्या दर्शनासाठी … Read more

आंबा घाट खून प्रकरणामध्ये चार संशयितांना अटक

कोल्हापूर प्रतिनिधी। आंबा येथील कोंकण दर्शन पिकनिक पॉईंटवर गळा चिरून हत्या करण्यात आलेल्या खुनाचा छडा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण ने लावला आहे. दारू पिऊन सतत दशहत, शिविगाळ करणाऱ्या संतोष तडके याचा काटा सख्या भावानेच तिघा साथीदारांच्या साह्याने काढला असल्याची कबुली मुख्य सूत्रधार संशयित संजय शरद शेळगे यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी संजय … Read more

लॉटरी.. एकाच उमेदवाराला दोन पक्षांकडून उमेदवारी जाहीर

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘तिकिटासाठी केवढी मारामार चालते’ हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु, जिथे एक तिकीट मिळायला कठीण तिथे एकाच उमेदवाराला एकाच विधानसभा मतदारसंघासाठी दोन-दोन पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर काय म्हणाल? होय, हे खरंय!! करवीर विधानसभा मतदारसंघातून डॉ. आनंद गुरव यांना दोन पक्षांकडून उमेदवारीची ही लॉटरी लागली आहे. काल ‘आप’ने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत डॉ. आनंद … Read more

कोल्हापुरात पोलिसांच्या मारहाणीत हॉटेल कामगार गंभीर जखमी

कोल्हापूर प्रतिनिधी। शहरातील हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण करून लूटमार केल्याच्या संशयावरून एकाला चौकशीसाठी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन असलेल्या या मुलाला करवीर पोलिसांनी मारहाण केल्याची घटना आता उघडकीस आली आहे. दीपक झुलू शेळके असे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन हॉटेल कामगाराचे नाव असून झालेल्या मारहाणी त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचा आरोप सदर … Read more