परभणी जिल्ह्यात कलम १४४ ची मुदत १७ मे पर्यंत वाढविली; जिल्हाधिकाऱ्यांचे नव्याने आदेश

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ .चे कलम १४४ ची मुदत रविवार दि. १७ मे पर्यंत वाढविली असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आहेत. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयाने फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ च्या कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश जारी करण्यात … Read more

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी गावोगावी होणार ग्राम सुरक्षा दलाची स्थापना; परभणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार आहे. गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंद स्वतंत्र विहित नोंदवहीमध्ये वेळोवेळी करणे आणि प्रत्येक व्यक्ती अधिकृतपणे आणि सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीसह गावात प्रवेश करत आहे याची खात्री करण्यासाठी या ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात … Read more

कोरोनाच्या संकटकाळात वडी गावच्या महिला सांभाळत आहेत कायदा सुव्यवस्था, घेत आहेत आरोग्याची काळजी

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे महिलांनी मनात आणले तर त्या गाव कारभार अत्यंत शिस्तीने कशा पध्दतीने करू शकतात याचे ताजे उदाहरण कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन चालू असलेल्या लॉक डाऊन मध्ये पाथरी तालूक्यातील वडी गावात पहायला मिळत आहे. गावाचा कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस पाटील, कोतवाल, ही पदे मागील अनेक वर्षापासून रिक्त असल्याने ही जबाबदारी … Read more

जिल्ह्याबाहेर जाण्याऱ्या व्यक्तीस आरोग्य तपासणी बंधनकारक; परभणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

परभणी प्रतिनिधी । गजानन घुुंबरे देशभर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे विविध जिल्ह्यातील कामगार, पर्यटक,भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्ती इतर शहरांप्रमाणे परभणी जिल्ह्यातही अडकले आहेत. आता त्यांना परभणी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आरोग्य तपासणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. ही आरोग्य तपासणी जिल्ह्यातील निश्चित केलेल्या ठिकाणी जावून करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मुगळीकर … Read more

उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी केलीय? विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करा

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या व नौकरीस इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करावे. असे आवाहन परभणीचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. नौकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नांव नोंदणी केलेल्या … Read more

रेड झोनमधून परभणीत येण्यास ‘नो एंट्री ‘;अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल !

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे मुंबई , पुणे , ठाणे , औरंगाबाद , सोलापूर आणि इतर “ रेड झोन ” जिल्ह्यातील व्यक्तींना परभणी जिल्ह्यात प्रवेशाची परवानगी दिली जाणार नाही, तसे याबाबत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले असुन रेड झोन जिल्ह्यातील व्यक्तींनी जिल्ह्यात अनाधिकृतपणे प्रवेश केल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना १४ दिवस … Read more

केळीचे भाव घसरले; शेतकऱ्याने दोन एकर बाग केली भूईसपाट

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेती चे अर्थकारण बिघडत चालले असून उत्पादित मालाला भाव नाही , त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने ,परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्याकडे असणाऱ्या व काढणीस आलेल्या केळी पिकावर ट्रॅक्टर फिरवत हे पिक भूईसपाट केले आहे. पाथरी तालुक्यातील कासापुरी गाव शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात मागील अनेक वर्षापासून … Read more

‘त्या’ कोरोनाग्रस्त महिलेचा दफनविधी नांदेडमधेच; संपर्कातील 69 व्यक्तीचे स्वॅब निगेटिव्ह

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे सेलु शहरामधील दुर्धरआजारा सोबत कोरोनाबाधीत महिलेचा दोन दिवसापूर्वी नांदेड येथील शासकिय दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यु झाल्यानंतर, मयत महिलेचा दफनविधी नांदेड येथील दफनभूमीत करण्यात आल्याची माहीती नांदेड प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर सदरील मयत महीला रुग्णाच्या सहवासातील सेलु व परभणी येथील खाजगी रुग्णालयातील व इतर असे एकुण ७१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात … Read more

कोरोनाचे सावटात परभणीत ‘असा’ झाला महाराष्ट्र दिन साजरा

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला होता, तसे आदेश मागील आठवड्यात देण्यात आल्याने परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते जिल्हात फक्त एकाच ठिकाणी मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिनानिमित्य, शुक्रवार दि. १ मे रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय … Read more

सेलूतील महिलेला कोरोनाची लागण; शहरात तीन दिवसाची संचारबंदी घोषित

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यामध्ये बाहेरून आलेल्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे दोन आठवड्या पुर्वी निष्पन्न झाले होते. हा पेशंट आता ठणठणीत बरा झाल्यानंतर, पुन्हा उपचारासाठी बाहेरून आलेल्या सेलू येथील महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात पुन्हा चिंतेचे ढग दाटले आहेत. त्यामुळे सदरील रुग्ण राहत असलेला परिसर तीन किलोमीटरपर्यंत सील करत, सेलू शहरांमध्ये … Read more