आता परभणीमध्येच कोरोना संशयीत रुग्णांसाठी स्वॅब टेस्ट लॅब सुरु

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे | कोरोना रुग्ण स्वॅब तपासणी संदर्भात जिल्ह्यासाठी चांगली बातमी असून आता रुग्ण तपासणी अहवाल प्रतीक्षेची गरज भासणार नसून जिल्ह्याच्या ठिकाणी आता तपासणी लॅब सुरू करण्यात आली आहे. परभणी जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या पुढाकारातुन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिसोदीया पॅथोलॉजी लॅब यांच्या सहकार्याने … Read more

परभणीत रविवारी कोरोनाग्रस्त सापडण्याचा उच्चांक; एकाच दिवसात तब्बल १४ पॉझीटिव्ह

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे मागच्या आठवड्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन अंकी संख्येवर गेल्यानंतर काल सायंकाळी उशिरापर्यंत आकडा झपाट्याने वाढत गेला. शनिवार पर्यंत जिल्ह्यात बावीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या असताना रविवारी नांदेडहुन आलेल्या तपासणी अहवालानंतर रुग्णांची संख्या १४ ने वाढत आता ३६ वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान आणखी दोनशे रुग्णांचे स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित असल्याने … Read more

गोदावरीच्या पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू ; परभणीतील दुर्देवी घटना

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील गोदावरी पात्रात मध्ये आज झालेल्या एका दुर्दैवी घटनेमध्ये हे दोघा बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे . पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथे ही दुर्घटना घडली आहे . मर्डसगाव येथील दोन बालके सकाळी अकराच्या सुमारास गोदावरी पात्रातील पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी कृषी पंपाच्या पाणी उपसण्यासाठी खोदण्यात आलेल्या नदीपात्रातील … Read more

दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर परभणीत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे राज्यभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन मंडळाची बस सेवा बंद करण्यात आली होती. राज्यासह परभणी जिल्ह्यातही ही बस सेवा पूर्णपणे बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यावर आता जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्याचे महामंडळाचे आदेश आल्यानंतर, आज सकाळपासून परभणी जिल्ह्यातील बससेवा सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये जिंतूर , मानवत … Read more

चिंताजनक ! परभणीची रेड झोनकडे वाटचाल ; एकाच दिवसात सापडले नऊ कोरोनाग्रस्त रुग्ण

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे मागील चार दिवसांमध्ये सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांमूळे परभणी जिल्ह्याची वाटचाल वेगाने रेड झोनकडे होत आहे .आज आलेल्या स्वॅब अहवालातून नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्याचा कोरणा बाधित रुग्ण संख्येचा आकडा दोन अंकी संख्येवर गेलाय . त्यामुळे जिल्हा वासियांची धडधड वाढलीय .जिंतूर तालुक्यातील शेवडी गावांमध्ये एकाच दिवशी तीन जणांना … Read more

धक्कादायक ! परभणीत दोन दिवसाचे स्त्री अर्भक झाडाझुडपात फेकले; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे गावच्या बाहेर असणाऱ्या झाडाझुडुपांमध्ये सोमवारी सायंकाळी दोन दिवसाचे स्त्री अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अज्ञाता विरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेगाव येथील गाव शेजारी असणाऱ्या पांदण रस्त्याच्या परिसरात सोमवार १८ मे रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास मोकळ्या … Read more

परभणी दोन दिवसात दोन कोरोना बाधीत रुग्ण सापडले

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे ग्रामीण व शहरी भागात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने परभणीकरांची धडधड वाढली आहे. दोन्ही रुग्णांचे स्वॅब पॉझिटीव्ह आल्यानंतर रुग्ण सापडलेले गाव व परिसर सील करण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सदरील महिला सोनपेठ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. … Read more

परभणीत कोरोनाचा नवीन रुग्ण; मुंबईहून आलेल्या ५० वर्षीय महिला पॉझिटिव्ह

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणीकराणांसाठी धडधड वाढवणारी बातमी असुन जिंतूर येथील तीन कोरोना पॉजिटीव्ह नंतर आता परभणी शहरात आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. परभणी शहरात मुंबई येथून आलेल्या ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुंबईहून आल्यावर सदरील महिलेची तपासणी केल्यानंतर आता या तपासणी अहवालात महिलेला कोरोना असल्याचे … Read more

परभणी जिल्ह्यात कोरोनानंतर सारीचे नवे संकट; पन्नास वर्षीय मजुराचा मृत्यू

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पाठोपाठ आता नवीन संकट उभे राहिले असून शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झालेला मजुर व्यक्ती आज सकाळी सारी रोगाने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गंगाखेड परभणी रस्त्याचे काम करणारा एक पन्नास वर्षीय मजूर व्यक्ती ताप येत असल्याचे लक्षण असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील … Read more

परभणी पुन्हा ग्रीन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये; सापडले ३ नवीन कोरोनाग्रस्त

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये, तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ग्रीन झोन मध्ये असलेला परभणी जिल्हा आता, ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. मुंबई येथील पोलिस दलात कार्यरत असलेल्या, एका जवानांच्या कुटुंबीय, जिंतूर तालुक्यातील आपल्या (शिवडी या गावात ) गावी दोन दिवसापूर्वी आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची … Read more