भाजपसोबत युती करणार का ?? मनसेकडून मिळाले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढल्यामुळे भाजपची चांगलीच दमछाक होऊन भाजपला पराभवाचे तोंड पाहावं लागलं. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत देखील महाविकास आघाडी एकत्रच निवडणूक लढवण्याची शक्यता असून आता भाजप आणि मनसे देखील एकत्र येणार का असा प्रश्न समोर असताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेने अमराठी लोकांबद्दलच्या त्यांच्या भूमिकेत … Read more

शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर ; मनसेची जळजळीत टीका

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सुपारीबाज पक्ष असल्याची जहरी टीका शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली होती. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’ असल्याची जळजळीत टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसेनं जे केलं ते उघडपणे केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना ही धोकेबाज सेना … Read more

आपला मुख्यमंत्री, आपलं दुर्दैव, आपली जबाबदारी – मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या संबोधनातून त्यांनी कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी, पोस्ट कोव्हिडचे परिणाम यांसह अनेक विषयांवर मते मांडली. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर मनसेने जोरदार टीकास्त्र सोडलंय. बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली. … Read more

‘मनसे’च्या दणक्यापुढे जेफ बेझॉस नरमले ; अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये होणार ‘मराठी’ भाषेचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऑनलाईन डिजिटल शॉपिंग अॅप अ‍ॅमेझॉन मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. अॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस यांनी या मनसेच्या मागणीचा दखल घेतली आहे. डिजिटल सेवेत मराठीच्या समावेशासाठी आज मुंबईत अ‍ॅमेझॉनचे एक शिष्टमंडळ दाखल झाले असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहे. … Read more

हाथरस प्रकरणावरून राज ठाकरे संतापले ; केंद्र सरकारला केलं ‘हे’ आवाहन

Raj Thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटनेवरून देशभर निषेध केला जात आहे. अनेक राजकीय पक्षांनी यावरून उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हाथरसच्या घटनेवर निवेदन जारी केलं असून केंद्र सरकारलाही यात लक्ष घालण्याचं आणि उत्तर प्रदेशातील प्रशासनाला वठणीवर आणण्याचं आवाहन केलं आहे. ‘उत्तर प्रदेशातील … Read more

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरु झालेल्या वादावर राज ठाकरे, म्हणाले..

मुंबई । सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर मात्र, हिंदी सिनेसृष्टीत कलाकारांवर कसा अन्याय होतो. घराणेशाही कशी चालते या अशा सगळ्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत काही बातम्या समोर आल्या होत्या. ज्यामध्ये कलाकारांवर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशी काही वृत्त प्रसारित करण्यात आली. दरम्यान, या सगळ्यावर … Read more

ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी मनसेचे हॉर्न वाजवा आंदोलन

मुंबई । कोरोना संकट आणि त्यात लॉकडाऊमुळे डबघाईला आलेल्या वाहतूक व्यवसायाला पुन्हा उभारी मिळावी यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेने दंड थोपटले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरुन एका अभिनव आंदोलनाने राज्य सरकारला जागे करायचे आहे. शुक्रवार १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने फक्त १ मिनिट हॉर्न … Read more

”मी CAA ला समर्थन दिलेलं नाही”- राज ठाकरे

मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी घुसखोरांना हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.मात्र, आता राज यांनी याबाबत आता नवीन खुलासा करत मी सीएएला कधीही समर्थन दिलेलं नसल्याचं म्हटलं आहे.

मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा; मनसे हिंदुत्वाच्या वाटेवर..

मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा लावण्यात आली. मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा दिसून आल्यानं राज ठाकरे उजव वळण घेत हिंदुत्वाच्या वाटेवर आपली राजकीय वाटचाल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

”शिवसैनिकांनो मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन उद्या मुंबईत पार आहे. हे अधिवेशन मनसेला दिशा देणारं ठरणारं आहे. उद्याच्या अधिवेशनानंतर मनसे हिंदुत्ववादाची कास धरणार असल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतांना मसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसैनिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्याचं आवाहन केलं आहे. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा असं आवाहन करणारं ट्विट त्यांनी केलं आहे.