मनसेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पक्षाचा झेंडा गायब, उरलं केवळ इंजिन

मनसेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटरवरुनही मनसेचा झेंडा गायब झाला आहे. केवळ इंजिनाचा फोटो या दोन्ही प्रोफाईलवर दिसत आहे. यापूर्वी चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते.

राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र ; पंचायत समितीत भाजप – मनसे युती?

पालघर प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. राज ठाकरे आणि नरेंन्द्र मोदी एकाच बॅनरवर दिसल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत. लाव रे तो व्हिडिओ च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींविरोधात रान पेटवले … Read more

भारत धर्मशाळा आहे का?; राज ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई प्रतिनिधी | देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन पेटले आहे . यापार्श्वभूमीवर आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली . सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता … Read more

बुलेट ट्रेन बासनात गुंडाळायची हीच ती वेळ! मनसे आमदाराने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तब्बल एक महिन्यांच्या सत्ता नाट्यानंतर शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आली आहे. शिवसेनेने आता भाजपच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आणि मंजूर केलेल्या प्रकल्पाचे परीक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यात मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनसह राज्यातील अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुलेट ट्रेन संबंधी थेट आव्हान केलं आहे.

अगं अगं म्हशी, खड्डे सांभाळून जाशी..!!

कोल्हापुरात रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यांमध्ये खड्डेच खड्डे असल्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. या प्रश्नासाठी वारंवार मागणी करण्यात आली. तसेच वेळोवेळी यासाठी निदर्शनेदेखील करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून अदयाप हि ठोस पाऊले उचलले जात नाहीत. रस्त्यांच्या याच प्रश्नावरून आता ‘मनसे’  आक्रमक झाली आहे.

शरद पवारांचा मास्टरप्लान, भाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंना आणणार एकत्र

विशेष प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी अद्याप महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेले नाही. भाजप शिवसेना सत्तास्थापनेवरुन एकमेकांवर आखपाखड करत असताना मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशात राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा नवी मास्टरप्लान शरद पवार आखत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या … Read more

‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भात

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे सोमवारी विदर्भात प्रचाराला येत आहेत. सोमवारी, सकाळी ७.३० वाजता ते खासगी विमानाने नागपूर विमानतळावर येतील. विमानतळावर मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागताचा स्वीकार करून ते वणी येथे रवाना होतील.

‘रस्त्यांवर सभा घेऊ द्या!’ निवडणूक आयोगाला ‘मनसे’ विनंती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पावसामुळं रद्द झाल्यानंतर मनसेनं रस्त्यावर सभा घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसं पत्र मनसेनं राज्य निवडणूक आयुक्तांना लिहिलं आहे. पाऊस लांबला असून, मैदानांत चिखल होत आहे. त्यामुळं सभा घेण्यात अडचणी येत आहेत, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

पुण्यात मनसेला ‘राज’गर्जनेसाठी अखेर मैदान मिळालं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराला राज ठाकरे यांच्या सभेने प्रारंभ होणार असून बुधवारी (९ ऑक्टोबर) राज ठाकरे यांची सरस्वती मंदिर मैदानात संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे. या ‘राज’गर्जनेच्या माध्यमातून मनसे पुण्यातील विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. राज यांच्या सभेच्या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाकडून १ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतील मैदान सभेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. मात्र सभेला परवानगी नाकारण्यात आली.

चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढल्या ;मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा

पुणे प्रतिनिधी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा चंगच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला आहे. याच निर्धारातून काँग्रेस आघाडीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अद्याप देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कोथरूडचा उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मनसेला … Read more