काँक्रिट ट्रकच्या मिक्सरमध्ये बसून जात होते गावी; पोलीस सुद्धा पाहून झाले हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशव्यापी लॉकडाऊनमुळे,देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले स्थलांतरित कामगार त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या उपद्व्याप करीत आहेत. काहीजण चालत तर दुचाकीवरून आपल्या गावी जात आहेत. कमाल तर तेव्हा झाली जेव्हा काही कामगारांनी त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी चक्क काँक्रीट मिक्सरच्या टाकीमध्ये लपण्याचा प्रयत्न केला.मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच अडवले आणि ट्रक मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. … Read more

महाराष्ट्रातून युपीला सायकलवर चालला होता; वाटेत चक्कर येऊन पडल्याने झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रातून एक व्यक्ती सायकलवरून घराकडे जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बरवानी येथे या माणसाचा मृत्यू झाला.हा व्यक्ती भिवंडी, महाराष्ट्र येथून उत्तर प्रदेशला रवाना झाला होता.बरवानीचे एसडीएम जी धनगड यांनी सांगितले की, ‘तो बेशुद्ध अवस्थेत सापडला होता त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले मात्र … Read more

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  कणखर देशा, पवित्र देश, महाराष्ट्र देशा……’ आज १ मे महाराष्ट्र दिन. शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या या महाराष्ट्राने सदैव संकट समयी देशाचे नेतृत्व केले आहे. स्वातंत्र्याच्या वेळी लोकमान्य टिळकांच्या रूपाने असो की सामाजिक चळवळीत महात्मा फुलेंच्या रूपाने असो. १०५ हुताम्यांच्या बलिदानानंतर निर्माण झालेल्या या महाराष्ट्राने १९६० पासूनच सर्वच क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केलेले … Read more

शिव मंदिरात पुजा करायला नकार दिला म्हणुन साधूंना मारहाण!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील साधूंच्या हत्येनंतर मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील शिव मंदिराच्या महंतावर प्राणघातक हल्ला झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथे लॉकडाउनमुळे शिव मंदिरात पूजा करण्यास नकार दिल्यानंतर पूजेसाठी आलेल्या लोकांनी मंदिराच्या महंतावर लाठी-काठीने हल्ला केला.यावेळी महंतने सुटून कसाबसा आपला जीव वाचविला.माध्यमांच्या वृत्तानुसार ही घटना सोमवारी २७ एप्रिल रोजी घडली. सध्या … Read more

कृषी कर्जाचा व्याजदर शून्य टक्के करा; शरद पवारांची केंद्र सरकारला सूचना

कृषी कर्जाचा व्याजदर शून्य टक्के ठेवण्याच्या सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत.

राज्यात दिवसभरात कोरोनाचे ८११ नवीन रुग्ण; एकुण संख्या ७६२८ वर

मुंबई | महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७ हजार ६२८ वर पोहचली आहे. राज्यात आज एकाच दिवशी करोनाचे तब्बल ८११ नवीन रुग्ण आढळले असून आजवरचा २४ तासांतील करोना रुग्णसंख्येचा हा उच्चांक ठरला आहे. त्याचवेळी दिवसभरात करोनामुळे २२ जणांचा मृत्यू झाला असून या आजाराने आतापर्यंत ३२३ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने … Read more

कोल्हापूरात होम क्वारंटाईन असताना फिरणे पडले महागात, न्यायालयाने महिन्याची सुनावली शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  कोल्हापूर/ प्रतिनिधी- आरोग्य विभागाने हातावर शिक्का मारून 14 दिवस होम क्वारंटाईन केले असताना सुद्धा समाजात फिरणे, संसर्ग पसरविणे व लॉक डाऊन व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायद्याचा भंग केल्या प्रकरणी शिरोळ इथल्या धरणगुत्ती गावातील निखिल मोहन कळशे आणि गणेश आप्पासो कुंभार या दोघांना जयसिंगपूर न्यायालयाने एक महिण्याचा सश्रम कारावास आणि दोन हजार … Read more

पती पत्नीने लाॅकडाउनमध्ये खोदली २५ फुट खोल विहीर, २१ व्या दिवशी लागले पाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान घरात बसून काहीतरी नवीन करण्याचा विचार महाराष्ट्रातील एका जोडप्याने केला. गजानन पाकमोडे आणि त्यांच्या पत्नीने वाशिम जिल्ह्यातील कारखेडा गावात आपल्या घराच्या अंगणात २५ फूट खोल विहीर खोदली आहे. ही विहीर खोदण्यासाठी त्या दोघांना २१ दिवस लागले. यासंदर्भात गजानन म्हणाले की कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला घरातच राहावे लागेल, म्हणून … Read more

कोरोनामुळं राज्यावर आर्थिक संकट, बेरोजगारी वाढणार- शरद पवार

मुंबई । करोनामुळे राज्यावर अर्थसंकट येणार आहे. ते आलेलं आहे. शेतकऱ्यांना शेतातील माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. हे करोनाचे परिणाम एक ते वर्ष जाणवतील,’ असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हवरून संवाद साधला त्यावेळी … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २३३४ वर , कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा एका क्लिकवर

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे नवीन ३५२ रुग्ण सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात २३३४ कोरोनाबाधित आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये असून त्याखालोखाल पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात आज ३५२ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता २३३४ अशी झाली आहे. यापैकी २२९ कोरोना … Read more