महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  कणखर देशा, पवित्र देश, महाराष्ट्र देशा……’

आज १ मे महाराष्ट्र दिन. शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या या महाराष्ट्राने सदैव संकट समयी देशाचे नेतृत्व केले आहे. स्वातंत्र्याच्या वेळी लोकमान्य टिळकांच्या रूपाने असो की सामाजिक चळवळीत महात्मा फुलेंच्या रूपाने असो. १०५ हुताम्यांच्या बलिदानानंतर निर्माण झालेल्या या महाराष्ट्राने १९६० पासूनच सर्वच क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केलेले दिसते.

महाराष्ट्र कृषी, सहकार, उद्योग, पायाभूत सुविधा, पर्यटन, शिक्षण आदी अनेक क्षेत्रांत भरारी मारली आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, सामाजिक विकास आणि गुंतवणूक विषय सकारात्मक धोरणाची तुलना करता महाराष्ट्राचा देशातील अन्य राज्याशीच नव्हे तर अनेक देशांप्रमाणे पेक्षाही वरचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्राच्या प्रगतीत अनेक अडथळे आलेत. दुष्काळ, बॉम्बस्फोट , दहशतवादी हल्ले, महापूर मात्र महाराष्ट्राने या सर्वांवर मात करत आपली प्रगती चालूच ठेवली. इतकेच नव्हे तर संपूर्ण देशात अनेक पुरोगामी, क्रांतिकारी, लोकहिताचे कार्यक्रम राबविण्यात आपली आघाडी कायम ठेवली. रोजगार हमी योजना, ग्रामस्वच्छता अभियान, माहितीचा अधिकार, महिला आरक्षण असे अनेक निर्णय अगोदर महाराष्ट्राने घेतले नंतर ते देशपातळीवर स्वीकारले गेले. ही नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

महाराष्ट्राच्या राज्यकर्तेयांनी ही राज्याच्या हिताला चालना दिल्याचे दिसतेय. स्व.यशवंतरावानी शिक्षण, शेती, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला एक रोडमॅप आखून दिला. वसंतराव नाईकांनी हरितक्रांतीतुन राज्याला स्वयंपूर्ण केले. शंकररावानी प्रशासनावर वचक ठेऊन जनहीताची कामे केली. वसंतदादानी सहकार आणि शिक्षण क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवारांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला.

आर्थिक उदारीकरनांनंतरही महाराष्ट्रानी वित्त, माहिती तंत्रज्ञान,आदी क्षेत्रासाठी उच्चशिक्षित व कुशल मनुष्यबळाची उपलब्ध होण्याच्या बाबतीतही वृद्धी केली. अशा प्रकारे प्रगतीचा चालू असलेला हा रथ कायम चालू ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.

आज आपल्या महाराष्ट्र राज्याचा ६० वा वर्धापन दिन आहे. आज सद्य परिस्थिती मध्ये जागतिक आरोग्य संकट निर्माण झाल्यामुळे आजचा हा वर्धापनदिन आपण शांतपणे, साधेपणाने आणि नवीन संकल्प करून साजरा करूयात. व पुढे येऊ घातलेले आर्थिक संकट यातून आपले राज्य नक्की सावरेल व पुनः पहिल्या सारखी आनंदी स्थिती निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न करूयात. कारण सह्याद्री नेहमी हिमालयाच्या संकट समयी उभा असतो. म्हणूनच सेनापती बापट म्हणतात,
”महाराष्ट्रविना राष्ट्रगाडा न चाले.”
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा…!!

– अतुल मोरे ( मंठा)

Maharashtra Day 2018: Chronology of statehood of Maharashtra ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment