भाजपच्या काळात विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागील सरकारच्या काळात उद्योगांसाठी वीजदर जास्त होती. मात्र आपल्या सरकारने विदर्भाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रापेक्षा वीजदर ३ रुपयांनी कमी दिली याचाच परिणाम म्हणून त्यांनी विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती मधील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या ‘पैलवान’ वक्तव्यावरून जयंत पाटलांना हसू आवरेना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार प्रचार सभेत आपण तेल लावून लढाईसाठी तयार आहोत असे सांगत आहेत, मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळूदेत कि तेल लावलेला मुख्यमंत्री कसा दिसतो. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.

‘राहुल गांधींच्या सभा भाजपच्या जागा वाढवतात’, मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना उपरोधिक टोला

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना पाहून मला आनंद झाला. कारण राहुल गांधी जेव्हा प्रचार सभा घेतात. तेव्हा काँग्रेसच्या जागा कमी होतात. आणि भाजपच्या जागा वाढतात. असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वेचे भाजप सेना महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

‘मी नम्रच आहे शिवसेनेनं त्याचा बोध घ्यावा’;नारायण राणेंची शिवसेनेपुढे शरणागती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मानून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी केल्याचे चित्र दिसत आहे. मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा, असे राणे यांनी स्पष्ट केल. असे असले तरी सिंधुदुर्गात लढत मात्र शिवसेना विरुद्ध राणे अशीच होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरला लिंबू लावायला हवं, नेटकाऱ्यानी केलं ट्रोल

विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचारसभेसाठी फिरत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याची घटना पेणमध्ये घडली. या घटनेमुळे काही काळ गोंधळ उडाला. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या अधिकारी या अपघातातून सुखरुप बचावलेत.

राणे पिता पुत्रांसाठी मुख्यमंत्री कणकवलीत; शिवसेनेचा विरोध

कणकवलीत भाजप सेनेची युती नसतानाही नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १५ ऑक्टोबरला कणकवलीत सभा घेणार असल्याचे नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

कर्नाटकातून जतला कृष्णेचे पाणी देणार; अमित शहा यांची ग्वाही

म्हैसाळ, टेंभू योजनेसाठी भरीव निधी दिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा कायापालट झाला. जतला आता तुबची बबलेश्वर योजनेच्या माध्यमातून कर्नाटक शासनाकडून पाणी देण्यात येेईल, यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा व देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे, पाणी निश्चित मिळेल,’ अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांनी जत येथे बोलताना दिली.

आरे वृक्षतोड; संजय राऊत यांनी व्यंगचित्र शेयर करून फडणवीस यांच्यावर साधला निशाणा

मुंबई प्रतिनिधी। आरेतील वृक्षतोडी विरोधातील पर्यावरणवादींची याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. आरेमध्ये मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेसाठी २६४६ झाडे हटवण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी अवैध ठरवून रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात येत होती. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जवळपास चारशे हुन अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. … Read more

‘बंडखोरांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी। ‘दोन्ही पक्षात काही ठिकाणी बंडखोरी झाली असली तरी येत्या दोन दिवसांत सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावू. जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना युतीत कोणतंही स्थान राहणार नाही. त्यांना त्याची जागा दाखवून दिली जाईल’, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद … Read more

ज्योतीताई पाटील यांच्या उमेदवारीबाबत संजयकाकांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

सांगली प्रतिनिधी| कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खा.संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई यांना तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याबाबत आजपर्यंत खासदारांनी मौन पाळले होते. आता मात्र कार्यकर्त्यांच्या दबावामुळे खा.संजयकाका पाटील यांनी मतदार संघाची बदलती परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या कानावर घातली असून उमेदवारीबाबत ते कार्यकर्त्यांची बैठक लवकरच घेणार असल्याचे वृत्त आहे. ज्योतीताई … Read more