आता ट्रेनमध्ये खाली बर्थसाठी टीटीईच्या मागे हेलपाटे मारण्याची गरज नाही; रेल्वेने सुरू केली ‘ही’ नवीन सेवा

रेल्वेने प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये प्रवास करताना नवी सुविधा सुरु केली आहे. या नवीन सुविधेद्वारे आता तुम्हाला ट्रेनमध्ये कन्फर्म तिकिटे मिळवण्यासाठी मदत मिळणार आहे. या नवीन सुविधेनुसार भारतीय रेल्वेने आरक्षण चार्ट ऑनलाईन पाहण्याची सेवा सुरू केली आहे. आयआरसीटीसी वेबसाइटवर तुम्ही ट्रेनमधील बर्थचे स्टेटस पाहू शकता. पारदर्शकतेला चालना देण्यासाठी, रेल्वे मार्गाने चालू ट्रेनमधील रिक्त जागांविषयीची माहिती आता http://irctc.co.in/online-charts या संकेतस्थळावर प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

जाणून घ्या, तिकिटांची विक्री करुन रेल्वे किती पैसे कमवते? आरटीआयमधून समोर आली माहिती

प्रवासी तिकिटे विकून रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत उत्पन्न 400 कोटींची घट झाली आहे. तर, याच काळात मालवाहतुकीच्या माध्यमातून मिळणाऱ्या (रेल्वे महसूल) उत्पन्नात 2800 कोटींची वाढ झाली आहे. आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.

५० रेल्वे स्थानके, १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार

रेल्वे क्षेत्रातील खासगीकरणाला नीती आयोगाने गती दिली असून देशातील ५० रेल्वे स्थानके आणि १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार आहे. ही प्रक्रिया नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सचिव स्तरावरील उच्चाधिकार समिती पार पाडेल, असा निर्णय रेल्वे मंडळाने गुरुवारी घेतला.

मुंबईहुन पुण्याला सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द

thumbnail 15306277884591

मुंबई : मुसळधार पाऊसाने मुंबईतील जनजीवण विस्कळीत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेका पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. आज सलग पाचव्या दिवशीही जोरदार पाऊस बरसला आहे. पावसाच्या बरसण्याने मुंबईच्या सखल भागासह रेल्वे ट्रकवरही पाणी साचले आहे. तसेच दादर, हिंद माता परिसर, शीव परिसर या मुंबईच्या भागात तळ्याच्या स्वरूपात रस्ते बघाला मिळत आहेत. … Read more