सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे यांनी भाजप प्रवेश केल्यांनतर आपली ट्रेडमार्क असलेली कॉलर उडवली नाही, त्यामुळे भाजपमध्ये गेल्यावर राजेंना लगेचच शिस्त लागली की काय अशा चर्चा साताऱ्यात रंगू लागल्या होत्या. या चर्चाना संदर्भात उदयनराजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, मी कधीच बेशिस्त वागत नाही, प्रत्येक व्यक्तीचा वेगळा विचार असतो. प्रत्येकाला विचार मांडण्याचा हक्क आहे. त्यामुळे कॉलर उडवणे बेशिस्त आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘स्टाईल इज स्टाईल’, ती कायम राहणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबद्दलही त्यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की, ‘मी पवारांचा आज, काल आणि उद्याही आदर करतो. कोणीही माझ्याविरोधात उभा राहू दे त्याची मला भीती नाही. असं उदयनराजे म्हणालेत.
एक बारामती आणि दुसरा कराड असे जिल्हे बनवून सातारा जिल्हा संपुष्टात आणण्याचा त्यांचा डाव होता. तो मी हाणून पाडला आहे असं म्हणत उदयनराेंनी विरोधकांवर टीका केली. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी कुठलीच कामे करण्याचा प्रयत्न केला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.