मी आत्ताच मुख्यमंत्री आहे- इंदोरीकर महाराज

अहमदनगर प्रतिनिधी। भाजपची महाजनादेश यात्रा अहमदनगर जिल्ह्यात आली होती. या यात्रेच्या संगमनेर येथील सभेत किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी हजेरी लावली होती. त्यामुळ संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात इंदुरीकर महाराज यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र एका कीर्तनात संगमनेरमधून आपण निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा इंदुरीकर … Read more

महाराष्ट्रातील ‘हे’ गावे तेलंगणात सामाविष्ट करण्याची मागणी

नांदेड प्रतिनिधी | तेलंगणा राष्ट्र समिती सरकारच्यावतीने तेलंगणा राज्यात राबवण्यात येणा-या कल्याणकारी योजनेला प्रभावित होत तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील गावांमधील सरपंचानी ग्रामस्थांसह मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान तेलंगणा राज्याप्रमाणे कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सीमेलगत असलेल्या गावांमध्ये करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. त्याचबरोबर ही योजना लागू न केल्यास नांदेड जिल्ह्यातील … Read more

कणकवलीत नितेश राणे भाजपचे उमेदवार

सिंधुदूर्ग प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कणकवली मध्ये गेले असता स्वाभिमान पक्षाचे नेते  नारायण राणे यांनी त्यांचं स्वागत केले.  कणकवली मधील  महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष्याच्या कार्यालया समोर हे स्वागत करण्यात आल.  सोबतच नारायण राणे यांचे भाजप प्रवेश लवकर होणार असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघातील जागा देखील … Read more

आमदार सिद्धाराम म्हेत्रेंची भाजपा नेत्यांसोबत ‘चाय पे चर्चा’

सोलापूर प्रतिनिधी। सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेस राष्ट्रवादीमधून सेना भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे अन त्यात सर्वात आघाडीवर असणार नाव म्हणजे काँग्रेसचे अक्कलकोटचे विद्यमान आमदार सिद्धराम म्हेत्रे. स्थानिक भाजपा नेत्यांच्या विरोधामुळे या प्रवेश लांबणीवर पडला होता. मात्र, आज आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी बोलाविलेल्या ‘चाय पे चर्चा’ला तालुक्यातील भाजपा नेते उपस्थित होते. यामध्ये शिवशरण खेडगी, दत्ता तानवडे, … Read more

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल झालेली आहे. इस्लामपूर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या महाजनादेश यात्रेचे जल्लोषात स्वागत केले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात ही जनादेश यात्रा जाणार असून यासाठी भाजपाकडून जय्यत तयारीही करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर सुरू असलेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात दाखल झालेली आहे. इस्लामपूर येथे … Read more

अर्थमंत्री सीतारमन यांचे ‘ते’ वक्तव्य बेजबाबदारपणाचे – पृथ्वीराज चव्हाण  

पुणे प्रतिनिधी  |‘प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचे’ वक्तव्य गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी केलेल वक्तव्य हे बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ओला उबर चे नाव पुढे केले जात … Read more

खानापुरात लढण्यासाठी कॉंग्रेसकडून नवीन उमेदवार मैदानात?

संगली प्रतिनिधी | विटा-महाराष्ट्र राज्य कामगार काँग्रेसचे(इंटक)चे उपाध्यक्ष रवींद्र लक्ष्मणराव भिंगारदेवे हे खानापूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी करण्याच्या मनस्थितीत आहेत. भिंगारदेवे हे माजी आमदार ऍड लक्ष्मणराव तात्या भिंगारदेवे यांचे सुपुत्र आहेत. तात्यासाहेब भिंगारदेवे हे मातंग समाजातील पहिले आमदार आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे लाडके विद्यार्थी होते. १९३७ पासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ते काँग्रेस … Read more

मुख्यमंत्री फडणवीस, लोणीकरांच्या भाषणातून स्वबळाने लढण्याचे संकेत

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने परभणी जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या तिन्ही सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या भाषणांमधून स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने आगामी विधानसभा निवडणूक भाजपा स्वतंत्र लढते की काय अशा चर्चां सुरु झालीय. परभणी जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या चार जागा आहेत पैकी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ वगळता तीन जागा युतीच्या … Read more

राष्ट्रवादीचे नेते शरद लाड शिवसेनेच्या संपर्कात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य शरद लाड शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांची सेनेच्या एका बड्या मंत्र्यांशी गोपनिय बैठक झाली असून प्राथमिक चर्चा केली आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघ सेनेच्या वाट्याला येत असल्याने लाड हे सेनेमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात होवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा … Read more