Breaking | रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीला

मुंबई प्रतिनिधी | भाजप शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन चांगलेच जुंपले असताना सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. अशात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहे. आठवले आणि पवार यांच्या भेटीमुळे राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे. रामदास आठावले शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास शरद पवार यांच्या सिल्वरवोक या … Read more

संजय राऊतांचा उद्धव आणि आदित्य ठाकरेंना धोबीपछाड

विशेष प्रतिनिधी | सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून रणसंग्राम सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकून देखील भजप शिवसेना अद्याप सत्ता स्थापन करू शकले नाहीत. आमची दारे चर्चेसाठी कायम उघडी असल्याचे भाजप सांगतंय परंतु मुख्यमंत्री पदाबाबत तडजोड नाही अशी भूमिका घेतय. तर मुख्यमंत्री पदाशिवाय चर्चाच नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे सत्तेचं घोड काही … Read more

तथाकथीत मध्यस्थांची गरज नाही, संजय राऊतांचा भिडे गुरुजींना टोला

मुंबई प्रतिनिधी | सत्तावाटपाच्या मुद्द्यावरुन सेना भाजप यांच्यात चांगली जुंपली असून हा तिढा मध्यस्तांच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. गुरुवारी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे आणि भिडे यांची भेट होऊ शकली नाही. यावर तथाकथीत मध्यस्तांची गरज नाही असं म्हणत संजय … Read more

राज्यात राष्ट्रपती राजवट? अॅटर्नी जनरल व राज्यपालांच्या दरम्यान चर्चा

मुंबई प्रतिनिधी | राज्यात अद्याप कुठल्याही राजकीय पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राज्याच्या अॅटर्नी जनरलला राजभवनात चर्चेसाठी बोलावले आहे. अॅटर्नी जनरलच्या सल्ल्यानंतरच राज्यपाल आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र भाजपने उद्या संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यमान विधानसभेचा … Read more

हिम्मत असेल तर आमदार फोडून दाखवा, शिवसेना आमदाराचे भाजपला ओपन चँलेंज

मुंबई प्रतिनिधी | हिम्मत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवा असे आव्हान शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी केले आहे. भाजपचे नाव न घेता पाटील यांनी भाजपला आॅपन चँलेंज दिले आहे. हिम्मत असेल तर आमदार फोडून दाखवा असं चँलेंज देत आमदार फोडणे म्हणजे मंडईतला भाजीपाला आहे काय? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला अाहे. मुख्यमंत्री पदावरुन … Read more

शरद पवार- पृथ्वीराज चव्हाणांची कऱ्हाडात बैठक

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजप-शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकाही वाढल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बैठक कराड येथे होणार आहे. दोन्ही नेते नुकतेच दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांची स्वतंत्ररित्या भेट घेवून आले आहेत. … Read more

शरद पवारांच्य‍ा पत्रकार परिषदेतील महत्वाचे ५ मुद्दे!

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार यांनी देशाती आणि राज्यातील महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. शरद पवार यांच्या पत्रकर परिषदेतील महत्वाचे पाच मुद्दे खालीलप्रमाणे

१) पोलीसांची सुरक्षितता – आठवडाभरापूर्वी मुंबईत पोलीसांवर जमावाकडून हल्ला झाल्याची घटना घडली होती. याबाबत पवार यांनी पोलीसांची सुरक्षितता एरणीवर आल्याचं म्हटलं आहे. देशातील सर्वच राज्यांत पोलिसांची अवस्था बिकट आहे. पोलीसांना ८ तासांहून अधिक काम करावे लागते. तसेच आठवड्याची सुट्टीही पोलिसांना मिळत नाही. अशा परिस्थितीत पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात. पोलीसांवर हल्ला होणं ही गांभिर्याची बाब आहे. केंद्राने यात लक्ष घालणं गरजेचं आहे. असं पवार म्हणाले.

२) अतिवृष्टीचा शेतकर्‍यांना फटका – राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसला असून यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असल्याचं पवार यांनी सांगितले. मी राज्यात फिरलो तेव्हा शेतकर्‍यांना विशिष्ट आर्थिल मदतीची, काही प्रमाणात कर्जमाफीची आणि बँकांकडून कर्जपूरवठा उभारण्याची गरज शेतकर्‍यांनी मला बोलावून दाखवली आे पवार म्हणाले.

३) विमा कंपण्यांचा भोंगळ कारभार – शेतकरी विमा काढतात मात्र विमा कंपण्या आपली जबाबदारी पार पाडायला तयार नाहीत. केंद्र सरकारने विमा कंपण्यांची बैठक बोलावून त्यांना तशा सुचना देणे गरजेचे आहे असे पवार यांनी म्हटलं आहे.

४) अयोध्या निकाल – अयोध्या प्रकरणाचा निकाल लागणार असून तारीखही जवळपास निश्चित होत आहे. अशात शांतता व सुव्यवस्था राखणे ही आपली जबाबदारी आहे. बाबरी मस्जिद हल्ला झाला तेव्हा देशात जी परिस्थिती निर्माण झाली होती स्थिती येऊ नये यासाठी पवार यांनी आवाहन केले.

५) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण – राज्याच्या परिस्थितीवर बोलण्यासारखे अद्याप काही नाही. जनतेने भाजप शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे. त्य‍ांनी राज्यातील स्थिती पूर्ववत करावी असं पवार म्हणालेत. शिवसेना आणि भाजप यांची युती पंचवीस वर्षांची आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सरकार बनवण्यासाठी कौल दिला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार स्थापन करावं असं मत पवार य‍ांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. तसेच जनतेने आम्हाला विरोधीपक्षात बसवलं असून आम्ही विरोधीपक्षाची भुमिका योग्य पद्धतीने पार पाडू असंही पवार म्हणालेत. आपण मुख्यमंत्री होण्यास तयार होता काय असं एका पत्रकाराने विचारले असता मी चार वेळा मुख्यमंत्री राहिलो आहे. आता मला मुख्यमंत्री करा यासाठी मी कधीही आग्रही नव्हतो असं म्हणत या चर्चा म्हणजे प्रपोगंडा आहेत असे पवार म्हणाले.

Breaking | शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत शरद पवारांचे मोठे विधान

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भेट घेतली. राऊत यांच्यासोबत तासभर दरवाजा बंद चर्चा केल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि भाजप यांची युती पंचवीस वर्षांची आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सरकार बनवण्यासाठी कौल दिला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेने … Read more

शरद पवारांचा मास्टरप्लान, भाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंना आणणार एकत्र

विशेष प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी अद्याप महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेले नाही. भाजप शिवसेना सत्तास्थापनेवरुन एकमेकांवर आखपाखड करत असताना मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशात राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा नवी मास्टरप्लान शरद पवार आखत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या … Read more

‘या’ कारणामुळे उद्धव ठाकरें समोर वृद्ध शेतकरी ढसाढसा रडला

लातूर प्रतिनिधी | शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची व्यथा उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडताना एका वृध्द शेतकऱ्याने हंबरडा फोडला. नांदेड जिल्ह्यातील कंधार मधल्या किरोळा इथं उद्धव ठाकरे हे बाधित पिकांची पाहणी करण्यासाठी गेले असता तिथे एका शेतकर्‍याने ठाकरे यांच्यासमोर ढसाढसा रडायला सुरवात केली. … Read more