ओल्या दुष्काळाने घेतला शेतकऱ्याचा बळी

परतीच्या पावसाने राज्यभरात थैमान घातले. या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान केले. नुकसान झालेल्या शेतमालाचा दाह आता शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करताना दिसत आहे. बीडमधील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीचे लग्न कसे करावे या नैराश्येतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. 

काँग्रेसला मतदान करून महापुराचा बदला घ्या – जयंत पाटील

महापुराच्या काळात भाजप सरकारने मदत केली नाही. मंत्री व आमदारांनी सांगलीत येऊन शो बाजी केली. पुरामुळे सात दिवस जनतेचे आतोनात हाल झाले. त्याचा बदला घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला साथ द्यावी व कमळाबाईने दिलेला त्रास वसूल करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. महाअघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडी येथील राम मंदिरसमोर सभा पार पडली. या सभेत आ.जयंत पाटील बोलत होते. सभेला विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, संजय बजाज, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे सरकार आल्यावर तीन महिन्यांत सातबारा कोरा करणार – अजित पवार

युती शासनाने शेतकऱ्यांची पाच वर्षात अत्यंत वाईट अवस्था केली आहे त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली असून सध्या शेतकऱ्यांची स्थिती हालाखीची आहे जर आमचे सरकार आले तर तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून दाखवणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे सभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

मी पुन्हा येणार म्हणणार्‍या फडणवीसांच्या दौऱ्या दरम्यान शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बुलडाणा प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी बुलडाणा दौर्‍यावर असताना एका शेतकर्‍यांने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुन्हा आणू भाजपचे सरकार असं लिहीलेला टीशर्ट घालून शेतकर्‍यांने आत्महत्या केल्याने याची जोरदार चर्चा सुरु आहे. सदर घटना कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार संघात घटली आहे. शेगाव तालुक्यातील खातखेड येथे सकाळी ११ वाजता सदर शेतकर्‍याने … Read more

धक्कादायक ! २४ तासात ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बुलडाणा प्रतिनिधी| बुलडाणा जिल्ह्यातील धाड या गाव शिवारात कर्जबाजारीपणाला कंटाळून  ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्या आहेत. गेल्या २४ तासांच्या अवधीत शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्येमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात एकीकडे निवडणुकीची रणधूमाळी सुरु झाली आहे. तेव्हा निवडणुकांवर लाखो रुपये खर्च केल्या जात असताना दुसरीकडे आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत असल्याच चित्र सध्या जिल्हयात दिसत … Read more

अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा

परभणी प्रतिनिधी। जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथील एका शेतकऱ्याला पाझर तलावासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी मागील १० वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे ‘मागील दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांच्या संगनमताने अडवणूक करत असल्याचे निवेदन भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मार्फत दिनांक २८ सप्टेंबर रोजी संबंधित शेतकऱ्याने दिले असून मोबदला तत्काळ द्यावा अन्यथा आत्महत्या केल्याशिवाय … Read more

‘शेतकऱ्यांनो एक दमडीही कर्ज भरायचं नाही’ – रघुनाथदादा पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘हमीभावास 50 टक्के कात्री लावून सरकारने वर्षाला 50 हजार कोटींचा शेतकऱ्यांवर दरोडा टाकला आहे. त्यामुळे सरकारवरच शेतकऱ्यांचे देणे लागत आहे, आम्ही खऱ्या अर्थाने कर्जदार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला 20 वर्षापूर्वीच कर्जमुक्ती दिल्याने एक दमडीही भरायची नाही,’ असे आवाहन शेतकरी संघटनेत नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले. कोल्हापुरात झालेल्या कर्जमुक्त परिषदेत हा निर्धार करण्यात आला. … Read more

विरोधी पक्ष नेते दाखवा आणि बक्षीस मिळवा ; रघुनाथदादा पाटील

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे काँग्रेस आघाडीच्या भ्रष्ट सरकारला कंटाळून शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्यात भाजप-सेना युतीचा पर्याय निवडला. मात्र मागील पाच वर्षात सरकारचे धोरण बदलले नाही, शेतकरी विरोधात कायदे केले. शेतमालाचे दर पाडण्यात आले. देशात आर्थिक मंदी आली असून शेतकरी कामगार कष्टकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी कोल्हापुरात मंगळवारी शेतकरी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात … Read more

जो पर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत विसर्जन नाही, शेतकर्‍यांचे बाप्पासमोरच उपोषण

सोलापूर प्रतिनिधी | लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यासाठी राज्यभरात जोरदार जल्लोष सुरु असतानाच इकडे पंढरपूर तालुक्यात मात्र पाण्यासाठी शेतकर्यांनी गणरायापुढेच उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत नीरा कालव्यातून पाणी मिळत नाही तो पर्यंत गणपती बाप्पाचे विसर्जन करणार नाही असा पवित्रा येथील शेतकर्यांनी घेतल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून पंढरपूर,सांगोला आणि माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पाऊस नसल्याने शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे भीमा आणि नीरा नदीला पुर आलेला असतानाच दुसरीकडे मात्र याच भागातील शेतकर्यांना पाण्यासाठी गणपती बप्पासमोरच आंदोलन कऱण्याची वेळ आली आहे.

गणपती बप्पाचे विसर्जन करण्यासाठी अनेक गावात पाणीच नसल्याने गणरायाचे विसर्जन कसे करायाचे अशी चिंता देखील गणेश भक्तांना लागली आहे,अशातच आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी, उंबरगाव, कासेगाव, या भागातील शेतकर्यांनी चक्का गणरायासमोरच उपोषण सुरु केले आहे.इतकेच ऩाही तर पाणी मिळाल्याशिवाय गणरायाचे विसर्जन करणार नाही असा इशारा येथील शेतकरी सचिन ताटे यांनी दिला आहे. पाण्यासाठी गणरायाचे विसर्जन थांबविण्याची वेळ या भागातील शेतकर्यांवर पहिल्यांदाच आल्याने येथील शेतकर्यांच्या उपोषणाची परिसरात चर्चा सुरु झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

दंगल गर्ल बबिता फोगाटचा पोलिस दलातून राजीनामा, भाजपकडून लढणार विधानसभा

आता कार्ड जवळ नसेल तरीही ATM मधून पैसे काढता येणार, पहा काय आहे प्रक्रीया

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

इकडे आड तिकडे विहीर ; राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या अडचणीत वाढ

 

तर भावाच्या अस्थी मातोश्रीवर पाठवणार

Untitled design

उस्मानाबाद प्रतिनिधी |  कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद येथील शेतकरी दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत दिलीप ढवळे यांनी शिवसेनेला मतदान करू नका असे लिहले होते. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा सबंध राजकीय  वर्तुळात झाली. आपल्या भावाच्या मृत्यूची फिर्याद पोलीस दाखल करून घेत नाहीत. त्यामुळे भावाच्या अस्थी मातोश्रीवर पाठवणार आहे. आपल्या भावाच्या मृत्यूची फिर्याद चार वेळा पोलीस ठाण्यात चकरा … Read more