कोयना नदीमध्ये उडी घेऊन पोटच्या दोन मुलांसह आईची आत्महत्या
पोटच्या दोन मुलांसह एका महिलेने कोयना नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाटण तालुक्यातील सांगवड येथे ही घटना घडली आहे. राधिका माने वय २७ असे या विवाहित महिलेचे नाव आहे. तर श्रावण वय ३ वर्षे आणि शिवराज वय ९ महिने अशी तिच्या मुलांची नावे आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.