कोट्यवधींची फसवणूक करणारी, आंतरराज्य टोळी पुणे सायबर पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद | बँकेमध्ये असलेल्या निष्क्रिय खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुण्याच्या सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह आठ जणांना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात परमजितसिंग संधू (४२, रा. औरंगाबाद) व राजेश मुन्नालाल शर्मा (४२, रा. औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर … Read more

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, २१ मार्चला मतदान; २२ रोजी मतमोजणी

औरंगाबाद | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २१ मार्चला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपासून अदालत रोडवरील जिल्हा बँकेच्या सभागृहात मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली. शेतकी मतदारसंघाच्या औरंगाबाद तालुक्याचे व प्रोसेसिंग मतदारसंघाचे मतदान क्रांती चौकातील विभागीय … Read more

पहिल्या दिवशी ५३ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा चार जिल्ह्यांत ३१६ केंद्रांवर व्यवस्था

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित पदवी अभ्यासक्र माच्या व्दितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षांना १६ मार्चपासून सुरूवात झाली. सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत सुमारे ५३ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा दिली. परंपरागत पदवी अभ्यासक्र माच्या व्दितीय तसेच तृतीय वर्षाच्या परीक्षा पहिल्या दिवशी सुरळीत पार पडल्या. ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी … Read more

५ हजारांची लाच घेताना दोन हवालदार एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद | न्यायालयाने लावलेली हजेरी बंद करण्यासाठी व गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांना रंगेहाथ अटक केली आहे. याबाबत तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पोलीस हवालदार शेख अफसर शेख इलोमोद्दीन (वय ५२), रत्नाकर पुंडलिक बोर्डे (वय ५0) या दोघांनी गुन्ह्याच्या तपासकामी ५ हजार रूपयांची मागणी … Read more

घाटी रूग्णालयाच्या आवारात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, उपचाराअभावी मृत्यू झाल्याने खळबळ; आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

death

औरंगाबाद | घाटी रूग्णालयाच्या आवारात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदरील व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते. या घटनेने घाटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीच्या पायाला जखम झाली होती व जखमेला मुंग्या लागल्याचेही निदर्शनास आले. ही व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होती. काहींनी … Read more

बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद; चार दिवसांनंतर कामकाज सुरू झाल्याने गर्दी

औरंगाबाद | बँकांच्या खासगीकरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या संपाला बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चार दिवसांनंतर बुधवारी बँकांचे कामकाज सुरू झाले आणि नागरिकांनी बँकांमध्ये एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. सरकारने आयबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनतर्फे १५ व १६ मार्च रोजी संप पुकारण्यात आला. शहरातील … Read more

नागरिकांनो सावधान! व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण….

औरंगाबाद | मनपा आरोग्य विभाग व जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या सहकायार्ने शहरात सहा ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. त्यातून 61 व्यापाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एसएसएस शाळेत 119 पैकी 12 पॉझिटिव्ह, पैठण गेट 125 मधून आठ पॉझिटिव्ह, महावीर भवनात 77 पैकी 9 पॉझिटिव, शहागंज मध्ये 143 पैकी 13, अग्रसेन भवनात 150 पैकी … Read more

विना मास्कविरोधात आता मनपासोबतच पोलिसांची कारवाई, विना मास्क फिरणाऱ्या 165 जणांना दंड

औरंगाबाद | महापालिकेसोबतच आता पोलिसांनाही विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्यानंतर मागील पाच दिवसांपासून कारवाई केली जात आहे. कारवाईतील हा संथपणा पाहता मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी याबाबत सूचना केल्या. कारवाया वाढवा, जनजागृती करा, कारवाई करताना मास्कचेही वाटप करा असेही त्यांनी सर्व पोलीस निरीक्षक यांना सांगितले. दरम्यान सोमवारी विना मास्क … Read more

पॉझिटिव्ह रूग्ण एक हजारांपर्यंत गेल्याने शहरात २१ कोवीड केअर सेंटर सुरू करणार

औरंगाबाद | शहरात दररोज एक हजार पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत असल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांवर कुठे उपचार करावेत, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला असून, युध्दपातळीवर २१ कोवीड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातील ९ केंद्रे सुरूही झाली आहेत. आजा सुरू केलेले केंद्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हाउसफुल्ल होत आहे. दररोज … Read more

एमपीएससी व रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा आणि रेल्वे भरतीची परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी म्हणजे २१ मार्च रोजी होत आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, या परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही केंद्रांवर … Read more