अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा- सचिन सावंत

सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे माहिती दिली होती. राऊत यांच्या माहितीवर सचिन सावंत यांनी काँग्रसेची भुमिका मांडत शिवसेनेला उपरोधक टोला लगावला.

काँग्रेस कार्यकर्त्याची अशीही पक्षनिष्ठा; मुलाचे नाव ठेवलं काँग्रेस

प्रामाणिकता, पक्षनिष्ठा, नीतिमत्ता ह्या गोष्टी राजकारणातून हद्दपार झाल्या आहेत असं बरेचदा राजकीय नेत्याकडून ऐकायला मिळत. मात्र, आजही राजकीय पक्षासाठी झटणाऱ्या कर्यकर्त्यांमध्ये आपल्या पक्षा प्रती आस्था, प्रेम कायम असल्याचं उदाहरण राजस्थानमधील एका काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिल आहे. राजस्थानमधील विनोद जैन या काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या मुलाचं नाव काँग्रेस ठेवलं आहे. त्यामुळे सर्वत्र या काँग्रेस कार्यकर्त्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असल्यामुळे त्याने थेट पक्षाचे नाव आपल्याला मुलाला दिलं असं विनोदचं म्हणणं आहे.

२०१४ साली सुद्धा शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव आला होता- पृथ्वीराज चव्हाण

शिवसेनेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

कराडमध्ये विद्यार्थी काँग्रेसतर्फे जेएनयु हल्ल्याचा निषेध;संघ-भाजपवर केला तुफान हल्लाबोल

जेएनयू विद्यार्थी हल्ल्याप्रकरणी देशभर या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. रविवारी काही तोंड झाकलेल्या गुंडांनी जेएनयूमधील विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती. या भ्याड हल्ल्याबाबत अनेक स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. यायचं भाग म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे कराडमध्ये निदर्शने करण्यात आली.

काँग्रेसचा ‘हा’ आमदार आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार? महाविकासआघाडीतील नाराजी नाट्य शिगेला

जालना | आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची बातमी ताजी असतानाच आता महाविकास आघाडीला अजून एक झटका बसला आहे. काँग्रेसचे आमदार कैलाश गोरंट्याल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. एवढेच नाही तर ते पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे ते राजीनामा सोपवतील. “हम वफा कर के … Read more

यशोमती ठाकूर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री ?? जिल्ह्यात जोरदार बॅनरबाजी

खरंच यशोमती ठाकूर यांना महिला आणि बालकल्याण खातं मिळालं आहे? बॅनरबाजी कितपत खरी?

काँग्रेस पाकिस्तानच्या नव्हे तर शरणार्थी लोकांच्या विरोधात – नरेंद्र मोदी

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा काँग्रेस आणि विरोधकांवर हल्लाबोल केला. काँग्रेस पाकिस्तानच्याविरोधात नव्हे तर तिथून भारतात आलेल्या पीडित शरणार्थींच्या विरोधात आंदोलन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कर्नाटकातील तुमकूर येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.

परदेशात जाण्याची ओढ असलेल्या राहुल गांधींना सावरकर कळणार नाहीत- माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे

काही दिवसापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावकार यांच्यावर टीका केली होती. या टिकेमुळं राहुल गांधी यांच्यावर भाजपने जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. राष्ट्रीय तसेच राज्यातील अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. याच संदर्भात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आता राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे त्यामुळं माफी मागणार नाही;राहुल गांधींनी केला भाजपवर पलटवार

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी देशात भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याचे सांगत मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. हे करत असताना राहुल यांनी भाजपसाठी लोकप्रिय असलेल्या मेक इन इंडिया या घोषणेचा विपर्यास करत ‘रेप इन इंडिया’ असं म्हणत भाजपला डिवचण्याचा प्रयन्त केला होता. तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या वादग्रस्त विधानावर संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपने करत राजकारण तापवलं असताना. राहुल यांनी भाजपवर पलटवार केला आहे. “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही,” अशा वादग्रस्त शब्दांत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’दरम्यान राहुल यांनी हे विधान केलं.

शासनाच्या आदेशामुळे सांगली महापालिकेच्या कामांना ब्रेक, ठेकेदारांचे धाबे दणाणले

महापालिकेला राज्य शासनाकडून जो निधी देण्यात आला होता यातील ज्या कामांच्या वर्क ऑर्डर अद्याप दिल्या गेल्या नाहीत. त्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश राज्य शासनाने आज काढले आहेत. महापलिकेच्या दलित वस्ती सुधार योजना, जिल्हा नियोजन समिती, रस्ते अनुदान यासह विशेष अनुदानातील सुमारे ३५ कोटींच्या कामांना आता ब्रेक लागला असून ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.