हिटलरने देखील स्टेडियम बांधून स्वतःचे नाव दिले होते; जितेंद्र आव्हाडांचा मोदींना टोला

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर याने देखील सत्तेत आल्यानंतर मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं, मोदींनी सुद्धा स्वतःच नाव दिलं हे पाहून मला त्याचीच आठवण आली, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे … Read more

निधी खर्च करण्यात सुद्धा ठाकरे सरकार अकार्यक्षम; अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जीएसटी चे पैसे मिळत नसल्याचे रडगाणे गाऊन प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाच्या महामारीत तरी अधिक कार्यक्षमता दाखवत नियोजनबद्ध विकासकामे करण्याची आवश्यकता होती, परंतु २०२० – २१ या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात नमूद एकूण तरतुदीपैकी केवळ ४५ टक्के निधी खर्च केला असून त्यातही धक्कादायक बाब म्हणजे एकूण वितरीत निधीच्या केवळ … Read more

Ayushman Bharat Yojna : आता मोफत मिळणार आयुष्यमान कार्ड, जाणून घ्या कसा मिळणार फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयुष्यमान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे ‘आयुष्यमान कार्ड’ यापुढे मोफत मिळणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. पहिले या कार्डसाठी 30 रुपये द्यावे लागत होते. या कार्डच्या मार्फत आपण आपला इलाज मोफत करू शकता. देशभरामध्ये … Read more

सरपंच असावा तर असा..! पहा का होतंय कौतुक

 बीड प्रतिनिधी | अनवर शेख एकदा का निवडणूक झाली आणि सरपंच पदाची माळ आपल्या गळ्यात पडली की या पदाचा तोरा मिरवणार्‍यांची आपल्या कडे कमी माही मात्र गावच्या सरपंच पदी निवड झाल्यानंतर तिसर्‍याच दिवशी स्वतः विजेच्या खांबावर चढुन आठ दिवसापासून अंधारात असलेल्या गावच्या विजेचा प्रश्न मार्गी लावत गावाप्रति काम करण्याची तळमळ व सरपंच पदाचे कर्तव्य बजावत … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी खासगीकरणावर म्हणाले की,”सरकारचे काम बिझनेस करणे नाही”

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की, सरकारला व्यवसाय करण्यात कोणताही रस नाही. लोकांचे कल्याण आणि विकासाशी संबंधित प्रकल्पांवर सरकारचे लक्ष असले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांवर ते एका वेबिनारमध्ये बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की,”सरकारने हा व्यवसाय स्वत: चालविला पाहिजे, त्याचे मालक बनले … Read more

लॅपटॉप, टॅब्लेट आणि पीसी तयार करण्यासाठी PLI योजनेस मंत्रिमंडळाने दिली मान्यता

नवी दिल्ली । लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल-इन-वन पीसी आणि सर्व्हरच्या उत्पादनास प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने प्रॉडक्शन लिंक्ड प्रोत्साहन PLI (Production Linked Incentive) योजनेस मान्यता दिली आहे. या PLI योजनेद्वारे देशांतर्गत उत्पादन क्षेत्रात जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्याचा सरकारचा मानस आहे. या हाय-टेक आयटी हार्डवेअर गॅझेटसाठी पीएलआय योजना मंजूर होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात दूरसंचार उपकरणे तयार करण्यासाठी 12,195 … Read more

क्रिप्टोकरन्सीबाबत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितल्या ‘या’ गोष्टी, यासाठी सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बाबत चिंता व्यक्त केली आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की,”क्रिप्टोकरन्सी मुळे आशिया खंडातील तिसर्‍या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो.” एका टी. व्ही. चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आरबीआय गव्हर्नर म्हणाले की,” सरकारला याबाबत माहिती देण्यात आली आहे.” यासह, ते पुढे म्हणाले की,”केंद्र … Read more

नथुरामवादी सरकारला आता गांधीवादी सरदार पटेलांची अडचण होतेय म्हणून त्यांनी स्टेडियमचे नाव बदलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नथुरामवादी सरकारला आता गांधीवादी सरदार वल्लभभाई पटेल यांची अडचण वाटू लागल्याने त्यांनी स्टेडियमचे नाव “नरेन्द्र मोदी स्टेडियम” केलं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना केली. जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा नावलौकिक मिळवलेलं मोटेरा स्टेडियमचे नाव आता नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आलं आहे. या स्टेडियमचं औपचारिक उद्घाटन … Read more

कुलूप लावलेले “कोविड सेंटर” पुन्हा होणार सुरू; कोरोना रुग्णांची प्रचंड वाढणारी संख्या ठरली कारणीभूत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (धुळे प्रतिनिधी) | कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढू लागली असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा,शिरपूर आणि धुळे या ठिकाणी कुलूपबंद केलेली कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी एकूण ४५ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत तर मंगळवारी ६५ अहवाल पॉझीटिव्ह … Read more

सत्तेसाठी भाजप कुठलीही तडजोड करू शकतो; भाजप नेत्याचा घरचा आहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष कुठल्याही प्रकारची तडजोड करू शकतो अशा शब्दात टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भाजप मार्गदर्शक मंडळाचे सदस्य हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी आज केली. शांता कुमार यांचं आत्मकथन असलेल्या ‘निज पथ का अविचल पंथी’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी … Read more