पंतप्रधान नरेंद्र मोदी खासगीकरणावर म्हणाले की,”सरकारचे काम बिझनेस करणे नाही”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की, सरकारला व्यवसाय करण्यात कोणताही रस नाही. लोकांचे कल्याण आणि विकासाशी संबंधित प्रकल्पांवर सरकारचे लक्ष असले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांवर ते एका वेबिनारमध्ये बोलत होते.

पंतप्रधान म्हणाले की,”सरकारने हा व्यवसाय स्वत: चालविला पाहिजे, त्याचे मालक बनले पाहिजे, आजच्या काळात ना हे आवश्यक आहे, ना ते शक्यही नाही. ते पुढे म्हणाले की,”जेव्हा सरकार व्यवसाय करण्यास सुरवात करते तेव्हा बरेच नुकसान होते. सरकारला निर्णय घेण्यासाठी निर्बंध आहेत. सरकारमध्ये व्यावसायिक निर्णय घेण्याचा अभाव आहे. प्रत्येकाला आरोप आणि कोर्टाची भीती वाटते. यामुळे, एक विचार पुढे येतो की जे चालले आहे, ते तसेच चालू द्या, अशा विचारांनी व्यवसाय करणे शक्य नाही.”

खासगीकरणावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की,”सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उपक्रमांचे नुकसान होत असून अनेकांना करदात्यांच्या पैशाद्वारे मदत केली जात आहे.”ते म्हणाले,”आजारी पीएसयूंना देत असलेल्या आर्थिक मदतीमुळे अर्थव्यवस्थेवरचा बोझा वाढतोय, सरकारी कंपन्या केवळ वारसा मिळाल्यामुळेच चालवल्या जाऊ नयेत.’

खासगीकरणाबाबत आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये पंतप्रधान मोदींनी 2021-22 च्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आणि ते म्हणाले की,”भारताला उच्च विकासाच्या मार्गावर नेण्यासाठीचा हा स्पष्ट रोडमॅप आहे.” ते पुढे म्हणाले की,” भारताला वेगाने विकासाकडे नेण्यासाठी या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा स्पष्ट रोडमॅप ठेवण्यात आला. अर्थसंकल्पात भारताच्या विकासात खासगी क्षेत्राच्या भक्कम भागीदारीवरही भर देण्यात आला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या संधी आणि उद्दीष्टे स्पष्टपणे पुढे ठेवली आहेत.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment