बडगाम येथील चॉपर आम्ही पाडले नाही – पाकिस्तानची कबुली

Untitled design

नवी दिल्ली वृत्तसंस्था | भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर आज सकाळी जम्मू-काश्मीर येथील बडगाम येथे कोसळले होते. मात्र यानंतर आम्ही हे लढाऊ चॉपर पडले असल्याची बोंब पाकिस्तानने करण्यास सुरवात केली होती. पाकिस्तानी न्युज चॅनेल ने देखील ही बातमी दाखवायला सुरु केले होते. मात्र काही तासातच पाकिस्तानने बडगाम दुर्घटनेचे चॉपर आम्ही पडले नाही अशी कबुली दिली.पाकिस्तानचे लष्कर प्रवक्ते … Read more

भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात … दोन जवान शाहिद

Untitled design

श्रीनगर  वृत्तसंस्था  |  भारतीय वायुसेनेच्या हॅलिकॉप्टरला जम्मू- काश्मीरच्या बडगाम येथे अपघात झाला आहे. या अपघात दोन अधिकारी वैमानिक आणि सह वैमानिक शाहिद झाले आहेत. हॅलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते आहे. सकाळी १० वाजता हे हेलिकॉप्टर मोकळ्या मैदानात कोसळले. या भीषण अपघातामुळे हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला. यात दोन मृतदेह हाती आले आहेत. … Read more

शोपीयात दोन दहशतवादी ठार, भारत-पाक सैन्यात गोळीबार सुरूच

Untitled design

श्रीनगर  वृत्तसंस्था  | जम्मू-काश्मीरच्या शोपीया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सेना,सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीरचे पोलीस यांची संयुक्त टीम यांनी मिळून हे ऑपरेशन पार पाडले.यात त्यांना यश मिळाले.सुरक्षारक्षकांकडून सध्या कोम्बिंग ऑपरेशनसुरु आहेत. शोपीयातील काही भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली होती, त्या भागाला त्यांनी घेराव घेतल्यानंतर रात्रभर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु होते. … Read more