भारताने तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांना खडसावलं; आमच्या अंतर्गत मुद्दयांमध्ये हस्तक्षेप करू नका!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काश्मीर संदर्भात केलेल्या विधानावरुन भारताने तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांना खडे बोल सुनावले आहेत. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून त्यात तुर्कस्तानने हस्तक्षेप करू नये असं भारताकडून सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, ”जम्मू-काश्मीर संदर्भात टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेले सर्व संदर्भ भारत नाकारत असून जम्मू-काश्मीर हा भारताचा … Read more

मोदी मुस्लीमबहूल काश्मीरवर निर्बंध लादून हिंदूराष्ट्र निर्माण करत आहेत – उद्योगपती जॉर्ज सोरोस

नुकतच ‘द इकॉनॉमिस्ट’ या प्रसिद्ध मासिकाने आपल्या नव्या आवृत्तीत मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. या आवृत्तीतील सर्वांत प्रदीर्घ लेख, ‘नेता’ हा अधिक जहरी आणि चर्चेचा विषय आहे. त्यात असे लिहिले आहे की, “पंतप्रधान मोदींमुळे 20 कोटी मुस्लिम घाबरले आहेत कारण पंतप्रधान हिंदू राष्ट्र बनविण्यात व्यस्त आहेत.” असं सांगितलं आहे.

केंद्र सरकारने केली जम्मू-काश्मीरसाठी ८० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद ३७० रद्द केलं होतं. त्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं होतं. गेल्या काही महिन्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये ठप्प पडलेल्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याच्या दृष्टीने या घोषणेकडे पहिले जात आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे.

हिजबूलचे दहशतवादी २६ जानेवारीला करणार होते मोठा हल्ला; अटक करण्यात आल्याने फसला कट

हिजबूल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आलेले निलंबित जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग यांच्या चौकशीत महत्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांकडे २६ जानेवारीला राजधानी दिल्ली, पंजाब आणि चंदिगडमध्ये स्फोट घडवून आणण्याची जबाबदारी दिली होती असं उघड झालं आहे. स्फोट घडवण्यासाठी अजून काही दहशतवादी त्यांना सोबत देण्यासाठी येणार होते असंही सुत्रांकडून समजलं आहे. तर या दहशतवाद्यांना दिल्लीला पोहोचवण्यासाठी देविंदर सिंग मदत करत करत होते.

धक्कादायक! १२ लाखांत ‘या’ पोलीस अधिकाऱ्याने दहशतवाद्यांना दिल्लीत आणण्याचा केला सौदा

राष्ट्रपती पदक विजेता पोलीस अधिकारी देविंदर सिंग याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरहून दिल्लीत आणण्यासाठी १२ लाख रुपये मिळाले होते’, अशी कबुली देवेंद्र सिंगने दिली आहे.

ते पोस्टर काश्मीरला काही बंधनांमधून मुक्त करा, या मागणीसाठी होते- खासदार संजय राऊत

काल मुंबईत जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून गेट वे ऑफ इंडियावरील निदर्शनात ‘फ्री काश्मीर’ असा फलक घेऊन उभ्या असलेल्या एका तरुणीचे छायाचित्र माध्यमात प्रसारित झाले होते. या फलकावरूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

कराडचे शहीद संदीप सावंतांचं पार्थिव शुक्रवारी गावी येणार

कराड तालुक्यातील मुंढे गावचे संदीप रघुनाथ सावंत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शहिद झाले असुन सातारा जिल्हयासह गावकऱ्यांना संदिप यांचे पार्थीवाची प्रतिक्षा आहे. या ठिकाणच्या अंत्यसंस्काराची तयारी पुर्ण झाली असून अंतिम संस्कार शुक्रवारी पार पडण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीर, लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची अनोखी दिवाळी भेट!

जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना ३१ ऑक्टोबर २०१९ पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार मिळणारे सर्व भत्ते लागू होणार आहेत. केंद्र सरकारने आज या प्रस्तावाला मंजुरी दिलीये. केंद्रीय गृह मंत्रालयान या संदर्भात आवश्यक आदेश जारी केलेत.

काश्मीरमध्ये आजपासून ‘पोस्टपेड मोबाइल’ सेवा पूर्ववत

काश्मीर खोऱ्यात गेले ६९ दिवस संचारमाध्यमांवर असलेले निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मोठे पाऊल उचलले असून, या ठिकाणचे सुमारे ४० लाख पोस्टपेड मोबाइल दूरध्वनी सोमवार दुपारपासून कार्यरत होतील, असे जाहीर केले आहे. देशभर दूरदर्शनवरून प्रक्षेपित करण्यात आलेल्या श्रीनगरमधील पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव व प्रवक्ते रोहित कन्सल यांनी ही घोषणा केली. तथापि, २० लाखांहून अधिक प्रीपेड मोबाइल दूरध्वनी, तसेच मोबाइल व इतर इंटरनेट सेवा सध्या बंदच राहणार आहेत.

भारतीय वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता – परराष्ट्र मंत्रालय

Untitled design

नवी दिल्ली प्रतिनिधी | सकाळी जम्मू काश्मीरमध्ये भारतीय हवाई सीमेत दाखल झालेल्या तीन पाकिस्तानी विमानांपैंकी एका एफ-१६ विमानाला भारतीय वायुसेनेनं लाम सेक्टरमध्ये पाडलं. तर दुसरीकडे पाकिस्तान सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एक भारतीय वैमानिकही जिवंत हाती लागल्याचा दावा केला आहे. काही वेळेपूर्वी एयर व्हाईस आरजीके कपूर आणि परराष्ट्र मंत्रालयचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी … Read more