शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार, देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत गंभीर आरोप

मुंबई | शालेय पोषण आहार, धानखरेदी, आश्रमशाळा वस्तुखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असून, विशिष्ट कंपनी, नेत्यांना फायदा मिळण्यासाठी हा संपूर्ण गैरव्यवहार केला असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुराव्यासह विधानसभेत केला. 2020-21 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर ते विधानसभेत बोलत होते. फडणवीस म्हणाले की, शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार होत आहे. विशिष्ट व्यक्तींना … Read more

अजित पवारांनी दिला राजकारण सोडून लेखक होण्याचा फडणवीसांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे आज प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी करत फडणवीस यांना टोले लगावले. ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे देवेंद्र फडणवीस यांचं पुस्तक पाहिलं तर फडणवीस हे उत्तम साहित्यिक होऊ शकतात … Read more

धर्माच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला आमचा विरोध! मुस्लिम आरक्षणावरून फडणवीस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आणण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सूतोवाच करताच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीका केली आहे. भारताच्या संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कुठलीही तरतूद नाही आहे. तसेच मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण दिल्यास याचा परिणाम … Read more

देवेंद्र फडणवीसांना दिल्लीतील कामाला शुभेच्छा; जयंत पाटलांचा टोला

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानामुळे आम्हाला आनंद झाला. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत, हे यातून स्पष्ट होत आहे. त्यांच्या दिल्लीतील कामाला शुभेच्छा आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट … Read more

वारिस पठाण यांच्या विधानावर फडणवीस म्हणाले, भारतात १००कोटी हिंदू राहतात म्हणून अल्पसंख्याक सुरक्षित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्येएका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे. अशावेळी राज्याचे माजी … Read more

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळाला जामीन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक शपथपत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणातील सुनावणीसाठी फडणवीस नागपूर सत्र न्यायालयात हजर झाले होते. कनिष्ठ न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. ३० मार्च रोजी पुढच्या सुनावणीसाठी हजर रहावे लागणार आहे. … Read more

मराठवाड्याला हक्काचे पाणी दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू! देवेंद्र फडणवीस

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे मराठवाड्याला हक्काचे पाणी द्या! तसे न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, पण मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देऊ. असा इशारा परभणीतील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. परभणीमध्ये शुक्रवार दिनांक ७ जानेवारी रोजी संजीवनी कृषी महोत्सव राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. … Read more

परभणी कृषी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांची देवेंद्र फडणवीसांनी घेतली धावती भेट

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे मागील दोन दिवसापासून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धावती भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांकडून आपल्या मागण्यांचे निवेदन विरोधी पक्षनेत्यांना देण्यात आले. या प्रश्नी वैयक्तिक लक्ष देईल असे आश्वासन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे. आज परभणी … Read more

वाढत्या वजनामुळं फडणवीसांनी टाळला रबडी, कुल्फीचा मोह; नेमका काय आहे किस्सा

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढत्या वजनामुळं एका कार्यक्रमात मनावर दगड ठेवत रबडी, कुल्फीचा मोह टाळला. याबाबतची जाहीर कबुली खुद्द फडणवीस यांनी एका कार्यक्रमात दिली. ही घटना आहे पिंपरी-चिंचवडमधील.

काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का?; संजय राऊत यांच्या विधानानंतर फडणवीसांचा सवाल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पुण्यात एका कार्यक्रमामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीमलाला याला भेटायच्या असे विधान केले होते. त्यावरुन विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. संजय राऊत यांच्या विधानांवर काँग्रेसने खुलासा करावा, अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता केली आहे.