पुणे पदवीधर मतदारसंघात पदवीधरांनी नोंदणी करावी – प्रा. डॉ. बापू चंदनशिवे

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जुलै २०२० मध्ये होत असून पदवीधर व शिक्षक नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने दिलेली पहिल्या टप्प्यातील मुदत दि. ६ नोव्हेंबर रोजी संपली. यामध्ये शिक्षक मतदारसंघासाठी ५३,६४१ मतदारांची नोंदणी झाली असून सर्वाधिक यामध्ये पुणे १८७१४, सोलापूर १०९३९, कोल्हापूर १०७१४, सातारा ६९४१ तर सांगली जिल्ह्यात ६३२३ इतकी नाव नोंदणी झाली आहे. पदवीधर मतदार संघामध्ये पुणे ५९४१९, सोलापूर ३७७५१, कोल्हापूर ७५८२३, सातारा ५७४७३ तर सांगली जिल्ह्यात ७३७८८ इतकी नोंदणी झाली आहे. परंतु अजूनही अनेक पदवीधर व शिक्षक नोंदणीपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीसाठी समता फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांनी पत्राद्वारे सातारा व सोलापूर येथील निवडणूक अधिकाऱ्यांना मुदतवाढीसाठी आवाहन केले होते.

परभणीत उपमपौरांच्या घरावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची धाड

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून या दरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. परभणीचे उपमहापौर माजू लाला यांच्या शाही मस्जिद येथील निवासस्थानी बुधवारी संध्याकाळच्या सुमारास निवडणूक विभागाच्या पथकाने धाड टाकली

‘रस्त्यांवर सभा घेऊ द्या!’ निवडणूक आयोगाला ‘मनसे’ विनंती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पावसामुळं रद्द झाल्यानंतर मनसेनं रस्त्यावर सभा घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसं पत्र मनसेनं राज्य निवडणूक आयुक्तांना लिहिलं आहे. पाऊस लांबला असून, मैदानांत चिखल होत आहे. त्यामुळं सभा घेण्यात अडचणी येत आहेत, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

निवडणुकीतील गैरव्यवहारांची नागरिक देणार माहिती

अमरावती प्रतिनिधी। अमरावती विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैश्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी माहिती देण्याच आवाहन प्रधान प्राप्तीकर संचालक कार्यालयाचे उपसंचालक अभय नन्नावरे यांनी केले आहे. लोकशाहीच्या हा उत्सव लोकशाही मार्गाने पार पडावा म्हणून नागरिकांचा ही यांत सहभाग असावा या दृष्टीने हा निर्णय घेणार आल्याचे समजते आहे. काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी प्राप्तीकर विभागाच्या अन्वेषण … Read more

ईव्हीएम बंद झाल्याशिवाय परिवर्तन नाही- वामन मेश्राम

नाशिक प्रतिनिधी| ‘देश अराजकतेच्या दिशेने चालला आहे. लोकशाही पर्यायाने संविधान बदलवून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. भारतीय जनता पार्टीन 2014 व 2019 च्या दोनही निवडणुका ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून जिंकल्यात. यात देशातील निवडणूक आयोगही सहभागी असून सुप्रीम कोर्टान दिलेला निर्णय ही पाळत नाही. तेव्हा देशात हुकुमत कुणाची हे लक्षात आल पाहिजे. म्हणूनच ईव्हीएम बंद झाल्याशिवाय देशात परिवर्तन … Read more

महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजले, २१ ऑक्टोबर ला मतदान तर २४ ला निकाल

महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना आता वेग येणार आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात निवडून आचारसंहिता लागू केली आहे. तसेच राज्यातील वर्तमान विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार असून हा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असल्याने. निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर करत आजपासून महाराष्ट्रसोबत … Read more

दुष्काळी मदत देण्यासाठी महाराष्ट्रात आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचा दुष्काळ पडला असून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथिल करावी अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला लिहले आहे. महाराष्ट्रात १५१ तालुक्यामध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तर केंद्र सरकारने ४हजार ७१४ कोटी रुपयांची भरीव मदत दुष्काळग्रस्तांसाठी राज्य शासनाला वर्ग केली आहे. या निधीच्या वाटपासाठी आणि दुष्काळावर ठोस … Read more