संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर तो लांबविण्यासाठी होती – सुजय विखे पाटील 

अहमदनगर । देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काही नियम शिथिल करून देशातील संचारबंदी ३० जूनपर्यंत  आली आहे. गेल्या २ महिन्यापेक्षा अधिक काळातील संचारबंदीमध्ये हळूहळू नियम शिथिल केल्यामुळे रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.  मात्र भाजपाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाने  ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी ही संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर कोरोना लांबविण्यासाठी करण्यात आली असल्याचे … Read more

शोएब अख्तरकडून आफ्रिदीची थट्टा, पहा मजेशीर व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर वेगवान गोलंदाजीमुळे जसा परिचित आहे तसाच तो आपल्या हजरजबाबीपणासाठी सुद्धा ओळखला जातो. अलीकडेच त्याचा माजी सहकारी खेळाडू असलेला शाहिद आफ्रिदी हा त्याच्या या हजरजबाबीपणाचा बळी ठरला. अख्तरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आफ्रिदीची थट्टा करत असल्याचे दिसून येते आहे. शोएबने … Read more

PM किसान स्कीम । लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना मिळाले १९ हजार ३५० करोड रुपये; तुमचं नाव आहे का इथे करा चेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकर्‍यांना मोठा आधार म्हणून पुढे आली आहे. त्याअंतर्गत २४ जानेवारीपासून आतापर्यंत 9.67 कोटी शेतकर्‍यांना 19,350.84 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ही योजना सुरू होऊन 17 महिने झाले आहेत.  त्याअंतर्गत आतापर्यंत 5 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना पाठविण्यात … Read more

ट्रम्प यांच्या मध्यस्तीच्या प्रस्तावाला भारताने दिला नकार, म्हटले की,’हा सीमावाद ते शांततेने निकाली काढला जाईल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने भारतीय भूमीवर अतिक्रमण केल्यानंतर या दोन देशांमधील सुरु झालेला तणाव कायम आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत आणि चीनमधील हा सीमावाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, चीनबरोबरील हा प्रश्न शांततेने सोडवला जाईल, असे भारताने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. यात अमेरिकेचा हस्तक्षेप भारताला … Read more

शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना आता तिसरं पत्र; म्हणाले..

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एक पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या संकट काळात पवारांनी मोदींना लिहिलेलं हे तिसरं पत्र आहे. या पत्रात पवारांनी कोरोनामुळे बांधकाम व्यवसायावर आलेल्या संकटासंदर्भात मोदींचे लक्ष वेधले आहे. कोरोनामुळे मागील ३ महिन्यांपासून देशातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कामं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले … Read more

भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले,’ आम्ही मध्यस्थी करण्यास तयार आहोत’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमावादात हस्तक्षेप करत म्हंटले की,’ जर दोन्ही देश सहमत असतील तर यासाठी ते मध्यस्थी करण्यासाठी तयार आहेत. ५ मे रोजी सुमारे २५० चिनी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक उडाली त्यावरून लडाखमध्ये या दोन्ही देशांमधील परिस्थिती तणावग्रस्त बनली. या घटनेत भारतीय … Read more

लॉकडाऊनचा ५ वा टप्पा लागू होणार का? केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई । देशात कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात येताना दिसत नाही आहे. त्यातच आता लॉकडाऊनचा चौथा टप्पाही संपुष्टात येतो आहे. त्यामुळे, देशात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. अशा वेळी केंद्रीय गृह मंत्रालयानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. काही प्रसार माध्यम संस्थांकडून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. प्रसार माध्यमातून केले जाणारे लॉकडाऊन ५.० बद्दलचे … Read more

तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या बलबीरसिंग सिनिअर यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन आठवड्यांपासून विविध आजारांशी झगडत असलेले तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या बलबीरसिंग सिनिअर यांचे सोमवारी निधन झाले. बलबीर यांच्या पश्चात त्यांची मुलगी सुशबीर आणि तीन मुले कंवलबीर, करणबीर आणि गुरबीर असा परिवार आहे. मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक अभिजीत सिंग यांनी प्रेस ट्रस्टला सांगितले की,” सकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. … Read more

नुकसान १ लाख कोटींचं मदत १ हजार कोटींची; मोदींच्या पॅकेजवर ममता संतापल्या

कोलकाता । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अम्फान महाचक्रीवादळानं प्रचंड तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालला १ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याचं सांगत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवरचा आपला राग व्यक्त केला. अम्फान महाचक्रीवादळाचा तडाखा झेललेल्या पश्चिम बंगालची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याच्या … Read more

‘त्या’ गाण्याचं नरेंद्र मोदींनी ही केलं कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था थांबली आहे. यामुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक नागरिक आपल्या मूळ गावापासून लांब शहरात अडकून पडले आहेत.तर काही नागरिक हे आपल्या गावी पायी जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत … Read more