परभणीत वाळू माफिया निर्ढावले ! तहसीलदारावर केला प्राणघातक हल्ला

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीपात्रात  अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांच्या टोळ्या सक्रिय असून या टोळ्यांना पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाकडून प्रयत्न करण्यात येतोय .आज दुपारी असाच प्रयत्न करणाऱ्या  पाथरी तहसीलदारांच्या पथकावरच निर्ढावलेल्या वाळूमाफियांनी हल्ला चढवण्याचा प्रकार घडला असून नदीपात्रामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा फिल्मी स्टाईल पाठलाग केल्यानंतर तहसीलदार आणि वाळू … Read more

धक्कादायक! पोलीस पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे धारदार शस्त्राने पत्नीची हत्या करून, पतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना परभणी मध्ये घडली आहे. शहरातील खानापूर फाटा परिसरात राहणाऱ्या, युवकाने, त्याच्या पत्नीची हत्या केल्यानंतर, स्वतःचीही जीवनयात्रा संपवली आहे. या दांपत्याला एक ते दीड वर्षाचा मुलगा असून, घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. खानापूर फाटा परिसरात राहणाऱ्या कृष्णा माने या तीस … Read more

परभणी जिल्हयातील घरकुल लाभार्थ्यांना प्रशासन वाळू देणार का वाळू? वाळू विना घरकुल बांधकामे बंद

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे पक्क्या घरावीना झोपड्यात राहणाऱ्या गरिबांना हक्काचे घर मिळावं या उदात्त हेतूने घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून घरकुल योजना राबविल्या जाते. घरकुल देताना लाभार्थ्यांना निवड प्रक्रिया ते बांधकाम पूर्ण होई पर्यंत मात्र मोठ्या संकटातून जाव लागत. यातील ताज उदाहरण जिल्हात पहायला मिळत आहे. रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात … Read more

पाथरीत विविध विषयांवरील महिलांची मराठवाडा विभागीय विचारमंथन कार्यशाळा संपन्न

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे महिलाराज सत्ता आंदोलनाच्या माध्यमातून राजकिय क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार मुक्त, गावपातळीवरील निवडणुक या विषयावर विचारमंथन करण्यासाठी पाथरी येथे नुकतेच दोन दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा सर्वांगीन विकास व्हावा यासाठी मागील अनेक दिवसांपासुन महिलाराजत्ता आंदोलनाच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात येत आहे. यापुर्वी महिलांना आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती मिळावी … Read more

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशशिखरे गाठता येतात- खा.संजय जाधव

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे “जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, त्यासाठी मार्गदर्शन आणि कसलीही मदत करण्यास आम्ही तत्पर राहू” अशी ग्वाही खा.संजय जाधव यांनी दिली. ते सार्वजनिक शिवजयंतीनिमित्य आयोजीत सत्कार व गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते. शिवसृष्टी प्रतिष्ठान व राजे संभाजी प्रतिष्ठान … Read more

महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये तिजोरी फोडण्याचा प्रयत्न; पोलिस तपास सुरु

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जिल्ह्यात सध्या चोरांचा सुळसुळाट झाला असून गुरुवारी मध्यरात्री मानवत रोड येथे राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत बँकेतील तिजोरी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. मानवत तालुक्यातील मानवत रोड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६१ च्या बाजुला सेलू कॉर्नर जवळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे. आज महाशिवरात्री तर … Read more

पाथरी-मानवत मार्गावर दोन वाहनात समोरासमोर धडक; एक ठार एक जखमी

परभणी प्रतीनिधी । गजानन घुंबरे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर गुरुवारी रात्री वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या तयारीत असणाऱ्या पिकअप जीप व समोरून येणाऱ्या मॅक्स जीपमध्ये झालेल्या जोरदार धडकेत एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला असून यामध्ये जीपचा अक्षरशः चुराडा झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर पाथरी-मानवत मार्गावर अंजली लॉन्स समोर गुरुवार दि.२० फेब्रुवारी … Read more

गंगाखेड शहरात चोरीच्या घटनांत वाढ; कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बनला बिकट

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे गंगाखेड शहरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरटे चांगलेच निर्ढावले आहेत. सातत्याने होणाऱ्या चोरीला आळा बसवण्यामध्ये पोलीस यंत्रणा अपयशी झाली असताना, काल रात्री बाजारपेठेमध्ये मोबाईल शॉपी चे दुकान फोडून हजारोंचा माल लंपास करून चोरटे पसार झाल्याची घटना घडल्याने व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गंगाखेड शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा … Read more

परभणी जिल्ह्यात शिवप्रेमींच्या अलोट गर्दीसह उत्साहात शिवजयंती साजरी

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती परभणी जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात अभूतपूर्व, नेत्रदीपक व अतिशय भव्यदिव्य पद्धतीने उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी असणारे छत्रपती शिवरायांचे पूर्णाकृती पुतळे, प्रतिमा यांना आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई व विविध फुलांनी सजविण्यात आले होते. बुधवारी सकाळपासुन … Read more

परभणीत अवैधरित्या शस्त्र विकणाऱ्या औरंगाबादमधील चौघांना अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे सय्यद शहा तुराबूल हक्क उर्स परिसरात धारदार शस्त्र विकणाऱ्या टोळीवर छापा टाकत परभणी पोलिसांनी औरंगाबाद येथील चौघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेला शस्त्रसाठ्यासह रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे . तुराबुल हक्क दर्गा यात्रेमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठया प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येतो. अवैध धंद्यांची माहिती काढत कारवाई … Read more