कोरोना संक्रमणाच्या बाबतीत ब्राझील जगात २ ऱ्या क्रमांकावर; ३ लाख ३० जणांना बाधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेनंतर आता ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या जगात सर्वाधिक झाली आहे. आदल्याच दिवशी रशिया जगातील दुसर्‍या क्रमांकावर होता. १९९६९ नवीन कोरोना प्रकरणांच्या वाढीनंतर आता ब्राझील दुसर्‍या स्थानावर आला आहे. ब्राझीलमध्ये ३ लाख ३० हजार ८९० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अमेरिका आणि रशियामध्ये अनुक्रमे १६ लाख ४५ हजार आणि ३ … Read more

स्पेनमध्ये तब्ब्ल दोन महिन्यानंतर शंभरहून कमी मृत्यूंची नोंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था तसेच आरोग्य यंत्रणाही त्यामुळे ढासळल्या आहेत. अमेरिका, स्पेन, इटली, चीन हे कोरोनाने सर्वाधिक बाधित देश आहेत. या कोरोनाच्या संसर्गाचा फटका बसलेल्या स्पेनमधून तब्ब्ल दोन महिन्यानंतर एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. या बातमीमध्ये स्पेनमध्ये मृतांच्या संख्येत घट होत असल्याची माहिती देण्यात … Read more

फेसबुक पोस्ट ब्लाॅक करणार्‍यांच्या यादीत पाकिस्तान अव्वल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मने नुकतेच एका अहवालात असा खुलासा केला आहे की जगभरातील सरकारच्या विनंतीवरून गेल्या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यांत तब्बल १५,८२६ पोस्ट ब्लॉक केल्या गेल्या आहेत. रशिया, पाकिस्तान आणि मेक्सिको या देशांमध्ये सर्वाधिक पोस्ट ब्लॉक करण्यात आलेल्या आहेत. फेसबुकच्या मते, १ जुलै ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान रशियाच्या विनंतीवरून फेसबुक आणि … Read more

अमेरिकेत ८० हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत कोरोना विषाणूच्या साथीमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही ८० हजारांच्या पुढे गेली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने नुकतीच याबाबत माहिती दिली. कोविड -१९ च्या या संसर्गामुळे अमेरिकेत आतापर्यंत एकूण ८०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे, असे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अ‍ॅण्ड इंजिनियरिंगने (सीएसएसई) सोमवारी जाहीर केलेल्या एका आकडेवारीत … Read more

कोरोना संदर्भात रशियन सरकारवर टीका करणारे तीन डॉक्टर पडले रहस्यमय अपघातांना बळी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियामध्ये अचानक कोरोना विषाणूची प्रकरणे वाढली आहेत, ज्यामुळे वैद्यकीय कर्मचार्‍यांची अवस्था आणखी बिकट झालेली आहे.इथे रूग्णांची तपासणी करण्यासाठीही वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नाहीत. यानिमित्ताने डॉक्टर सतत सरकारवर टीका करीत असून या टीकेच्या बदल्यात त्यांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन आठवड्यांत रशियातील ३ डॉक्टर हे रुग्णालयाच्या खिडकीतून खाली पडले आहेत, त्यातील … Read more

रशियामध्ये कोरोनाचा हाहाकार;गेल्या २४ तासांत १०,००० पेक्षा जास्त नवीन संसर्गाची नोंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी रशियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची १०,००० पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली.यासह,या देशात प्रथमच कोविड -१९ रूग्णांच्या संख्येत एका दिवसात पाच अंकी वाढ झाली आहे.येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की १०,६३३ नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे हि मॉस्कोमधून समोर आलेली आहेत.यामुळे मॉस्कोची वैद्यकीय सुविधा बिघडण्याच्या शक्यतेत वाढ झाली आहे.उल्लेखनीय हे आहे की … Read more

चिंताजनक! चीन मध्ये कोरोनारुग्णांच्या संख्येत पुन्हा होतेय वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या ४६ नवीन प्रकरणांपैकी १० प्रकरणे स्थानिक संसर्गाशी संबंधित आहेत. आरोग्य तज्ञांनी परदेशातून येणाऱ्या नागरिकांबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हणाले की, येत्या काळात रशियाच्या पूर्वेकडील सीमेवर असलेले शहर दुसरे वुहान होऊ शकेल. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) बुधवारी सांगितले की या ४६ नव्या घटनांमध्ये चीनमध्ये परतलेले बहुतेक नागरिक परदेशातील आहेत. … Read more

रशियाची ग्लॅमरस टेनिसपटू शारापोव्हाने लॉकडाउनला कंटाळून शेअर केला थेट फोन नंबर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.जगभरातील लाखो लोकांना कोरोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी लढा द्यायचा प्रयत्न करत आहे.त्यासाठी अनेक उपाययोजनाही राबवण्यात येत आहेत.कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.कोरोनाचा फटका क्रीडा जगतालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अनेक … Read more

राष्ट्रपती पुतिन यांना भेटलेल्या डाॅक्टरची कोरोना चाचणी आली पोझिटीव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मॉस्कोमधील कोरोनाव्हायरस रुग्णालयाच्या प्रमुखांना या विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. एका आठवड्यापूर्वी त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली होती. क्रेमलिन म्हणाले की, राष्ट्रपतींची प्रकृती ठीक आहे.गेल्या मंगळवारी, डेनिस प्रोटेसेन्को यांनी रुग्णालयाच्या तपासणी दरम्यान पुतीन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाचा प्रोटेक्टिव सूट घातला होता. तथापि, नंतर मात्र ते कोणत्याही … Read more

कोरोनामुळे झालेल्या विध्वंसचा परिणाम, कच्चे तेल १७ वर्षाच्या नीचांकावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे उद्भवणारे संकट संपताना दिसत नाही, त्यामुळे आशियाई बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमत सोमवारी १७ वर्षाच्या नीचांकावर पोचली आहे.अमेरिकेमध्ये वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट ५.३ टक्क्यांनी घसरून २० डॉलर प्रति बॅरल आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणित ब्रेंट क्रूड ६.५ टक्क्यांनी घसरून २३ डॉलरवर आला. कोरोना विषाणूमुळे जगभरात जवळजवळ ३३,००० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि … Read more