हा तर मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास – सुप्रिया सुळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या दोन्ही मतदारसंघात भाजपला खिंडार … Read more

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय ; भाजपचा पराभव

Arun Lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होत आहे. दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघात (Pune graduate constituency election) महाविकास आघाडीचे अरुण लाड (Arun Lad) यांचा दणदणीत विजय झाला आहे आहे. अरुण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव केला असून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून मतमोजणी केंद्राबाहेर  जल्लोष … Read more

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का?? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी काळात कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नव्हे, तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील, असा दावा करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्याचे दिसून आले. मात्र, सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही, त्यांना राष्ट्रीय … Read more

फडणवीसांच्या ‘त्या’ त्रुटीमुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती ; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असून भाजप कडून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातच उदयनराजे भोसले यांनी सरकारवर ताशेरे ओढले होते. देवेंद्र फडणवीस यांना सत्ता द्या, मी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो असे खासदार उदयनराजे म्हणत आहेत, त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस … Read more

 दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे ; जयंत पाटलांचे राणेंना चोख प्रत्युत्तर

Narayan Rane Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले नसते तर, जयंत पाटील भाजपमध्ये आले असते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती. असा गौप्यस्फोट भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार आहे,’ अस नारायण राणे म्हणाले होते.त्यांच्या या विधानाला मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या फेसबुक … Read more

12 महिने झाले तरी त्यांचे 3 महिने संपेना ; रोहित पवारांचा रावसाहेब दानवेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला 12 महिने पूर्ण झाले तरी यांचे 3 महिने काही संपेना’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे. ‘येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल असा दावा रावसाहेब दानवे यांनी परभणीत केली होती. त्याला आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर … Read more

कार्यकुशल आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपले ; भारत भालके यांच्या निधनानंतर शरद पवारांनी व्यक्त केली हळहळ

bharat bhalke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात कोरोना मुळे निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज पंढरपुरातील सरकोली येथे अंत्यसंस्कार केले जातील. भारत भालके यांचे अस अकाली जाणे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसह दिग्गज नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या … Read more

सर्वसामान्यांचा नेता ते हॅट्रिक आमदार ; जाणून घ्या भारत भालकेंची कारकीर्द

Bharat bhalke

सोलापूर । पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी चर्चा सुरु झाली आहे. भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या बळावरच विधीमंडळाच्या सदस्यत्वाची म्हणजेच आमदारकीची हॅटट्रिक मारली. त्यांची ओळख जनसामान्यांचा नेता अशीच राहिली. त्यांनी तालुक्याच्या राजकारणात 1992 मध्ये सक्रिय सहभाग घेतला. ते … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

bharat bhalke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते.त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री … Read more

105 आमदार असलेल्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो यालाच लोकशाही म्हणायचं ; धनंजय मुंडेंचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर मतदारसंघ निवडणूक चुरशीची होत असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. “64 आमदार असलेल्या पक्षाचा इथे मुख्यमंत्री होतो, 54 आमदार असलेल्या पक्षाचा इथे उपमुख्यमंत्री होतो … Read more