Sunday, April 2, 2023

12 महिने झाले तरी त्यांचे 3 महिने संपेना ; रोहित पवारांचा रावसाहेब दानवेंना टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला 12 महिने पूर्ण झाले तरी यांचे 3 महिने काही संपेना’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे. ‘येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल असा दावा रावसाहेब दानवे यांनी परभणीत केली होती. त्याला आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपले 105 आमदार कुठे जाऊ नयेत म्हणून भाजपचे नेते असं वक्तव्य करत आहेत असं रोहित पवार म्हणाले.

निवडणुकीच्या काळात भाजप वाल्यांनी भरमसाठ पैसा खर्च केला आणि कोरोनाच्या काळात घरात बसायचं. ही भाजपची विचारसरणी आहे, अशी टीकाही रोहित पवार यांनी केलीय. बारा महिने झाले तरी यांचे तीन महिने संपणार नाहीत. फक्त आपले 105 आमदार कुठे जाऊ नयेत म्हणून भाजपचे नेते असं वक्तव्य करत असल्याचं, रोहित पवार म्हणाले.

- Advertisement -

नक्की काय म्हणाले होते रावसाहेब दानवे ??

येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’