शिवसेनेशी आमचं अजूनही भावनिक नातं कायम- चंद्रकांत पाटील

सांगली प्रतिनिधी । दोन भाऊ भांडून वेगळे रहात असले तरी शिवसेनेशी भावनिक नाते कायम आहे. त्यामुळे भविष्यकाळात भाजप-शिवसेना एकत्र येतील का? की येणार नाही, हे काळच ठरवेल, असं विधान मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. महाविकास आघाडीने आमच्या कारभाराच्या चौकशीची भिती दाखवू नये, चौकशीला आम्ही घाबरत नाही, चौकशी करा पण त्याचा तत्काळ अहवाल सादर … Read more

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, उद्धव ठाकरे घेणार लालकृष्ण अडवाणींची भेट

दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मोदींच्या भेटीनंतर ठाकरे भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार असल्याचे समजत आहे. ठाकरे यांची अडवाणी भेट मास्टरस्ट्रोज असल्याचं बोललं जात आहे. लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे पहिल्या फळीतील नेते असून शिवसेनेसोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. अडवाणी अलीकडील काही काळात मुख्यप्रवाहापासून थोडे … Read more

इन्शुरन्सच्या बनावट पावत्या देऊन रिक्षा व्यवसायिकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करा! कोल्हापूर शिवसेनेची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर  इन्शुरन्सच्या बनावट पावत्या देऊन सर्वसामान्य रिक्षा व्यवसायिकांची लूट केल्याचा प्रकार कोल्हापूरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरटीओ कार्यालयातील दलाल व यामध्ये सहभागी असणार्या रिक्षा संघटनेचा पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहर शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे लेखी निवेदन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना देण्यात आले. शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण … Read more

एखाद्याच्या पाठीत गोड बोलून खंजीर कसा खुपसायचा हे मी ‘यांच्या’कडून शिकलो असं म्हणत भुजबळांनी शिवसेना का सोडली?

छगन भुजबळ. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील ३५ वर्षांपासून आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं नाव. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायेत आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरु करणाऱ्या छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील गावागावात शिवसेना पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. असं असताना छगन भुजबळांचं शिवसेनेशी नेमकं काय बिनसलं? बाळासाहेबांना न जुमानता ते दुसऱ्या पक्षात कसे गेले? वाचा ही खास स्टोरी.

‘मी झेंड्याचा रंग बदलला, रंग बदलून सरकारमध्ये गेलो नाही!’; राज ठाकरेंनी लगावला शिवसेनेला टोला

राज ठाकरे यांनी आज मनसेच्या महाधिवेशनाची सुरुवात मराठी बांधवानो अशी न करता माझ्या तमाम हिंदू बंधुनो अशी केली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना झेंडा आवडला का असा प्रथम सवाल केला. कार्यकत्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळताच राज ठाकरे यांनी अधिवेशनाला झेंड्याचा रंग बदलला म्हणून मी रंग बदलणार नाही. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसल्याचा टोला शिवसेनेला लगावला.

सत्तावाटपात मिळालेल्या अधिकारांत शरद पवारांचा मास्टरप्लॅन, कार्यकर्त्यांना दिली चतुसुत्री

सामाजिक न्याय विभागात जोमाने काम करु, अल्पभूधारकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध करुन देऊ, महिलांसाठी चांगल्या योजनांची अंमलबजावणी करुया आणि विविध संघटनांचं काम करणाऱ्या लोकांना बळ देऊया असा संदेश शरद पवारांनी दिला आहे.

शिवसैनिकाने जोपासला अनोखा छंद; जतन केले पंचवीस वर्षातील सामनाचे सर्व अंक

4 जुलै 1989 पासून ते आजपर्यंत यांनी दैनिक सामनाचे अंक जतन करून ठेवले आहेत. 23 जानेवारी 2012 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची रुद्राक्षतुला करणेत आली त्यावेळी 62 किलो रुद्राक्षांची संख्या 22234 अशी होती. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादीरुपी हे रुद्राक्ष महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वितरित करण्यात आली. महेश पाटील यांनी मुंबई ला जाऊन दोन रुद्राक्ष घेतले असुन आजही ते भकतीभावाने जपुन ठेवले आहेत. शिवसेना प्रमुखांच्या 1994 ते 2010 पर्यत दसरा मेळाव्यातील झालेल्या भाषणाच्या कॅसेट ही त्यांचेकडे आहेत.

सत्तेचा प्रस्ताव देताना कोण होत त्यांची नावं उघड करावी; शिवसेनेचे पृथ्वीराज चव्हाण यांना आवाहन

पृथ्वीराज चव्हाण यांना हा प्रस्ताव कोणी आणि कधी दिला हे माहिती नाही. हा प्रस्ताव देताना चर्चेसाठी कोण उपस्थित होतं त्यांची नावं उघड केली जावीत. याबद्दल पृथ्वीराज चव्हाणच जास्त माहिती देऊ शकतात,” असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

मुंबईकरांना दिलासा! वाडिया रुग्नालय नेहमीप्रमाणे सुरु राहणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरू राहण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे वाडिया रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे असे ठाकरे य‍ांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय … Read more

शिवभोजन योजनेला मिळाला मुहूर्त; २६ जानेवारीपासून १० रुपयात मिळणार जेवण

शिवसेनेच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ २६ जानेवारी २०२० रोजी होणार आहे.याबाबतची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. आपल्या खात्याच्या आढावा बैठकीत छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली.