मुख्यमंत्री शिवसेनेचा मात्र सत्तेचा रिमोट शरद पवारांच्याच हातात

मुंबई | काँग्रेससोबत आघाडी असतानाही शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची मागणी कधीही केली नव्हती. एकदा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा काँग्रेसहून अधिक होत्या, तरीही पवारांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला नव्हता. एका मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात अधिक मंत्रिपदे मिळत असतील, तर पक्षाच्या वाढीसाठी ते अधिक महत्त्वाचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे. यावेळीही मुख्यमंत्रिपद पूर्ण काळ शिवसेनेला देऊन, राष्ट्रवादी काँग्रेसने त्या बदल्यात … Read more

पाटणचे आमदार शंभुराज देसाईंना राज्यमंत्रीपद

सातारा प्रतिनिधी | महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची यादी नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये अनेक नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. देसाई यांना राज्यमंत्री पद दिल्याने पाटण तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. देसाई हे तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. याबरोबरच … Read more

आदित्य ठाकरे यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश

मुंबई | पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांचा समावेश होणार की नाही अशी चर्चा सुरू होती. अखेर आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांना राज्यमंत्री पद मिळेल अशी शक्यता असताना … Read more

महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही मुख्यमंत्री ‘धनुष्यबाणाचा’च

झारखंड | झारखंड विधानसभेचा निकाल आज लागला. येथे झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने आघाडी घेतली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. हेमंत सोरेन यांनी लालूप्रसाद यादव आणि कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. तसेच, झारखंडच्या आदिवासी गरीब जनतेने भाजपला नाकरल्याची प्रतिक्रिया सोरेन यांनी दिली आहे. 2019 मध्ये भाजपने … Read more

…म्हणून कोणी ‘ठाकरे’ होत नाही; अमृता फडणवीस

मुंबई | माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली … Read more

…म्हणून मी संघ सोडून शिवसैनिक झालो : शरद पोंक्षे

कल्याण | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडून बाळासाहेबांचा शिवसैनिक होण्याचे कारण सांगताना अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दंड चालवायला शिकवतात. पण मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात. म्हणून आपल्याला ते पटत नाही. कल्याणमध्ये अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदुत्वाविषयी बोलताना पोंक्षे म्हणाले, “मराठी ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे, असे म्हटल्याने … Read more

बाळासाहेबांना शब्द दिलाय, भाजपची पालखी कायम वाहणार नाही – मुख्यमंत्री ठाकरे

नागपूर प्रतिनिधी | सध्या नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. गेले तीन दिवस हे अधिवेशन शेतकरी कर्जमाफी, सावरकर आदी विषयांनी प्रचंड गाजले. आजही सभागृहात तेच चित्र पाहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला केला. मी काही भाजपची कायम पालखी वाहणार नाही, हा शब्द मी बाळासाहेबांना … Read more

शिवसेनेने विचार करून राज्यसभेत मतदान करावं- कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेनं पाठिंबा दिल्यानंतर राज्यात सत्तेत सहभागी काँग्रेसने काहीसा नाराजीचा सूर लगावला आहे. यागोष्टीला नमूद करताना राज्याचे कॅबिनेट मंत्री काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला मोलाचा सल्ला देणारी प्रतिक्रिया माध्यमांत दिली आहे.

..तर शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळी भूमिका घेईल- संजय राऊत

‘आमच्या पक्षाध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळी भूमिका घेईल’ असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज बुधवारी माध्यमांशी बोलताना केलं. ‘या विधेयकासंबंधी आमच्या मनात काही शंका आहेत, त्या दूर कारण्यासंदर्भांत समाधानकारक ऊत्तरे नाही मिळाल्यास आम्ही राज्यसभेत थेट लोकसभेत घेतलेल्या भूमिके विरुद्ध भूमिका घेऊ’ असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी माध्यमांसमोर दिले.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन शिवसेनेने संधीसाधू राजकारण केलं आहे- ओवेसी

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने शिवसेनेने मतदान केल्यानं त्यांच्या भूमिकेवर आता एआयएमआयएमचे खासदार असद्दुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. शिवसेनेचे भांगडा राजकारण सुरु आहे असा शाब्दिक वार करत ओवेसी यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.