‘या’ कारणामुळे उद्धव ठाकरें समोर वृद्ध शेतकरी ढसाढसा रडला

लातूर प्रतिनिधी | शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची व्यथा उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडताना एका वृध्द शेतकऱ्याने हंबरडा फोडला. नांदेड जिल्ह्यातील कंधार मधल्या किरोळा इथं उद्धव ठाकरे हे बाधित पिकांची पाहणी करण्यासाठी गेले असता तिथे एका शेतकर्‍याने ठाकरे यांच्यासमोर ढसाढसा रडायला सुरवात केली. … Read more

‘ई-नाम’ ची अंमलबजावणी केव्हा? शेतकऱ्यांचा शासनाला सवाल

शेतमालाची देशभरातील आवक कळावी. सोबतच सर्व बाजार समित्या एकमेकांशी जोडल्या जाऊन एकच राष्ट्रीय बाजार निर्माण व्हावा. व्यापाऱ्यांना राज्याबाहेरील शेतमालाची ऑनलाईन व्यवहाराद्वारे खरेदी करता यावी. या उद्देशाने केंद्र सरकारने ‘ई-नाम’ ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणली. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत योजना कार्यान्वित झालीये. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी अजूनही झाली नाही. त्यामुळं योजनेची अंमलबजावणी केव्हा होणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

शेतकर्‍यांचे उभे पीक केले उद्धवस्त, शिवबाच्या राज्यात वनाधिकाऱ्यांचे तुघलकी वागणे

अहमदनगर प्रतिनिधी | मुघलांनाही लाजवेल असे काम कर्जत तालुक्यात वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी केले आहे. केवळ वन जमिनीवर भात लागवड केली म्हणून आदिवासींचे उभे पीक या अधिकाऱ्यांनी संगनमताने उध्वस्त केले आहे. माझ्या राज्यातील रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये अशी शिवनीती होती. सध्याचे राज्यकर्ते उठताबसता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात आणि काम मात्र त्याच्या … Read more

तीन टप्प्यातील ‘एफ.आर.पी’ च्या वक्तव्याबाबत शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांना विचारला जाब

कोल्हापूर प्रतिनिधी । साखर आयुक्तांच्या तीन टप्प्यातील एफ आर पी च्या वक्तव्याचा जाब शेतकरी संघटनांकडून साखर आयुक्तांना आज विचारण्यात आला. तसेच थकीत एफ आर पी आणि 15% व्याज दिल्याशिवाय या हंगामात कोणत्याही कारखान्यास गाळप परवाने देऊ नयेत अशी विनंती आज जय शिवराय किसान मोर्चा आणि बळीराजा शेतकरी संघटना यांच्या प्रमुखांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना … Read more

महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘जागतिक बँक व आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्याने पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि महापुराचा कसल्याेही प्रकारचा फटका बसणार नाही. याच वेळी वीज, रस्ते , पाणी या मूलभूत सुविधा अव्याहतपणे कार्यरत राहणारे नियोजन केले जाणार आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी … Read more

दीड एक्कर उभ्या सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्याने घातला नांगर

अहमदनगर प्रतिनिधी| सोयाबीन पिकाला वेळेवर पाणी मिळाले नसल्यामुळे सोयबीनच्या झाडाला शेंगाच आल्या नाही त्यामुळे दीड एक्कर सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घालून नांगरून टाकले शिर्डी जवळच्या केलवड गावातील शेतकरी नानासाहेब धोंडिबा फटांगरे यांनी आपल्या दिड एकर सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घातला. पावसाचे दिवस संपत आले तरी देखील शेती लायक पाऊस झाला नाही.त्या मुळे उभ्यापिकात नांगर घालण्याची वेळ शेतकऱ्यावर … Read more

विरोधी पक्ष नेते दाखवा आणि बक्षीस मिळवा ; रघुनाथदादा पाटील

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे काँग्रेस आघाडीच्या भ्रष्ट सरकारला कंटाळून शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्यात भाजप-सेना युतीचा पर्याय निवडला. मात्र मागील पाच वर्षात सरकारचे धोरण बदलले नाही, शेतकरी विरोधात कायदे केले. शेतमालाचे दर पाडण्यात आले. देशात आर्थिक मंदी आली असून शेतकरी कामगार कष्टकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी कोल्हापुरात मंगळवारी शेतकरी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात … Read more

जो पर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत विसर्जन नाही, शेतकर्‍यांचे बाप्पासमोरच उपोषण

सोलापूर प्रतिनिधी | लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यासाठी राज्यभरात जोरदार जल्लोष सुरु असतानाच इकडे पंढरपूर तालुक्यात मात्र पाण्यासाठी शेतकर्यांनी गणरायापुढेच उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत नीरा कालव्यातून पाणी मिळत नाही तो पर्यंत गणपती बाप्पाचे विसर्जन करणार नाही असा पवित्रा येथील शेतकर्यांनी घेतल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून पंढरपूर,सांगोला आणि माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पाऊस नसल्याने शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे भीमा आणि नीरा नदीला पुर आलेला असतानाच दुसरीकडे मात्र याच भागातील शेतकर्यांना पाण्यासाठी गणपती बप्पासमोरच आंदोलन कऱण्याची वेळ आली आहे.

गणपती बप्पाचे विसर्जन करण्यासाठी अनेक गावात पाणीच नसल्याने गणरायाचे विसर्जन कसे करायाचे अशी चिंता देखील गणेश भक्तांना लागली आहे,अशातच आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी, उंबरगाव, कासेगाव, या भागातील शेतकर्यांनी चक्का गणरायासमोरच उपोषण सुरु केले आहे.इतकेच ऩाही तर पाणी मिळाल्याशिवाय गणरायाचे विसर्जन करणार नाही असा इशारा येथील शेतकरी सचिन ताटे यांनी दिला आहे. पाण्यासाठी गणरायाचे विसर्जन थांबविण्याची वेळ या भागातील शेतकर्यांवर पहिल्यांदाच आल्याने येथील शेतकर्यांच्या उपोषणाची परिसरात चर्चा सुरु झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

दंगल गर्ल बबिता फोगाटचा पोलिस दलातून राजीनामा, भाजपकडून लढणार विधानसभा

आता कार्ड जवळ नसेल तरीही ATM मधून पैसे काढता येणार, पहा काय आहे प्रक्रीया

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

इकडे आड तिकडे विहीर ; राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या अडचणीत वाढ

 

शेतकऱ्याच्या मृत्यूस जबाबदार असणारा तलाठी अखेर निलंबित ; ७ /१२ वरील नाव कमी झाल्याने शेतकरी हृदयविकार झटक्याने झाला होता मृत

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे  सातबारा उताऱ्यावरील नाव वगळण्यात आले असल्याने पीक विमा कसा भरणार या चिंतेत असणाऱ्या तुरा येथील शेतकऱ्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तलाठी यांच्या खासगी कार्यालयांमध्ये मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी जागीच मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना पाथरीत घडली होती. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करून कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची या घटनेनंतर जमलेल्या … Read more

भेंडी बियाण्यात फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीला शेतकऱ्यांनी शेतातच ठेवले डांबून

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी,  तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील शेतकऱ्यांची औरंगाबाद येथील नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड या बियाने कंपनीने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. भेंडीची लागवड करुन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही भेंडीला फुले व फळे लागत नसल्यामुळे शेतकरी हवालदिक झाले आहेत.शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी भेंडी प्लॉट ची स्थळ पाहणी करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या … Read more