अफगाणिस्तानच्या पंजशीरवर संपूर्ण जगाचे लक्ष का आहे? तालिबानला इशारा देणारा अहमद मसूद कोण आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । सध्या संपूर्ण जगाचे लक्ष अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यावर आहेत. येथे अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूदने तालिबान्यांना हुसकावून लावण्यासाठी आपले सैन्य तयार करण्यास सुरुवात केली आहे. अहमद, जो भारतातील चंदीगड येथून शिकला आणि मूळचा पंजशीरचा आहे, तो सध्या तेथे उपस्थित आहे. तो पंजशीर खोऱ्याच्या जंगल परिसरात आहे आणि इथेच अहमद मसूदने तळ ठोकला … Read more

अमेरिकेच्या अशा 5 चुका ज्या अफगाणिस्तानच्या अंगलट आल्या

नवी दिल्ली । अफगाणिस्तानात तालिबानने ज्या वेगाने राजधानी काबूल काबीज केली ते पाहून अमेरिकेलाही धक्का बसला. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या विरोधात 20 वर्षे युद्ध लढले. अमेरिका अफगाणिस्तान सोडण्यासाठी कोणताही युक्तिवाद करू देत. आज जगाला असे वाटते की, अमेरिकेने एक प्रकारे अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात दिले आहे. अमेरिकन संस्थेच्या स्पेशल इन्स्पेक्टर जनरल फॉर अफगाणिस्तान रिकन्स्ट्रक्शन (SIGAR) च्या रिपोर्टमध्ये … Read more

अमेरिकेला मदत करणाऱ्यांना घरोघरी शोधत आहे तालिबान, कुटुंबांना ठार मारण्याची दिली धमकी

काबूल । अफगाणिस्तानात तालिबान परतल्यानंतर सर्व काही बदलले आहे. जरी तालिबानने सर्वसामान्यांसाठी माफीची घोषणा केली असली आणि त्याने कोणावरही सूड घेणार नाही असा दावा केला असला तरी वास्तव वेगळे आहे. ज्यांनी अमेरिकन आणि नाटो सैनिकांना मदत केली त्यांचा तालिबानी सैनिक शोध घेत आहेत. तालिबानने अशी एक हिट लिस्टच बनवली आहे. अमेरिकेचे सहकारी पुढे आले नाहीत … Read more

अफगाण दूतावासाचे सर्वोच्च न्यायालयाला आवाहन,”देशात गोंधळ, सुनावणी 6 आठवड्यांनी पुढे ढकलावी”; प्रकरण जाणून घ्या

suprim court

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, अफगाणिस्तान दूतावासाने 6 आठवड्यांचा वेळ मागितला आहे. न्यायालयात आपली बाजू मांडताना दूतावासाने म्हटले की,” त्यांच्या देशातील परिस्थिती अजिबात चांगली नाही, सर्वत्र अराजकता आहे. म्हणूनच या प्रकरणाची सुनावणी 6 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी. वास्तविक, प्रकरण केएलए कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीसह अफगाणिस्तान दूतावासाच्या वादाशी संबंधित आहे. या कंपनीने दिल्लीत अफगाणिस्तान … Read more

तालिबान नेत्यांची घोषणा,”हिंदू – शीख प्रत्येकाला सुरक्षा देणार, सूड घेतला जाणार नाही”

काबूल । अफगाणिस्तानात दोन दशकांनंतर तालिबान परतला आहे. यानंतर तेथील लोक घाबरले आहेत. भीतीने लोकांना कोणत्याही प्रकारे देश सोडून जायचे आहे. काही लोकांनी गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे. दरम्यान, काबुलमध्ये असलेल्या गुरुद्वाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तालिबानचे नेते काबूलमधील गुरुद्वारा साहिबमध्ये पोहोचल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह … Read more

अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर म्हणाले,”देशात परकीय चलन साठा उपलब्ध नाही”

money

काबूल । अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरने म्हटले आहे की,” देशाचे सुमारे 9 अब्ज डॉलर्सचे चलन साठा परदेशात आहे.” ते म्हणाले की,”देशात रोख स्वरूपात कोणतेही परकीय चलन उपलब्ध नाही.” अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेचे प्रमुख अजमल अहमदी यांनी बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली. ते म्हणाले की,”देशातील $ 9 अब्ज पैकी $ 7 अब्ज अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बॉण्ड्स, … Read more

तालिबानवर सोशल अ‍ॅटॅक ! WhatsApp अकाउंट्स करणार ब्लॉक, फेसबुक आणि यूट्यूबवरही घातली जाणार बंदी

वॉशिंग्टन । सोशल मीडिया कंपनी फेसबुक देखील तालिबानच्या विरोधात मोठ्या कारवाईची तयारी करत आहे. कंपनीने म्हटले आहे की,” ते तालिबानच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सवर बंदी घालणार आहेत, कारण ते त्यांना दहशतवादी संघटना मानतात. मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तालिबान्यांना रोखण्यासाठी फेसबुक अफगाण तज्ञांची मदत घेईल. फेसबुकने ‘डेंजरस ऑर्गनायझेशन पॉलिसीज’ अंतर्गत तालिबानला त्यांच्या सर्व सर्व्हिसवर बंदी घातली आहे. तालिबानने कंपनीच्या या … Read more

अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गव्हर्नर सलीमा मजारी तालिबानच्या ताब्यात, तालिबान्यांविरोधात तयार केले होते स्वतःचे सैन्य

काबूल । अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबान एका बाजूला सरकार बनवण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे, वॉरलॉर्ड्सना शोधून शोधून पकडले जात आहे. वॉरलॉर्ड्स इस्माईल खानला तालिबान्यांनी पहिल्यांदा पकडले. आता त्यांच्या सैनिकांनी अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गव्हर्नर सलीमा मजारी यांना ताब्यात घेतले आहे. मजारी या बल्ख प्रांतातील चारकिंट जिल्ह्याच्या गव्हर्नर आहेत. तालिबानशी लढण्यासाठी त्यांनी स्वतःचे सैन्य तयार केले होते … Read more

अफगाणी विद्यार्थी महाराष्ट्रात सुखरूप, त्यांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचवणार;आदित्य ठाकरेंनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय पातळीवर धक्का देणारी घटना नुकतीच घडली आहे. तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शिक्षणासाठी असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांची आज राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्याशी चर्चाही केली. हे विध्यार्थी महाराष्ट्रात सुखरूप असून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या केंद्र … Read more

“तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला, महाराष्ट्रालाही सतर्क रहायला हवं”; निलेश राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय पातळीवर धक्का देणारी घटना नुकतीच घडली आहे. तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले आहे. संपूर्ण जगामध्ये चर्चेत असणाऱ्या या विषयावरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणावरुन एक इशारा दिला आहे. “महाराष्ट्राला जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही … Read more