परदेशी अडकलेल्या १४ हजार ८०० भारतीयांना एअर इंडिया करणार ‘एअरलिफ्ट’

नवी दिल्ली । भारत सरकारनं कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या १४ हजार ८०० भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी एक योजना आखली आहे. याद्वारे ७ मे ते १३ मे दरम्यान 64 उड्डाणं आखत ही योजना अमलात आणली जाणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या उड्डाणांचं संचालन एअर इंडिया आणि त्यांची सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेस करणार आहे. … Read more

केंद्र सरकारचे आदेश डावलून विमान कंपन्यांची तिकिट बुकिंग सुरु

नवी दिल्ली । केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जोपर्यंत करोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात येत नाही तोपर्यंत एकही विमान उड्डाण घेणार नाही, असे स्पष्ट केले होते. सध्या देशात करोना विषाणूची साथ रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र तरीही विमान कंपन्यांकडून मे आणि जून महिन्यातील आगाऊ तिकीट बुकिंग स्वीकारली जात असल्याचे समोर … Read more

३ मे नंतर एअर इंडिया पुन्हा उड्डाण घेणार? ठराविक डोमेस्टिक फ्लाईटसाठी बुकिंग सुरू

नवी दिल्ली । लॉकडाऊन लागू झाल्यापासून आंतराष्ट्रीय तसेच घरघुती विमानसेवा पूर्णपणे बंद आहे. विमान सेवेप्रमाणेच रेल्वे, विमान सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. या दरम्यान,या सेवा नेमक्या कधी सुरु होणार याबद्दल प्रश्नचिन्ह असताना आज एअर इंडियानं 3 मे नंतर काही ठराविक डॉमेस्टिक फ्लाईटचं बुकिंग सुरु केल्याचं म्हटलं आहे. एअर इंडिया वेबसाईटच्या होमपेजवर असा मेसेज आहे. त्यात … Read more

हा कोरोना तर कुणाल कामराचा मित्र निघाला, शशी थरुर असं का म्हणतायत पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत जगभरात कोरोनाव्हायरसच्या १८,००,००० प्रकरणांची नोंद झाली आहे. भारतासह बर्‍याच देशांमध्ये या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. फ्लाइट, गाड्या धावत नाही आहेत. भारतातही २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे ज्या अंतर्गत सर्व प्रकारच्या गाड्या बंद आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या परिस्थितीला प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या … Read more

आता विमानप्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, ३ टक्क्यांनी तिकीट दर वाढणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन उघडल्यानंतर महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवाई प्रवासाचे भाडे अनेक पटींनी वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सोशल डिस्टंसिंग लक्षात घेऊन एअरलाइन्स आपला प्रवास एकूण जागेच्या एक तृतीयांश ऑक्यूपेंसीसह ऑपरेट करतील,ज्यामुळे आधीच्या तुलनेत हवाई प्रवासावर ३ पट जास्त खर्च करावा लागेल. विमान वाहतूक प्राधिकरण एका नवीन विकल्प लागू … Read more

एअर इंडियासाठी बिड डेडलाईन वाढू शकते, कोरोना संकटामुळे शक्य निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटामुळे एअर इंडियाच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या खरेदीसाठी बोली लावण्याची अंतिम तारीख ३० एप्रिलपर्यंत वाढू शकते. बुधवारी ही माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की,या साथीच्या रोगामुळे जागतिक स्तरावरील आर्थिक घडामोडीवर वाईट परिणाम झाला आहे, ज्यामुळे एअर इंडियासाठीच्या बोलीची तारीख वाढविली जाऊ शकते. कर्जबाजारी नॅशनल एव्हिएशन कंपनीतील हिस्सा विकण्याची प्रक्रिया सरकारने २७ … Read more

निर्दोष ‘कुणाल कामरा’चे एअर इंडियाने तिकीट रद्द केलं, नंतर आपली चूक कबूल करत प्रवास करण्यास परवानगी दिली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कॉमेडियन कुणाल कामरावर देशाच्या चार विमान कंपन्यांनी विमान प्रवासाची बंदी घातली आहे. परंतु त्याच्या वरील बंदीचा एका व्यक्तीला फटका बसला आहे. योगायोगाने त्या व्यक्तीचे नाव कुणाल कामराच आहे. या घटनेतील कुणाल कामरा हा अमेरिकेच्या बोस्टनमधील रहिवासी असून तो सध्या भारतात आपल्या कुटूंबाला भेट देण्यासाठी आला आहे. ३ फेब्रुवारीला कुणाल कामरा हे … Read more

चीनमधून मालदीवच्या ७ नागरिकांची भारताने केली सुटका; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसची दहशत जगभर पसरत असताना चीनमधील वुहानमधून रविवारी सकाळी ३२३ भारतीय नागरिकांसह ७ मालदीवच्या नागरिकांना भारताने आपल्या विशेष मोहिमेद्वारे एअर इंडियाच्या विमानातून सुखरुप भारतात आणले. याबाबतची माहिती देणारे ट्विट परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केले होते. त्यांच्या ट्विटला उत्तर उत्तर देताना मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. मालदीवच्या नागरिकांना वाचवताना … Read more

अर्णब गोस्वामीला विमानत केलेल्या शाब्दिक शेरेबाजीमुळे कुणाल कामरावर ६ महिने विमानप्रवास बंदी

स्टॅन्ड अप कॉमेडिअन कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी एकाच विमानातून प्रवास करत होते. या प्रवासावेळी कुणाल कामराने विचारलेल्या काही प्रश्नांकडे अर्णब गोस्वामीने दुर्लक्ष केलं. त्याच्या या वागण्यावर संतापलेल्या कुणाल कामराने अर्णबला प्रश्न विचारणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

अखेर एअर इंडिया कंपनी मोदी सरकारनं काढली विक्रीस

सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया कंपनी मोदी सरकारनं विक्रीस काढली आहे. केंद्र सरकारची मालकी असलेली एअर इंडिया एप्रिलपूर्वीच खासगी कंपनी होणार आहे. एअर इंडियातील १०० टक्के मालकी हिस्सा विक्री करण्याच्या प्रक्रियेने दिल्लीत वेग घेतला असून सरकारने याविषयी सोमवारी माहिती उपलब्ध केली. सरकारनं कंपनीसाठी खरेदीदारांकडून प्रस्ताव मागवले असून, खरेदीसाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी १७ मार्च २०२० अखेरीची तारीख आहे. याचबरोबर सरकारनं ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ आणि एअरपोर्ट सर्व्हिस कंपनी (AISATS) या दोन सरकारी अनुदानित कंपन्यासाठीही बोली मागवल्या आहेत.