इतर वस्तूंच्या विक्रीचीही परवानगी द्या! Amazon-Flipkart ची केंद्राला विनंती

नवी दिल्ली । लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन अत्यावश्यक वस्तूंच्या विक्रीला केंद्र सरकारची ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी आहे. Amazon-Flipkart या आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्या लॉकडाउनच्या काळात केवळ अत्यावश्यक सामानांची विक्री करत आहे. मात्र, ‘अनावश्यक असल्या तरी अनेक वस्तूंची ग्राहकांना दीर्घकाळापासून गरज असून अशा वस्तूंचीही विक्री करु द्यावी, अशी विनंती Amazon व Flipkart ने केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच सोशल … Read more

गुड न्युज! लॉकडाऊनमध्येही Amazon, Flipkart ची सेवा सुरू होणार; ‘या’ वस्तू ऑर्डर करता येतील

नवी दिल्ली । करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन लागू झाल्यानंतर Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना आपली सेवा बंद केली होती. मात्र, ग्राहकांसाठी एक गुड न्युज मिळत आहे. येत्या २० एप्रिल पासून ई कॉमर्स कंपन्यांना सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळं आता Amazon, Flipkart ई-कॉमर्स कंपन्यांना … Read more

काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान प्रत भेट

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर तणावाचं वातावरण अद्यापही पहायला मिळत आहे. याचीच परिणीती प्रजासत्ताक दिनादिवशीही पाहायला मिळाली. काँग्रेस पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाची प्रत भेट म्हणून पाठवली आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर अ‍ॅमेझॉनवरून संविधानाची प्रत काँग्रेसने भेट म्हणून पाठवली आहे. या प्रतची किंमत १७० रूपये असून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून पाठवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही रक्कम भरावी लागणार आहे.

Amazonचे मालक जेफ बेझॉस यांचा फोन हॅक? सौदीचे राजपुत्र महंमद बिन सलमानवर संशय

जगातील सर्वात मोठी इ-कॉमर्स कंपनी Amazon चे मालक जेफ बेझॉस याचा फोन हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. The Guardian या वृत्रपत्राने याबाबत वृत्त दिलेले आहे. महत्वाची बाब म्हणजे सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांच्यावर बेझॉस यांचा फोन हॅक केल्याचा आरोप या वृत्तात केला गेला आहे.

Amazon घेऊन येत आहे पर्यावरणपूरक ई रिक्षा; संस्थापक जेफ बेझोस यांनी ट्विटरवरून दिली माहिती

ई-कॉमर्स कंपनी Amazone लवकरच इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षा घेऊन भारतात येत आहे. Amazonचे जेफ बेझोस यांनी सोमवारी याबद्दल एक ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी झिरो कार्बन उत्सर्जनासह ई-रिक्षा भारतात आणणार असल्याचे म्हटले आहे. Amazon ही कंपनी सात वर्षांपूर्वी भारतात आली. येथे कंपनीने 5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त पैसे गुंतविले आहेत.

अमेझॉन आणि फ्लिपकार्ड यांचा बंबर सेल, किमतीत ८०% पर्यंत सूट

thumbnail 1531718895918

मुंबई |अमेझॉन आणि फ्लिफकार्ड वर आज मोठ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. दुपारी १२ वाजता या ऑफर सुरू होणार आहेत. अमेझॉन आणि फ्लिफकार्ड यांनी बाजारावर आलेली मंदी पाहता हा मोठा निर्णय घ्यायचे ठरवले असल्याचे बोलले जाते. भारतात घडलेल्या आर्थिक घडामोडीची याला किनार आहे.अमेझॉन आणि फ्लिफकार्ड ही ग्राहकांच्या जिव्हाळ्याची ठिकाणे बनली आहेत. दिवाळी, दसरा या सणांना मोठया … Read more