Amazon ने सुरू केली एक खास पेमेंट सिस्टम ! आता हात हलवताच केले जाईल पेमेंट, कार्डची देखील भासणार नाही गरज

हॅलो महाराष्ट्र । ई-कॉमर्स दिग्गज अॅमेझॉनने एक विशेष बायोमेट्रिक पेमेंट सिस्टम सुरू करून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे. कंपनीने अॅमेझॉन वन ही नवीन बायोमेट्रिक पेमेंट सिस्टम बाजारात आणली आहे. या बायोमेट्रिक पेमेंट सिस्टमची खास गोष्ट म्हणजे आपण फक्त हात दाखवून कोणत्याही प्रकारचे पेमेंट करू शकता. याद्वारे कॉन्टॅक्टलेस पेमेंट सहज केले जाऊ शकते.

कार्डशिवाय केली जाईल शॉपिंग
अॅमेझॉनचे उपाध्यक्ष दिलीप कुमार म्हणाले की, आता तुमची शॉपिंग कार्डलेस होईल, म्हणजे वस्तू खरेदी करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कार्ड घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. आपण फक्त आपला हात स्कॅन करून खरेदी करण्यास सक्षम असाल. या नवीन सिस्टम बद्दल कंपनी ग्राहकांकडून अभिप्राय घेत आहे, त्यानंतर त्याची सिएटलमधील अॅमेझॉनच्या दोन फिजिकल स्टोअरमध्ये चाचणी घेतली जाईल.

गेट पासचे काम करेल ही योजना
याशिवाय कोणत्याही गेटवर हे गेट पासचे कामही करेल. अॅमेझॉनच्या या पेमेंट सिस्टममुळे आता ऑफिस आणि स्टेडियममध्ये एन्ट्री करणे सुलभ होईल. अॅमेझॉन आपल्या वॉशिंग्टनमधील रिटेल स्टोर्स मध्ये याचा वापर करेल.

स्माइल टु पे सिस्टम सुरु केली होती
अॅमेझॉनने यापूर्वीच चीनमध्ये अलिपेची स्माईल टू पे सिस्टम सुरू केली होती. या सिस्टम अंतर्गत, आयपॅडच्या आकाराचे एक उपकरण वापरले गेले आहे, ज्याद्वारे युझर्स आपला चेहरा दाखवून पेमेंट देऊ शकतात. अशा बायोमेट्रिक पेमेंट सिस्टममुळे लोकांच्या प्रायव्हसीबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तज्ञांचा असा विश्वास आहे की अशी सिस्टम हॅकर्सचा मार्ग आणखी सुलभ करेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like