Amazon आता उघडणार आपले Offline Stores! आणखी काय काय खास असेल ते जाणून घ्या?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लिजेंडरी ई-कॉमर्स कंपनी Amazon ने नुकतेच आपले इझी स्टोअर फॉरमॅट लॉन्च केले आहे. हे Amazon इझी स्टोअर अनेक सेवांसाठी एकच टचपॉईंट म्हणून काम करेल. या अ‍ॅमेझॉन इझी फॉरमॅटमध्ये लोकांना प्रॉडक्ट्स टच एंड फील एक्सपीरियंस (Touch & Feel Experience) मिळेल. ज्यामध्ये वस्तू फिजिकल डिस्प्ले केले जाईल. अ‍ॅमेझॉनने ही माहिती ईटीला दिली आहे. या दृष्टीने अ‍ॅमेझॉनचा हा फॉर्मेट देखील महत्त्वपूर्ण आहे कारण बरेच लोक ऑनलाइन शॉपिंगमध्ये कंफर्टेबल नसतात कारण ते उत्पादने पाहू आणि अनुभवू शकत नाहीत. आता अ‍ॅमेझॉनच्या या इझी स्टोअरद्वारे लोकांची ही तक्रार देखील दूर केली जाईल.

अ‍ॅमेझॉनच्या या इझी स्टोअर्सची असतील ही वैशिष्ट्ये
Amazon Easy Stores वरून ग्राहक अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरून कोणत्याही वस्तूंसाठी ऑर्डर देऊ शकतात. यामध्ये उपलब्ध असलेल्या उपकरणांद्वारे आपल्याला मार्गदर्शनही केले जाईल. हे स्टाफच्या मदतीनेही ऑपरेट केले जाऊ शकते. या इझी स्टोअरमधून वस्तूंची ऑर्डरही केली जाऊ शकते आणि तिथूनच घेतलेही जाऊ शकते किंवा होम डिलिव्हरीही करता येउ शकेल.

20-30 कोटी ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंगमध्ये मिळेल मदत
यासारख्या अ‍ॅमेझॉन स्टोअर्सची देशभरात सुरूवात केली जाईल. या कंपनीचे जुने तसेच नवीन नेटवर्क पार्टनर, अ‍ॅमेझॉन इंडियाचे डायरेक्टर (कस्टमर एक्सपीरियंस अँड मार्केटिंग) किशोर थोटा यांनी सांगितले की, अ‍ॅमेझॉनचे हे इझी स्टोअर 20-30 कोटी ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंग साठी आकर्षित करण्यास मदत करू शकते.

रोजगाराच्या संधी वाढतील
ते म्हणाले की यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासही बराच फायदा होऊ शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment