शहरातील एका वॉर्डाची लोकसंख्या राहणार नऊ हजार

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार 42 प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिकेत 126 सदस्य राहणार असल्याने एका वॉर्डात सुमारे नऊ हजार 746 लोकसंख्या राहणार आहे. जुन्या रचनेत ही लोकसंख्या 12 … Read more

प्रभाग रचनेसाठी मनपाकडे उरले दहा दिवस; निवडणूक आयोगाने दिली डेडलाइन

औरंगाबाद – औरंगाबाद मनपाला राज्य निवडणूक आयोगाचे सोमवारी सुधारित आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आता 18 नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनपा प्रशासनाने अगोदरच अर्धे काम करून ठेवले आहे. उर्वरित अर्धे काम पुढील दहा दिवसांमध्ये प्रशासनाला करावे लागणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार मनपामध्ये 126 सदस्य संख्या राहील प्रभागांचे संख्या 42 … Read more

लेबर कॉलनी प्रकरण- पहिला दिवस गेला न्यायालयात; कारवाई विरोधात नागरिक रस्त्यावर उतरल्याने परिसरात तणाव

औरंगाबाद – लेबर कॉलनीतील शासकीय सदनिकांची 20 एकर जागा ताब्यात घेण्यावरून आज चांगलाच तणाव पाहण्यास मिळाला. कारवाईविरोधात नागरिक पुन्हा न्यायालयात गेल्याने आणि प्रचंड राजकीय दबाव निर्माण झाल्याने प्रशासनाची आजची कारवाई टळली आहे. दरम्यान, सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास प्रशासनाने पथक पाडापाडी करण्यासाठी दाखल होताच इतर नागरिक आणि विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने काही … Read more

औरंगाबाद मनपातील नगरसेवकांची संख्या वाढणार, आता असणार ‘इतके’ नगरसेवक

औरंगाबाद – शहरांच्या वाढीव लोकसंख्येनुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. यासंबंधी अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केल्यामुळे नगरसेवकांच्या संख्यावाढीवर शिक्कमोर्तब झाले आहे. राज्य शासनाने २७ ऑक्टोबर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांच्या नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. १२ ते १४ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी १२६ … Read more

जिल्हा परिषद निवडणुकांचे वेध; नोव्हेंबर अखेरपर्यंत जाहीर होणार आरक्षण सोडत

औरंगाबाद – येत्या फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ दोन महिन्यांत समाप्त होत आहे. फेब्रुवारीतील या निवडणुकांची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषद अध्यक्षपदासह विविध गटांतील आरक्षणाची सोडत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद जिल्हा … Read more

औरंगाबाद मनपाच्या वतीने नवीन मतदार नोंदणी सुरु

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता तारखेवर मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना नोंदणी करता यावी, यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. औरंगाबादमधील मतदारांच्या जुन्या यादीतील नावे, फोटोतील दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. यादीत नाव नसणारे आणि नवीन मतदार यांना 30 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी … Read more

प्रत्येक प्रभागात एक वार्ड असेल महिलांसाठी राखीव

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मनपा मध्ये आता प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मनपा क्षेत्रात 37 प्रभाग तीन वॉर्डांचे तर एक प्रभाग 4 बोर्डाचा होणार आहे. एकूण 38 प्रभागातील एक वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद महापालिकेची मुदत 29 एप्रिल 2020 रोजी संपली … Read more

मनपामध्ये आजी-माजी एकत्र येणार ? सेनेचे अब्दुल सत्तार व भाजपचे केणेकर यांच्यात ‘चाय पे चर्चा’

sena bjp

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादच्या भाजप शहाराध्यक्षांची चक्क घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे ‘आजी-माजी’ एकत्र येऊन ‘भावी’ काळात युती करण्याची शक्यता बळावली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादचे भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांची घरी जाऊन भेट घेतली. अब्दुल सत्तार … Read more