नवीन शहराध्यक्षांची निवड होताच राष्ट्रवादातीत अंतर्गत गटबाजी

sharad pawar ncp

औरंगाबाद – आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहर-जिल्हाध्यक्ष पदाची माळ ख्वाजा शरिफोद्दीन यांच्या गळ्यात घातली. या निवडीला आठवडाही उलटला नसतानाच पूर्वीचे शहर जिल्हाध्यक्ष विजय साळवे, प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी मुंबईत नेते अजित पवार यांची गुरूवारी (ता. 9) भेट घेतली. उभयंतात या मुद्द्यासह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या भेटीमुळे शहर जिल्हाध्यक्षाच्या पदालाच धक्का … Read more

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर; 11 नवे वॉर्ड

औरंगाबाद – प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगासमोर सादर झाला असून, यानुसार आता शहरातील वॉर्डांची संख्या 126 आणि प्रभागांची संख्या 42 होईल हे महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या प्रारूप आराखड्यातून स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने महापालिकेला नवीन बोर्ड रचना आणि प्रभागाचा आराखडा सादर करण्याचे आदेश मागील महिन्यात दिले होते एक महिन्यापासून महापालिका आराखडा सादर करण्यास … Read more

प्रभाग रचनेनेचा कच्चा आराखडा आज होणार सादर

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाकडे महानगरपालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा आज सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य शासनाने औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आता बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचे ठरवले आहे. त्यातच वाढलेल्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय देखील राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार नगरसेवकांची संख्या वाढवून प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे आदेश … Read more

मनपा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे औरंगाबादेत

Raj Thackarey

औरंगाबाद – आगामी औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याच्या भेटीला येत आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली. यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

कुठून येते इतकी हिंमत ? चक्क स्मशानभूमीच्या जागेवरच केली प्लॉटिंग

Fraud

औरंगाबाद – बेकायदा प्लॉटिंगचे प्रकार शहरात मनपा हद्दीत नेहमीच घडतात. मात्र आता तर चक्क स्मशानभूमीच्या राखीव जागेवरदेखील प्लॉटिंग केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शहरातील शहानूरवाडी भागात स्मशानभूमीसाठी राखीव असलेल्या दोन एकर जागेवर अशाच पद्धतीने बेकायदा प्लॉटिंग करण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी ही प्लॉटिंग निष्कासित करून स्मशानभूमीची जागा मोकळी केली. या सर्व प्रकारामुळे मनपाच्या … Read more

मनपा निवडणुकीबाबत ‘या’ तारखेला होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 

औरंगाबाद – महानगरपालिका निवडणुकीबाबत आता 15 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार प्रभाग रचना करायची असल्यामुळे न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेचा उद्देश संपला आहे, असे शपथपत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने 11 नोव्हेंबरला एक शपथपत्र दाखल केले त्यात आयोगाने म्हटले आहे की, शासनाने पालिकेची निवडणूक … Read more

एमआयएममधून राष्ट्रवादीत आलेल्या नगरसेवकांची हकालपट्टी करा

NCP

औरंगाबाद – एमआयएम पक्षातील दोन माजी नगरसेवक कोरोना संसर्ग काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांच्या गुन्हेगारी कारवायांचा इतिहास माहीत असतानाही पक्षाने त्यांना प्रवेश दिला. आता त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारणांमुळे पक्षाची खूप बदनामी होऊ लागली. त्यामुळे या दोन्ही नगरसेवकांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शहराध्यक्ष विजय साळवे यांनी वरिष्ठ नेत्यांकडे एका पत्राद्वारे केल्याने खळबळ उडाली आहे. औरंगाबाद … Read more

मनपा निवडणुकीसाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीने थोपटले दंड; ‘इतक्या’ वॉर्डांत देणार उमेदवार

औरंगाबाद – महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशी तशी राजकीय पक्षांमधील खलबतं मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशातच आता मनपा निवडणुकीसाठी प्रथमच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) ने दंड थोपटले आहेत. एसडीपीआय 20 ते 25 जागांवर उमेदवार देणार आहेत. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांसोबत कोणतीही आघाडी करणार नाही, असा निर्णय या पक्षाने … Read more

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा उद्या होणार सादर

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाला कच्चा आराखडा सादर केला जाणार आहे. कोरोना संसर्गामुळे महापालिकेची लांबणीवर पडलेली निवडणूक आगामी काही महिन्यांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार राज्य शासनाने पावले उचलली आहेत. महापालिकेची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग … Read more

मनपा निवडणुकीत नव्याने आरक्षण सोडत; इच्छुकांचे लक्ष प्रभाग रचनेकडे

औरंगाबाद – आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम सुरु असून लवकरच प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला जाईल. गेल्या तीन निवडणुकीत आरक्षित न झालेले वॉर्ड आता होऊ घातलेल्या निवडणुकीत आरक्षित केले जातील, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकारणातील अनेक दिग्गजांना आता नवे वॉर्ड शोधावे लागणार किंवा त्यांना निवडणुकीवरच पाणी सोडावे लागण्याची … Read more