शहरातील माजी नगरसेवकाच्या भावाच्या गाडीत नशेच्या 260 गोळ्या ! संशयिताला अटक

Medicine Tablet

औरंगाबाद – शहरातील माजी नगरसेवक सय्यद मतीन यांच्या भावाची गाडी घेऊन जाणाऱ्या एका इसमाकडे नशेच्या 260 गोळ्या (बटण) आढळून आल्या. गुरुवारी शहरातील सिटी चौक पोलिसांनी अण्णा भाऊ साठे चौकात रात्री साठेआठ वाजता ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी सय्यज मंजूर या आरोपीला अटक केली आहे. आरोपी कारमधून नशेच्या गोळ्या घेून जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक … Read more

मनपा निवडणुकीत नव्याने आरक्षण सोडत; इच्छुकांचे लक्ष प्रभाग रचनेकडे

औरंगाबाद – आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम सुरु असून लवकरच प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला जाईल. गेल्या तीन निवडणुकीत आरक्षित न झालेले वॉर्ड आता होऊ घातलेल्या निवडणुकीत आरक्षित केले जातील, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकारणातील अनेक दिग्गजांना आता नवे वॉर्ड शोधावे लागणार किंवा त्यांना निवडणुकीवरच पाणी सोडावे लागण्याची … Read more

शहरातील एका वॉर्डाची लोकसंख्या राहणार नऊ हजार

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार 42 प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिकेत 126 सदस्य राहणार असल्याने एका वॉर्डात सुमारे नऊ हजार 746 लोकसंख्या राहणार आहे. जुन्या रचनेत ही लोकसंख्या 12 … Read more

लेबर कॉलनीत पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने लावली नोटीस

colony

औरंगाबाद – शहरातील विश्वासनगर लेबर कॉलनी येथील शासकीय सेवा अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कर्मचारी/ कर्मचारी यांचे नातेवाईक यांनी आपण राहत असलेल्या निवासस्थानाच्या बाबतीचे आपले किंवा  आपल्या कर्मचारी नातेवाईकांचे कागदपत्रे पुरावे 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वत: वयक्तिकरित्या सादर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद यांनी केले आहे. यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने पोलीस … Read more

लेबर कॉलनीवासियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण

collector

औरंगाबाद – शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील लेबर कॉलनीतील घरे पाडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याकरिता महापालिकेने रहिवाशांना 8 दिवसांच्या मुदतीची नोटिस बजावली होती. सोमवारी ही मुदत संपल्याने येथील नागरिक खूप चिंतेत होते. लेबर कॉलनीवासियांनी सोमवारी पालकमंत्र्यांसमोरही आपली व्यथा मांडली. मात्र संबंधित प्रकरणात कोर्टाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया होईल, असे वक्तव्य पालकमंत्र्यांनी केले. त्यामुळे लेबर कॉलनीवासियांनी मंगळवारी … Read more

प्रभाग रचनेसाठी मनपाकडे उरले दहा दिवस; निवडणूक आयोगाने दिली डेडलाइन

औरंगाबाद – औरंगाबाद मनपाला राज्य निवडणूक आयोगाचे सोमवारी सुधारित आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आता 18 नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनपा प्रशासनाने अगोदरच अर्धे काम करून ठेवले आहे. उर्वरित अर्धे काम पुढील दहा दिवसांमध्ये प्रशासनाला करावे लागणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार मनपामध्ये 126 सदस्य संख्या राहील प्रभागांचे संख्या 42 … Read more

लेबर कॉलनी प्रकरण- पहिला दिवस गेला न्यायालयात; कारवाई विरोधात नागरिक रस्त्यावर उतरल्याने परिसरात तणाव

औरंगाबाद – लेबर कॉलनीतील शासकीय सदनिकांची 20 एकर जागा ताब्यात घेण्यावरून आज चांगलाच तणाव पाहण्यास मिळाला. कारवाईविरोधात नागरिक पुन्हा न्यायालयात गेल्याने आणि प्रचंड राजकीय दबाव निर्माण झाल्याने प्रशासनाची आजची कारवाई टळली आहे. दरम्यान, सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास प्रशासनाने पथक पाडापाडी करण्यासाठी दाखल होताच इतर नागरिक आणि विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने काही … Read more

लेबर कॉलनीसाठी शेवटची रात्र ? उद्या 338 घरांवर चालणार बुलडोझर

JCB

औरंगाबाद – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील विश्वास नगर लेबर कॉलनीतील घरे पाडण्याची कारवाई सोमवारपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे आजची रविवारची रात्र ही येथील रहिवाश्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 31 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी येथील रहिवाशांना ही कॉलनी सोडण्याची नोटिस दिली होती. मात्र ऐन दिवाळीपूर्वी अशी नोटिस बजावल्यामुळे नागरिकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण होते. आता सोमवारी कारवाई होण्याच्या भीतीने येथील … Read more

औरंगाबाद मनपातील नगरसेवकांची संख्या वाढणार, आता असणार ‘इतके’ नगरसेवक

औरंगाबाद – शहरांच्या वाढीव लोकसंख्येनुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. यासंबंधी अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केल्यामुळे नगरसेवकांच्या संख्यावाढीवर शिक्कमोर्तब झाले आहे. राज्य शासनाने २७ ऑक्टोबर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांच्या नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. १२ ते १४ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी १२६ … Read more

प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी औरंगाबाद मनपाचा कौतुकास्पद निर्णय

Electric buses

औरंगाबाद – शहरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी औरंगाबाद महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे ठरवले आहे. यापुढे महानगर पालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसाठी डिझेल किंवा पेट्रोलचे नवीन वाहन खरेदी केले जाणार नाही. त्याऐवजी फक्त इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी केली जातील. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीपैकी 80 टक्के रक्कम प्रदूषण कमी करण्यावर खर्च करावा, असे शासनाने कळवले आहे. या धोरणाची माहिती … Read more