नवीन प्रभाग रचनांमुळे बदलणार सीमा

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासन कामाला लागले असून, लोकसंख्या व मतदार संख्या विचारात घेऊन वॉर्डांची चतु:सीमा ठरविल्या जाणार आहेत. त्यामुळे जुन्या वॉर्डांच्या सीमांमध्ये 10 टक्के बदल अपेक्षित असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. महापालिकेची निवडणूक प्रभाग रचनेनुसार होणार असून, प्रभाग रचनेचा … Read more

लसीकरणासाठी आजपासून मनपाचेही ‘मिशन कवच कुंडल’

corona vaccine

औरंगाबाद – कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार करून 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान ‘मिशन कवचकुंडल’ विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात महापालिकेने शहरात 20 लसीकरण केंद्रे वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी … Read more

मनपाचे दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

Lach

औरंगाबाद – नव्याने खरेदी केलेल्या दुकानात मालमत्ता लावण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मनपाच्या वरिष्ठ लिपिक आसह सफाई मजुराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. काझी सलामोद्दीन अरिफोद्दीन (41) आणि सय्यद शहजाद सय्यद शहरअली (48) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, … Read more

प्रत्येक प्रभागात एक वार्ड असेल महिलांसाठी राखीव

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मनपा मध्ये आता प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मनपा क्षेत्रात 37 प्रभाग तीन वॉर्डांचे तर एक प्रभाग 4 बोर्डाचा होणार आहे. एकूण 38 प्रभागातील एक वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद महापालिकेची मुदत 29 एप्रिल 2020 रोजी संपली … Read more

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी मनसेने घातले अधिकाऱ्यांचे ‘पित्र’

mns

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. या खड्ड्यांतून वाट काढत वाहन चालवताना चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांना याचे सोयरसूतक नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी जळगाव रोडवरील सबीओए शाळेजवळ अधिकाऱ्यांचे बोथट संवेदनांचे पित्र पूजन आंदोलन केले. स्मार्ट … Read more

मनपा मालामाल ! करवसुलीतून 61 कोटींची तिजोरीत भर

औरंगाबाद – मनपाच्या तिजोरीमध्ये चालू आर्थिक वर्षात कर वसुलीतून एकूण 61 कोटी रुपयांची भर पडली आहे. यामध्ये मालमत्ता कराचे 47 कोटी 87 लाख तर पाणीपट्टीची 13 कोटी 14 लाख रुपये वसूल केले आहेत. सध्या प्रशासनाकडून कर वसुलीवर विशेष लक्ष देण्यात आले असून, वॉर्डनिहाय कर्मचारी घरोघरी जाऊन कर वसुली करत असल्याची माहिती उपायुक्त अपरणा थेटे यांनी … Read more

औरंगाबादचा ‘नमामि गंगा’ योजनेत समावेश

औरंगाबाद – गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र शासनाने ‘नमामि गंगा’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गंत गंगा नदीपात्राच्या आसपास असलेल्या शहरांचाच समावेश करण्यात आला होता. विशेष बाब म्हणून महाराष्ट्रातील दोन शहरांची सोमवारी निवड करण्यात आली. यामध्ये पुणे आणि औरंगाबादचा समावेश केल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. लवकरच ५० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) … Read more

डिसेंबरपर्यंत सुरू होणार हर्सूलचा कचरा प्रकल्प

  औरंगाबाद – हर्सूल येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. यानंतर याठिकाणी सिविल वरचे काम सुरू होईल. डिसेंबर अखेरपर्यंत या ठिकाणी कचरा प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने मनपाकडून तयारी सुरू असली, तरी प्रत्यक्षात प्रकल्प कधी सुरू होईल हे पहाणे महत्त्वाचे ठरेल. शहरात फेब्रुवारी 2018 मध्ये कचरा कोंडी निर्माण झाली. यानंतर कचऱ्यावर … Read more

शहरात दोन दिवस महोत्सवी वातावरण, विविध लाइव्ह कार्यक्रमांची मेजवानी

aurangabad

औरंगाबाद – ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी स्मार्ट सिटी औरंगाबाद आणि औरंगाबाद महानगरपालिका यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. काल कॅनॉट परिसरात सकाळी 7 ते 9 यावेळेत झुंबा त्याबरोबरच दिवसभरात कला कार्यशाळा, खेळ आणि फिटनेस कार्यशाळा, स्वसंरक्षण कार्यशाळा, लाईव्ह म्युझिक हे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांना सर्वच वर्गातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाच्या … Read more

महापालिकेला पुर नियंत्रणासाठी मिळणार 14 कोटी

aurangabad mahanagar

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरात मागील महिनाभरात दोन वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे शहराच्या अनेक भागात नागरिकांच्या घरात तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याअनुषंगाने विविध कामे करण्यासाठी महापालिकेला 14 कोटी 85 लाख 3 हजार 804 रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी … Read more