कोरोनातील कंत्राटी डॉक्टरांची मनपाकडून फसवणूक ? ठरलेले वेतन देण्यास नकार

औरंगाबाद – कोरोनाच्या आपत्कालीन काळात स्वतःचा जीव संकटात घालून हजारो रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांची औरंगाबाद महानगरपालिका फसवणूक करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील सहा महिन्यांपासून या डॉक्टरांचे वेतन थकले आहेच. शिवाय करार करताना मनपाने 50 हजार रुपये याप्रमाणे वेतन देण्याचे कबूल केले होते, मात्र आता फक्त 30 हजार रुपयांवर या डॉक्टरांची बोळवण मनपाकडून … Read more

मनपाला १५ व्या वित्त आयोगातून मिळाले तब्बल 63 कोटी

auranagabad

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या विकासाला गती देणारे अनेक प्रस्ताव मागील काही वर्षांपासून निधीअभावी मनपाकडे प्रलंबित होते. परंतु, आता 15 व्या वित्त आयोगातून पहिल्यांदाच मनपाला तब्बल 63 कोटी 51 लाख रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून शहराचा चेहरा-मोहरा बदलणार 16 विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. अवघ्या एका महिन्यात या कामांना सुरुवात होईल अशी माहिती … Read more

गेल्या आठ दिवसांत तुम्ही काय काम केले ? प्रशासकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

aurangabad mahanagar

औरंगाबाद – महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला असता, अनेक कामात कुठलीही प्रगती नसल्याचे समोर आले. त्यामुळे मी सुटीवर असताना गेल्या आठ दिवसात तुम्ही काय काम केले? असा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. मी सांगितल्याशिवाय तुम्ही काम करणार नाहीत का? अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोना संसर्गामुळे … Read more

शहरात 75 हजारांहून अधिक गणेश मुर्तीचे संकलन, विसर्जन

औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना विरूद्ध लढत आहे. अजूनही कोरोना चा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नाही. याच पार्श्वभूमीवर याही वर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मनपा द्वारे विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये शहरातील 9 झोन मध्ये 40 ठिकाणी गणपती संकलन त्याचबरोबर शहरातील नऊ विहिरी आणि … Read more

मनपा निवडणूकीच्या तोंडावर एमआयएमला आणखी एक ‘झटका’

aurangabad mahanagar

औरंगाबाद – एमआयएमने औरंगाबाद मनपाच्या 2015 मधील निवडणुकीत 115 पैकी तब्बल 24 जागा मिळवून, शहरातीलच नव्हे तर राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण केले होते. परंतु, आता या वादळाची तीव्रता कमी होत चालल्याचे प्रचिती येत आहे. अलीकडेच एमआयएम पक्षातील दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ आता रोशन गेट वॉर्डाच्या माजी नगरसेविका साजेदा सईद फारूकी यांनी … Read more

सिडको वाळूज महानगरचा मनपामध्ये समावेश होण्याच्या हालचालींना वेग

औरंगाबाद – वाळूज परिसरातील सिडको महानगर प्रकल्प टप्पा 1 मधील सिडकोने विकसित केलेल्या वसाहती औरंगाबाद महानगर पालिकेच्या हद्दीत आणण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी या प्रक्रियेसाठी सिडको आणि महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन केली आहे. तसेच या प्रक्रियेची व्यवहार्यता आणि परिणामांसंबंधीचा माहिती सादर करण्यासाठीचा अहवाल येत्या ४५ दिवसांत सादर … Read more

कोरोना काळात झालेल्या खर्चाचा हिशोब द्या !

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या काळात झालेला एकूण खर्च, थकीत असलेली देणी याबाबतची माहिती तातडीने द्यावी, असे पत्र महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी भांडार विभागाला दिले आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आरोग्य विभागासाठी दोन आरोग्य वैद्यकीय अधिकारी दिले होते. दरम्यान डॉ. पाडळकर यांचा अतिरिक्त पदभार नुकताच काढण्यात आला आहे. त्यानंतर डॉ. मंडलेचा यांनी … Read more

रस्ता समजून पाय ठेवला अन दोन तरुणी खड्ड्यात पडल्या; एकीचा दुर्दैवी अंत  

rain

औरंगाबाद – शहराला मंगळवारी रात्री धुवाधार पावसाने झोडपल्याने अवघ्या एकाच तासात ११६ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले. त्यातच मुकुंदवाडी भागातील रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होत. या रस्त्यावरुन वाहणा-या पाण्यात कंपनीतून घराकडे जाणा-या दोघी वाहून गेल्या. त्यातच एकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. तर दुसरी सुदैवाने बचावली. या घटनेमुळे … Read more

महानगरपालिकेला पडला शिक्षक दिनाचा विसर; शिक्षक दिनानिमित्त एकही कार्यक्रम नाही

aurangabad

औरंगाबाद – देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षक दिनाचा मनपाच्या शिक्षण विभागाला विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाने काल शिक्षक दिनानिमित्त एकाही कार्यक्रमाचे आयोजन केले नसून, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे सौजन्यही मनपाने दाखविलेले नाही. यामुळे महानगरपालिकेला शिक्षक दिनाचा विसर पडला की … Read more

‘अ’ स्मार्ट मनपा प्रशासनामुळे शहरात वाहतुकीचे तीन तेरा

traffic

औरंगाबाद/ नवनीत तापडिया – आशिया खंडात सर्वात झपाट्याने वाढलेले शहर असे नावलौकिक मिळविलेल्या औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस शहरातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे निश्चितच प्रशासनावरील ताण आणि काम देखील वाढले आहे परंतु काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी अजूनही स्थानिक मनपा प्रशासन दाखवत नसल्याने शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या … Read more