कुठून येते इतकी हिंमत ? चक्क स्मशानभूमीच्या जागेवरच केली प्लॉटिंग

Fraud

औरंगाबाद – बेकायदा प्लॉटिंगचे प्रकार शहरात मनपा हद्दीत नेहमीच घडतात. मात्र आता तर चक्क स्मशानभूमीच्या राखीव जागेवरदेखील प्लॉटिंग केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शहरातील शहानूरवाडी भागात स्मशानभूमीसाठी राखीव असलेल्या दोन एकर जागेवर अशाच पद्धतीने बेकायदा प्लॉटिंग करण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी ही प्लॉटिंग निष्कासित करून स्मशानभूमीची जागा मोकळी केली. या सर्व प्रकारामुळे मनपाच्या … Read more

मनपा निवडणुकीबाबत ‘या’ तारखेला होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 

औरंगाबाद – महानगरपालिका निवडणुकीबाबत आता 15 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार प्रभाग रचना करायची असल्यामुळे न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेचा उद्देश संपला आहे, असे शपथपत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने 11 नोव्हेंबरला एक शपथपत्र दाखल केले त्यात आयोगाने म्हटले आहे की, शासनाने पालिकेची निवडणूक … Read more

मनपाचे लसीकरण टार्गेट पूर्ण; आता ‘इतके’ शहरवासी झाले लसवंत

औरंगाबाद – जिल्हा प्रशासनाने कडक नियमावली केल्याने काही दिवसातच औरंगाबाद महापालिकेने दिलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे टार्गेट पूर्ण केले आहे. राज्य सरकारने शहराला लसीकरणासाठी 10 लाख 32 हजार 174 एवढे टार्गेट दिले होते. मात्र , पालिकेने याही पुढे जाऊन 11 लाख 57 हजार 726 नागरिकांचे लसीकरण केले आहे. त्यामुळे आजघडीला शहरात 112.16 टक्के लसीकरण झाले आहे. … Read more

शहराचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत, ‘हे’ आहे कारण

Water supply

औरंगाबाद – शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या 56 व 100 दलली योजनेवरील नवीन व जुने जायकवाडी उद्भव पंपगृहास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत जोडणी करण्यात आलेल्या दोन्ही स्वतंत्र 33 के. व्ही. उच्च दाब विद्युत वाहिनीवर बिघाड झाल्याने दोन्ही पंपगृहाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे मनपा प्रशासनाने एका प्रसिद्धि … Read more

मनपातील तब्बल 21 ठराव गुलदस्त्यात; प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ

औरंगाबाद – महापालिकेत प्रशासकीय कार्यकाळात पारदर्शक कारभारांचा दावा केला जात असला तरी ठरावांची मात्र लपवाछपवी केली जात आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महिनाभरात 22 ठराव मंजूर केले. यातील एक ठराव रचना विभागाचे प्रभारी निवृत्त उपसंचालक जयंत खरवडकर यांना फेरनियुक्ती देण्याचा आहे. पण उर्वरित 21 ठरावांची माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या ठरावात … Read more

कामचुकार कर्मचाऱ्यांना तंबी ! कार्यालयात डबा घेऊन या, नाहीतर इस्कॉनची खिचडी खा

औरंगाबाद – महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वसुली कर्मचाऱ्यांना ठरावीक मालमत्तांची यादी देण्यात आली आहे. पण हे कर्मचारी प्रत्यक्षात घरोघरी जाऊन वसुली करतात का? कार्यालयात वेळेवर येतात का? याची तपासणी कर मूल्य निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी सुरू केली आहे. दोन दिवसांच्या पाहणीत दोन प्रभागात तब्बल 52 … Read more

हातगाड्या बंद ठेवत फेरीवाल्यांचे आयुक्तांना निवेदन

feriwala

औरंगाबाद – शहरातील अत्यंत गजबजलेल्या गुलमंडी ते पैठणगेट रस्त्यावरील फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा द्यावी यासह इतर मागण्यांसाठी शहीद भगतसिंह पत्र विक्रेता युनियनच्या वतीने आज बंद व मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पोलिस प्रशासनाने मोर्चास परवानगी न दिल्याने युनियनने गाड्या बंद ठेवत आंदोलन केले. तसेच यावेळी प्रभारी आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे. प्रशासनाने मागण्या मान्य न … Read more

औरंगाबाद शहराचे जीआयएस मॅपिंग पूर्ण

औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील मालमत्तांची मोजणी करण्यासाठी जीआयएस (जिऑग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम) या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून झोन क्रमांक 9 चे मॅपिंग प्रायोगिक तत्त्वावर पूर्ण झाल्यानंतर आता बाकी आठही झोनचे काम पूर्ण झाले आहे. आता पुढच्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वे ला सुरुवात करण्यात येईल, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले आहे. गेल्या चार महिन्यांपासून या कामाचे … Read more

शहरातील बेकायदा नळ लवकरच होणार बंद

Water supply

औरंगाबाद – गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील बेकायदा नळांचा विषय गाजत आहे शहरात बेकायदा नळांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जाते. पण अजूनही मनपाला हें शोधून बंद करता आलेले नाहीत. परंतु आता नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील अनेक भागातील बेकायदा नळ आपोआप बंद होणार आहे. नव्या पाणीपुरवठा योजनेत सुमारे 1 हजार 900 किलोमीटरची पाईपलाईन शहरात टाकली जाणार … Read more

एमआयएम मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या ‘त्या’ नगरसेवकांची अखेर हकालपट्टी

NCP

औरंगाबाद – एमआयएम मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या नव्या दोन नगरसेवकांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे नगरसेवक दाखल झाले होते. नगरसेवकांच्या गुन्हेगारी कारवाया माहित असतानाही पक्षाने त्यांना प्रवेश दिला. यामुळे पक्षाची बदनामी होऊ लागली, असा पक्ष सदस्यांचा आरोप होता.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष … Read more