सपना चौधरी म्हणाली,”कोण केजरीवाल? मी कोणत्याही केजरीवालला ओळखत नाही!”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभेसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अशा वेळी राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांना प्रचार मैदानात उतरवलं आहे. गेल्या वर्षी हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश होता. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून ती भाजपचा प्रचार करत आहे. दिल्लीच्या पालम भागात भाजप उमेदवाराकरीता प्रचार करत … Read more

सकाळी ६ वाजता उठून भगवद्गीता वाचायला लावणारा बाप दहशतवादी कसा असेल – हर्षिता केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसा प्रचार अधिकच रंगात येऊ लागला आहे. आक्रमक भाजप विरुद्ध संयमी केजरीवाल असा सामना सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे. भाजपच्या विखारी प्रचाराला उत्तर द्यायला आता केजरीवाल यांचं कुटुंबही मैदानात उतरलं असून सकाळी ६ वाजता उठून भगवद्गीता वाचायला लावणारा माझा बाप दहशतवादी कसा? असा सवाल अरविंद केजरीवाल यांची २४ वर्षीय कन्या हर्षिता केजरीवाल हिने केला आहे.

एक दिवस असा येईल ज्या दिवशी असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालीसा म्हणतील- योगी आदित्यनाथ

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. निवडणूक जिकंण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकीकडे आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत मतदारांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत तर दुसरीकडं भाजपाचे नेते केजरीवाल यांच्याविरोधात धार्मिक मुद्य्यांवरून त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वहिनीवर हनुमान चालीसाचे पठण केलं होतं. केजरीवाल यांच्या हनुमान चालीसा पठणाला धार्मिक रंग देत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा; अरविंद केजरीवाल यांचे भाजपला आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी यांच्यातील लढाई तीव्र झाली आहे. मंगळवारी आम आदमी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि यावेळी अरविंद केजरीवाल यांनी भाजपला खुले आव्हान दिले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, उद्या भाजपने दुपारी एक वाजेपर्यंत त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उमेदवाराचे नाव सांगावे, मी त्यांच्याशी वादविवाद करण्यास तयार आहे. … Read more

केजरीवाल दहशतवादी असल्याचा आमच्याकडं भक्कम पुरावा- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात आता दहशतवादाचा मुद्दा नव्यानं अवताराला आहे. केंद्रीय मंत्री व भाजपाचे दिल्ली विधानसभा निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दहशतवादी असल्याचा दावा केला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी याबाबाबतचे विधान केलं आहे. जावडेकर म्हणले कि, ”केजरीवाल तुम्ही एकदम निरागस चेहरा करून विचारत आहात की मी … Read more

दिल्ली वासियांनो, विनोद तावडेंना सरकारी शाळा दाखवा, छोले बटूरे खाऊ घाला; अरविंद केजरीवालांनी उडविली विनोद तावडेंची खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रातील १३०० सरकारी शाळा बंद करणारे महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री दिल्लीमध्ये भाजपचा प्रचार करण्यासाठी आले आहेत, दिल्लीवासियांनो, तुम्ही खूप कष्ट घेऊन सरकारी शाळा सुंदर बनविल्या आहेत. विनोद तावडे यांना सरकारी शाळा दाखवा, छोले बटूरे खाऊ घाला, ते आपले पाहुणे आहेत, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विनोद तावडेंची खिल्ली उडविली आहे. … Read more

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केजरीवाल यांना तब्बल ६ तास रांगेत उभं राहावं लागलं

आम आदमी पक्षाचा उमेदवार म्हणून आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना केजरीवाल यांना तब्बल ६ तास आपला अर्ज दखल करण्यासाठी लागले. मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार अरविंद केजरीवाल रिटर्निंग अधिकाऱ्याच्या कार्यालयात आज मंगळवारी १२ वाजता पोहोचले यावेळी त्याचे आई-वडील आणि पत्नी सोबत होत्या.

“#केजरीवालनामहै_उसका” ट्विटरवर ट्रेंडिंगला, दिल्लीकरांकडून भाजप, काँग्रेसवर धुव्वाधार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्ली निवडणुकांसाठी अवघ्या २ आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना दिल्लीतील सामान्य नागरिकांनीही प्रचारात सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. रिक्षावाले, सामान्य नागरिक, डॉक्टर्स, शिक्षक यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची निवडणूक मोहीम हाती घेतली असून हटक्या पद्धतीने प्रचार करायला सुरुवात केली आहे. या संदर्भात #केजरीवालनामहै_उसका हा मथळा ट्विटरवर पहिल्या १० ट्रेंडिंग हॅशटॅगमध्ये … Read more

केजरीवालांच्या सेना दिवस ट्विटवरुन कुमार विश्वासांचा टोला; ट्विट व्हायरल

टीम हॅलो महाराष्ट्र। भारतीय सेना दिवसाच्या निमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय सैन्याला शुभेच्छा देणारा संदेश ट्विटरवर टाकला होता. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याच्या विश्वासार्हतेवर अरविंद केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. याचा आधार घेत पूर्वाश्रमीचे आप नेते कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी रोजी … Read more

आम्ही केलेल्या कामामुळे आम्हीच विजयी होणार! अरविंद केजरीवाल यांचा विश्वास

आम आदमी पार्टी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तयार असून यावेळी जनता आमच्या कामावर आम्हाला मतदान करेल असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी दिल्लीच्या जनतेला आवाहन करत केजरीवाल म्हंणाले कि,”दिल्लीत आम्ही जर प्रामाणिकपणे चांगलं काम केलं असेल तरच आम्हाला मतदान करा अन्यथा मतदान करू नका.”