जावयाने सासऱ्याचा प्लॉट परस्पर विकला; जावया विरूद्ध तक्रार दाखल

crime

औरंगाबाद |  छत्तीस महिन्याचा करारनामा करून गॅरेजसाठी किरायाने दिलेल्या प्लॉट जावयाने स्वतःच्या नावावर करून परस्पर विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात जावया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश प्रेमकुमार अग्रवाल असे जावयाचे नाव आहे. विजय हिरालाल अग्रवाल वय 61, (रा. विष्णू नगर जवाहर कॉलनी) असे सासर्‍याचे नाव आहे. … Read more

दोन बायका असतानाही अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले; आरोपीची माहिती देणाऱ्यास २१ हजारांचे बक्षीस

kidnap girl

औरंगाबाद : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका ३८ वर्षीय आरोपीने मुलीला फूस लावून पळून लावले. मुलीला पळवून लावणाऱ्या आरोपीची माहिती देणाऱ्यास एकवीस हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. सदर आरोपीची कुठलीही माहिती असल्यास ग्रामीण पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक पंडित इंगळे यांनी केले आहे. आरोपी दोन बायकांचा दादला असूनही त्याने पळशी येथील अल्पवयीन मुलीला … Read more

कुख्यात गुन्हेगाराच्या घरातून सहा तलवारीसह घातक हत्यारे जप्त; गरमपाणी भागात गुन्हेशाखेची कारवाई

Stock of swords confiscated

औरंंगाबाद | गरमपाणी भागात कुख्यात गुन्हेगाराच्या घरावर छापा मारून गुन्हेशाखा पोलिसांनी सहा तलवारी, एक गुप्ती, एक कुकरी असा शस्त्रसाठा जप्त केला. शेख इर्शाद उर्फ ईशु शेख सईद (२५,रा.गरमपाणी, मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागे) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तर शेख जाकेर शेख समशोद्दीन (वय २४) असे फरार आरोपीचे नाव आहे. गरमपाणी भागात कुख्यात गुन्हेगार शेख … Read more

घराजवळ फिरणार्‍या वृध्देची तीन तोळ्याची सोन्याची साखळी दुचाकीस्वारांनी पळवली

Crime

औरंगाबाद | शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. काही दिवसापूर्वी वट सावित्री पौर्णिमेला तीन महिलांचे मंगळसूत्र गेले होते. सोमवारी पुन्हा एकदा घराजवळच्या परिसरात फिरणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी चोरट्यांनी बाईकवर येऊन पळविल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उस्मानपुरा येथील जयानगरमध्ये काल संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. उज्वला वागळे, वय 84 वर्ष, या घराजवळील परिसरात … Read more

सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्यास चोरट्यांची बेदम मारहाण; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर

Murder

औरंगाबाद | अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्यास चोरट्यानी दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत 25 वर्षीय पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीरपणे जखमी आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील खांबाला फाटा वस्तीवर घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली की मग या मागे … Read more

भोळसर महिलेवर बलात्कार करणाऱ्या तिघांपैकी एकजण गजाआड

rape

औरंगाबाद : शहरातील सिडको परिसरातील एका भोळसर महिलेवर तिघाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुकानाच्या गॅलरीत झोपी गेलेल्या भोळसर महिलेवर बलात्कार करणाऱ्या तिघा आरोपींपैकी एकाला सिडको पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. आकाश उर्फ टोंग्या भगवान तुपे (20, रा. एन 7 सिडको ) असे आरोपीचे नाव असून त्याला 30 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश … Read more

धक्कादायक! घरातून बाहेर काढत कुटुंबाला टोळक्याची मारहाण; दहा जनाविरोधात गुन्हा दाखल

Crime

औरंगाबाद | घरात टीव्ही पाहत बसलेल्या व्यापाऱ्याला बाहेर बोलवत रस्त्यावर दहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडे, कमरेच्या बेल्ट ने फिल्मीस्टाईल मारहाण केली. तर भांडण सोडविणाऱ्या व्यापाऱ्यांची पत्नी आणि मुलीला देखील मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार गारखेड्यातील रेणुकानगर भागात शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात दहा जनावरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश … Read more

पाच हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

औरंगाबाद : तक्रारदाराची त्याच्या सोसायटीतील रो-हाऊसची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तलाठ्याला ताब्यात घेतले आहे. पूनमसिंग बंकटसिंग डोंगरजाळ (५७, रा. बेदवाडी, परसोडा, ता.वैजापूर) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून तो पंढरपूर सज्जा येथे कार्यरत आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी वळदगाव ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. तक्रारदाराने सातारा परिसरात रो-हाऊस खरेदी … Read more

जिवलग मित्रांच्या दुचाकींचा अपघात; एकजण जागीच ठार दुसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरू

औरंगाबाद : डबल सीट जाणाऱ्या मित्रांच्या दुचाकींच्या अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाळूज औधोगिक वसाहतीतील रांजणगाव रोडवर घडली आहे. पंढरी माणिक गवई (वय 23) रा.नेहरूनगर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अनिल संजय वाघमारे (वय 22) रा.वाघाला ता.मंठा, जि. जालना, ह.मु.सातारा परिसर … Read more

केवायसी अपडेटचे आमिष दाखवून सव्वा लाखाची फसवणूक

Cyber Crime

औरंगाबाद : केवायसी अपडेटचे आमिष दाखवून सव्वा लाखाची फसवणूक केल्याची घटना 15 जूनला रात्री 8 ते 9 च्या सुमारास घडली आहे. बीएसएनएल कंपनीतील निवृत्त टेलिकॉम टेक्निकल असिस्टंटला भामट्याने तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे म्हणत फसवले आहे. रमेश रामराव देशमुख (वय 67) शिवाजीनगर गारखेडा परिसर असे फसवणूक झालेल्या निवृत्त व्यक्तीचे नाव आहे. बीएसएनएल कंपनीत टेलिकॉम टेक्निकल … Read more