शहरातील 29 एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले 1 कोटी 17 लाख रुपये हडपले

औरंगाबाद – शहरातील राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांच्या 29 एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आणलेले तब्बल 1 कोटी 16 लाख 80 हजार दोनशे रुपये एटीएम मध्ये न भरताच भरल्याचा बनाव केला. अधिकृतपणे पैसे भरल्याच्या नोंदीही केल्या. कंपनीने केलेल्या ऑडिटमध्ये पैशाचा अपहार झाल्याचे उघडकीस आल्यामुळे सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे आठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात … Read more

वाळूमाफियांकडून तहसीलदारांना अंगावर बुलडोझर घालून चिरडण्याचा प्रयत्न

Sand

औरंगाबाद – अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या अंगावर टिप्पर वाहन आणि बुलडोजर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न वाळूमाफियांनी केला. यात जिवाच्या आकांताने पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला हा थरार गुरुवारी पहाटे शिवना नदी पात्रात घडला. यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वैजापूर तालुक्यातील लाखणी शिवारातील शिवना नदी पात्रातून वाळूची … Read more

धक्कादायक! 100 रुपयांवरुन युवकाचा खून; मृतदेह फेकला कचऱ्यात

औरंगाबाद – दारूच्या अवैध अड्ड्यावर काम करणाऱ्या 18 वर्षीय युवकाचा शंभर रुपये चोरल्याच्या संशयावरून मारहाण करत खून केल्याची घटना शहरातील आनंदनगरात बुधवारी रात्री घडली. आरोपीने पहाटे दुचाकीवर मृतदेह घेऊन करगिल मैदानाजवळील कचऱ्यात फेकला. पुंडलिक नगर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शेख अश्पाक उर्फ मुक्या शेख अब्दुल (18, … Read more

1300 किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी घेतला 12 लाखांचा माल ताब्यात

औरंगाबाद – निपाणी येथील कलरच्या गोदाममधून 12 लाख 61 हजार 195 रुपयांचे 1724 डबे घेऊन पोबारा करणाऱ्या भामट्या चिकलठाणा पोलिसांनी 1300 किलोमीटर प्रवास करत मुद्देमालासह शोधून आणले. या गुन्ह्यातील 100 टक्के मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाल्याची माहिती निरीक्षक देविदास गात यांनी दिली. निपाणी येथील गोडाऊनमधून ज्ञानेश्वर सोनोने यांचा विश्वास संपादन करून एका भामट्याने भाड्याचा … Read more

पगाराचे पैसे माझ्याकडे द्या म्हणत, पत्नीचा पतीवर चाकूहल्ला

murder

औरंगाबाद – पगाराचे पैसे माझ्याकडेच देत जा असे म्हणत बँकेतील पतीच्या पोटावर पत्नीने चाकूने वार केला. ही घटना सुधाकर नगर रस्त्यावरील नाथनगर आता उघडकीस आली आहे. शेख निजामुद्दीन इस्माईल (28) हे बँकेत नोकरीला आहेत ते कुटुंबीयांसोबत राहतात. मंगळवारी सायंकाळी त्यांच्या पत्नीने आपण वेगळे राहू व तुम्ही पगाराचे पैसे माझ्याकडेच देत जा असे म्हणाली. त्याला शेख … Read more

मराठवाडा हादरला ! एकाच दिवशी चार खून

औरंगाबाद – काल दिवसभरात चार खुनांच्या घटनांनी मराठवाडा हादरून गेला. नालीत कचरा टाकण्याच्या शुल्लक कारणावरून नांदेडमधील दोन सख्ख्या भावांचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला तर बंदाघाट भागात महिलेचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची घटना घडली. तिसऱ्या घटनेत कळंब तालुक्यात पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करुन तीची हत्त्या केली. एकाच दिवशी झालेल्या चार खुनांच्या … Read more

एकाच दिवशी सहा आत्महत्येनं औरंगाबादेत खळबळ

suicide

औरंगाबाद – 28 वर्षीय उच्चशिक्षित तरुणासह आणखी पाच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आली आहे. वेगवेगळ्या घटनेत सहा आत्महत्या उघडकीस आल्याने औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे. मंगळवार हा आत्महत्येचा वार ठरला आहे. पहिली घटना बिडबायपास येथील खान शहाजील रजा खान असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. शहाजील हे अविवाहित असून काही दिवसांपासून त्याच्यासाठी … Read more

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Suicide

औरंगाबाद – अवघ्या 14 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेस माहेरहून सात लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी औरंगपूर- हर्सूल येथे घडली आहे. सासरच्या मंडळींना अटक करण्याच्या मागणीसाठी विवाहितेच्या माहेरच्यांनी बुधवारी वाळूज ठाण्या समोरच पाच तास ठिय्या दिला. याप्रकरणी विवाहितेचा … Read more

शहरात मध्यरात्री दोन ठिकाणी आग भडकली; सुदैवाने जिवितहानी नाही

औरंगाबाद – गॅस वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या स्फोटाने मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास चिकलठाणा परिसर हादरून गेला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. स्फोटाच्या जोरदार आवाजाने चिकलठाणा परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. नेमका आवाज कशाचा आला, काय झाले, याची विचारणा परिसरातील नागरिक रात्री उशीरापर्यंत एकमेकांना करीत होते. चिकलठाणा विमानतळासमोर बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या … Read more

अनाधिकृत बायोडिझेल अड्ड्यावर छापा; 57 लाखांचा माल जप्त

औरंगाबाद – पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने सोलापूर-धुळे नवीन हायवे वरील गोलवाडी शिवारातील एका फार्म हाऊस मधील अनाधिकृत बायोडिझेल अड्ड्यावर रविवारी छापा मारला. या कारवाईत पथकाने कंटेनर, ट्रक, बायोडिझेल स जवळपास 57 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केले असून, मुख्य सूत्रधार कलीम कुरेशी यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Read more