कुरिअरने आलेल्या 38 तलवारी पोलिसांकडून जप्त; औरंगाबादेत खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथे कुरिअरने आलेल्या 38 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. क्रांती चौक पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून डीटीडीसी कुरिअरवर छापा मारत 38 तलवारी जप्त केल्या. शहरात कुरिअरने तलवारी मागविण्याची ही तिसरी घटना आहे. दरम्यान, या घटनेमुळे औरंगाबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद व जालना शहरात येणाऱ्या कुरियरच्या माध्यमातून तलवारीची … Read more

बनावट सोने घालून का फिरता ? म्हणत तोतयां पोलिसांनी वृध्दाचे सोने केले लंपास

औरंगाबाद – बनावट सोने घालून फिरता का ? तुम्ही काय कुठचे सरपंच आहे का ? असे म्हणत दबाव टाकून दोन तोतया पोलिसांनी मंडप डेकोरेटर व्यवसायिकाला भरदिवसा लुबाडले. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सिडको, एन-२, ठाकरेनगरात घडली. विशेष म्हणजे यावेळी एकाने त्याच्याच साथीदाराला आरोपी असल्याची बतावणी करुन आता त्याला पोलिस ठाण्यात घेऊन जात असल्याची थाप … Read more

निकाल फिरविण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

औरंगाबाद – मशिदीच्या व्यवस्थापकीय समितीच्या फेरबदलाबाबत वक्फ बोर्डात सुनावणीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यास मदत करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना खाजगी व्यक्तीला काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. मशीद ट्रस्टचा सभासद व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली होती. या सुनावणीत निकाल व बोर्डा मधून तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यात मदत करण्यासाठी 60 हजार रुपयांची मागणी केली होती … Read more

तंत्रज्ञानाचा वापर करत एटीएम मशीन फोडून नऊ लाखांची रोकड लंपास

औरंगाबाद – जिल्ह्यातील खुलताबाद शहरातील एसबीआय बँकेच्या शेजारील एटीएम मशीन चोरट्यांनी फोडून जवळपास 9 लाख रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खुलताबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे. खुलताबाद शहरातील एसबीआय बँकेचे शाखेच्या शेजारीच एटीएम मशीन आहे. पहाटे पावनेदोन वाजेच्या सुमारास दोन कारमधून चोरटे आले. त्यांनी प्रथम सेंटरमधील सीसीटीव्हीच्या कँमेरावर … Read more

दारुच्या नशेत वडिलांचा गळा दाबणाऱ्याचा तिघा भावांनी केला खून

औरंगाबाद – दारूच्या नशेत शिवीगाळ करीत वडिलांचा गळा दाबणाऱ्याचा भावांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 9 वाजता मिसारवाडी येथे घडली. याविषयी माहिती मिळताच सिडको पोलिसांनी झटपट कारवाई करीत चार संशयितांना अटक केली. सुनील प्रभुदास पारधे, मनोज प्रभुदास पारधे, सागर प्रभुदास पारधे आणि प्रभुदास पारधे (सर्व रा. मिसारवाडी, गल्ली क्रमांक 1) अशी आरोपींची … Read more

घराला पायाचा धक्का लागल्यामुळे तरुणाचा खून

औरंगाबाद – घराला पायाचा धक्का लागल्याच्‍या क्षुल्लक कारणावरुन सुई-पोती विक्री करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करुन त्‍याचा खून केल्याप्रकरणी तिघा आरोपींपैकी अनिल सिनाप्‍पा फुलमाळी (22) याला जन्‍मठेप व 50 हजारांचा दंडाची शिक्षा तर गुन्‍ह्यातील सहआरोपी सोनी अनिल फुलमाळी (19) आणि मारी ऊर्फ मालनबाई सिनाप्‍पा फुलमाळी (50, सर्व रा. रा. संग्रामनगर, सातारा परिसर) यांची चांगल्या वर्तणुकीच्‍या हमीवर … Read more

वाहन भाडे थकल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

औरंगाबाद – वैजापूर तहसिल कार्यालयात चारचाकी वाहन भाड्याने दिले खरे; मात्र त्या कार्यालयाकडून भाडेच मिळेना. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने हतबल झालेल्या वैजापूर येथील वाहनमालक विलास लांडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. झाल्या प्रकारामुळे … Read more

शहरातील चिस्तिया कॉलनी परिसरात मध्यरात्री राडा; नगरसेवकासह सात जखमी

औरंगाबाद – शहरातील सिडको एन-6 भागातील चिस्तिया कॉलनी येथे अवैध बांधकामावरून बुधवारी मध्यरात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामध्ये एमआयएमचे माजी नगरसेवक अज्जू नाईकवाडी यांच्या भावासह दोन जण जखमी झाले. विरोधी गटाचे नासीर पटेल आणि अन्य चार जण जखमी झाले. तर दुसर्‍या घटनेत जुना मोंढा भागात होळीच्या निमित्ताने आयोजित जेवणाच्या कार्यक्रमात मान पाण्यावरुन वाद अधिक … Read more

डोके आपटून मित्रानेच घेतला मैत्रीणीचा जीव

औरंगाबाद – दोन फेब्रुवारीला बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्या महिलेचा तिच्या प्रियकरानेच खुन केला असल्याचे मुकुंदवाडी पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यात खून झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आरोपीविरोधात रविवारी खुनाचा गुन्हा नोंदवला. तसेच आरोपीला बेड्या ठोकण्यात न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस … Read more

ठेकेदाराने मजुराची डोके आपटून केली हत्या; कारण वाचून व्हाल थक्क

औरंगाबाद – कामाचे पैसे मागितले म्हणून ठेकेदाराने अमानुषपणे मजुराला मारहाण करुन त्याचे डोके जमिनीवर आपटले. त्यात गंभीर जखमी झालेल्या शौकत अब्बास शहा यांचा शनिवारी मृत्यू झाला. गुरूवारी संध्याकाळी सहा वाजता पीरबाजारात हि घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुभाष दगडु अंभोरे व राजु नाना केदारे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली. शौकत हे वीस वर्षांपासून … Read more