धक्कादायक ! टवाळखोराचा मुख्याध्यापकावर तलवारीने प्राणघातक हल्ला

औरंगाबाद – मुलींची छेड काढू नये असे समजावून सांगणाऱ्या मुख्याध्यापक व वसतिगृह अधिक्षकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहराजवळ घडली. कन्नड शहरा जवळील साखर कारखान्यासमोर आसलेल्या कर्मवीर काकासाहेब महाविद्यालयात ही खळबळजनक घटना आज घडली. या घडनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मुजीब जमील शेख असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली … Read more

नशा आणणाऱ्या औषधांचा मोठा साठा जप्त

Medicine Tablet

औरंगाबाद – नशेखोरंना विक्री करण्यासाठी चोरट्या मार्गाने विक्रीकरिता आणलेल्या गुंगीवर्धक नशेच्या गोळ्यांचा साठा, खोकल्याचा औषधीसहा उस्मानपुरा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तौफिक रफिक फारूकी (41, रा. ब्रिजवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, उस्मानपुरा परिसरातील झोपडपट्टीतील अल्पवयीन मुले तसेच शहरातील अनेकांना औषधी गोळ्या खोकल्याच्या औषधांचा नशेसाठी वापर करण्याचे व्यसन जडले आहे. … Read more

अनैतिक संबंधाच्या संशयावरून टोळक्याने तरुणाला भर रस्त्यावर भोसकले

औरंगाबाद – नातेवाईक महिलेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून टोळक्याने तरुणाला भररस्त्यावर भोसकल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री बाबा पेट्रोल पंप ते कार्तिक चौक या व्हीआयपी रस्त्यावर घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे त्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम दीपक बागुल असे 25 वर्षीय जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेली अधिक … Read more

दारु पिऊन कुटुंबाला त्रास देणाऱ्या भावाचा सख्या भावाने काढला ‘काटा’

murder

औरंगाबाद – दारू पिऊन कुटुंबाला त्रास देणाऱ्या भावाला मित्रांच्या मदतीने दोरीने गळा आवळून सख्या भावानेच खून केल्याची घटना जिल्ह्यातील सिल्लोड शहरात उघडकीस आली आहे. अमोल रोहिदास वानखेडे (24) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयत अमोलचा भाऊ गणेश रोहिदास वानखेडे (21) व मित्र सुमित विजय सुतार (21) यांना औरंगाबादेतून अटक केली आहे. याशिवाय तिसरा आरोपी … Read more

सराफा दुकानातून हिरेजडित बांगडी चोरणारी ‘ती’ बुरखाधारी महिला जेरबंद

औरंगाबाद – जालना रोडवरील एका सोन्या-चांदीच्या दुकानातून शनिवारी 1 लाख 42 हजार यांची हिरेजडित सोन्याची बांगडी लंपास करणाऱ्या बुरखाधारी महिलेला काल जिन्सी पोलिसांनी अटक केली असून, तिच्याकडून बांगडी जप्त करण्यात आली आहे. शबाना बेगम उर्फ शब्बो शेख जलील (30) असे आरोपी महिलेचे नाव आहे. जिन्सी पोलिसांनी सांगितले की, मलबार गोल्ड अँड डायमंड या सोन्या-चांदीच्या दुकानात … Read more

पोलीस पुत्रावरच विनयभंगाचा गुन्हा

crime

औरंगाबाद – शहरातील एमजीएम विद्यापीठातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची छेड काढल्या मुळे पोलिस पुत्राच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस पुत्राने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित विद्यार्थिनीच्या तीन मित्रांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा शनिवारी मध्यरात्री नोंदवण्यात आला. सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमजीएम विद्यापीठातील एक विद्यार्थी नितीन मित्रांसोबत चहा पिण्यासाठी एमजीएम … Read more

नवरीचे 36 लाखांचे दागिने पळवणारा अखेर अटकेत; लग्नाच्या मंडपात ‘अशी’ केली होती चोरी

औरंगाबाद – लग्नातून तब्बल 36 लाख 50 हजार रुपये किमतीचे दागिने ठेवलेली बॅग लंपास करणाऱ्यांपैकी एका चोरट्याला चिकलठाणा पोलिसांनी अकोल्यातून शनिवारी रात्री अटक केली. त्‍याला 7 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी आर. व्‍ही. सपाटे यांनी रविवारी दिले आहे. अभिषेक विनोद भानुलिया (वय 20, रा. जातखेडी, ता.पाचोर जि.राजगड, मध्‍यप्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या … Read more

15 वर्षांच्या मुलीच्या पर्समध्ये आईला सापडल्या गर्भनिरोधक गोळ्या, प्रेग्नन्सी किट; नंतर…

औरंगाबाद | बजाजनगर परिसरातील आईने सहजच आपल्या १५ वर्षीय मुलीची पर्स तपासली व त्यात गर्भनिरोधक औषधी व प्रेग्नसी किट पाहून तिला धक्काच बसला. विश्वासात घेत मुलीला बोलते केले तेव्हा तिच्यावर कधी प्रेमाआडून, तर कधी दहशतीने मागील दोन महिन्यापासून सतत शारीरिक आघात केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. आईने मुलीला सोबत घेत पोलीस ठाणे गाठून … Read more

औरंगाबादेत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद – बनावट नोटा छापणाऱ्या टोळीच्या मुसक्या पुंडलीकनगर पोलीसांनी आवळल्या आहे. उच्च शिक्षित सराईत आरोपी हुबेहुब बनावट नोटा तयार करायचा, मुकुंदवाडीतील रुम किरायाने घेऊन बिनबोभाट हा गोरखधंदा सुरु होता. पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. आरोपींच्या ताब्यातून 500, 100, 50 रुपयांच्या सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच बनावट नोटा तयार … Read more

अंत्यविधीसाठी निघालेली अंत्ययात्रा थेट ग्रामपंचायतीच्या समोर

pishor

औरंगाबाद – गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेवरून वाद होत असल्याने जागेची हद्द कायम करून द्यावी, या मागणीसाठी संतप्त होत नातेवाईकांसह समाजबांधवांनी पिशोर ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्ययात्रा रोखून ठिय्या दिला. जोपर्यंत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत अंत्ययात्रा येथून हलणारच नाही, असा पवित्रा घेतल्याने पिशोरमध्ये काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पिशोरमधील दिगर भागातील शांताबाई सूर्यभान खडके … Read more