नमाज सुरू असताना वाजवले भोंग्यावर गाणे, रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा !

bhonge

औरंगाबाद – राज्यातील भोंगा प्रकरणात वाद वाढतच असताना आता औरंगाबादेतही अशाच प्रकारच्या एका प्रकरणात रेल्वे पोलिस बलाच्या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल झाला अशी माहिती दिव्य मराठीशी बोलताना सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली. मज्जितच्या दिशने भोंगा लावून नमाज पठणावेळी गाणे वाजवत चिथावणीचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, किशोर … Read more

औरंगाबादेत 13 दिवस जमावबंदी लागू; राज ठाकरेंच्या सभेवर प्रशचिन्ह

Raj Thackeray

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येत्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या सभेला पाच दिवस शिल्लक राहिले असून अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही. दरम्यान, आता औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औरंगाबाद पोलिसांनी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशानुसार, … Read more

आता एका क्लिकवर भरता येणार मालमत्ता कर

औरंगाबाद – नागरिकांना आता एका क्लिकवर मालमत्ता कर भरता येणार आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मदतीने ‘नागरिक मोबाईल ॲप’ तयार केला आहे. त्याच बरोबर नागरिकांना त्यांच्या समस्यांची नोंद देखील या ॲपच्या माध्यमातून करता येईल. २६ एप्रिलपासून हे ॲप नागरिकांच्या सेवेत येणार आहे. शहरातील मालमत्तांचे आणि नळ जोडण्याचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात … Read more

पैठण एमआयडीसीतील मेट्रिक्स कंपनीत भीषण आग

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या पैठण एमआयडीसीतील मेट्रिक्स कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत मिथेल कंटेंनर ने आग पकडल्याने स्फोटासारखे आवाज येत असल्याचे तसेच नवीन प्लांट चे काम सुरूअसल्याने तसेच मिथेल कंटेंनरच्या मागेच असलेल्या पेट्रोलजन्य साठ्यास आग लागल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याठिकाणी आग लागली असल्याचा … Read more

नितिन गडकरींची मोठी घोषणा! औरंगाबाद – पुणे अंतर फक्त सव्वा तासात पार होणार

nitin gadkari

औरंगाबाद – औरंगाबाद ते पुणे प्रवास अवघ्या सव्वा तासांत पूर्ण करण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात आणण्याची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. औरंगाबाद – पुणे द्रुतगती मार्गावर 140 प्रतितास वेगाने वाहने धावू शकणार आहेत. या एक्सप्रेस-वे मुळे मराठवाड्याच्या विकासा मोठी गती मिळेल, असेही गडकरी म्हणाले. 2024 पूर्वी मराठवाड्यातील सर्व रस्ते … Read more

एका हातात पेट्रोल अन् दुसर्‍यात डिझेल.. कंबरेखाली गॅस सिलेंडर… तरुण शेतकरी जे बोलतोय ते एकदा ऐकाच

औरंगाबाद | हातामध्ये डिझेल व पेट्रोल ची बॉटल घेऊन अन् कमरेला गॅस सिलेंडर बांधून एक शेतकरी थेट डि.पी. वर चढल्याची घटना औरंगाबादेत घडलीय. अल्ला हो अकबर जय हनुमान..सबको उजाला दे भगवान असं म्हणत या तरुण शेतकर्‍यानं हटके अंदाजात आंदोलन केलंय. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात चांगलाच व्हायरल झालाय. युवा शेतकरी मंगेश साबळे यांनी फुलंब्री … Read more

आंदोलनाबाबतचे खटले 2 आठवड्यात निकाली काढा 

Aurangabad Beatch mumbai high court

  औरंगाबाद – सार्वजनिक हिताच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक व राजकीय पक्ष संघटनांनी केलेली आंदोलने तसेच मोर्चे काढले असताना दाखल झालेले खटले यात जीवितहानी झाली नाही व पाच लाखांपेक्षा अधिक च्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही असे खटले दोन आठवड्यात निकाली काढा या संदर्भातील प्रलंबित अर्ज प्रामुख्याने निकाली काढा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. … Read more

लसीचे बंधन नको, पुर्ण क्षमतेने वर्ग सुरू करा 

university

औरंगाबाद – वरिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन वर्ग न घेता जूनच्या मध्यापर्यंत ऑफलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. लसीचे दोन डोस बंधनकारक करणारी अट विद्यापीठाने मागे घेतली आहे. त्यामुळे डोस न घेतलेल्या किंवा एक डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची मुभा मिळणार आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून उच्च शिक्षण विभागाने 18 वर्षावरील विद्यार्थ्यांना लसीचे दोन … Read more

दिल्लीत कोरोना रुग्णांची वाढ; मनपा प्रशासन अलर्ट मोडवर

औरंगाबाद – कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून दिल्लीत वेगाने वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झाले असून, महाराष्ट्रात अद्याप साथीचा अंदाज नसला तरी शासनाने दिलेले लसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनापासून लस हीच बचाव असून, नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे. कोरोना संसर्गाची तिसरी … Read more

राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला वाढता विरोध

Raj Thackeray

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या 1 मेच्या सगळे विरोधात विविध राजकीय पक्ष संघटनांनी जिल्हाधिकारी पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन सभेला परवानगी नाकारण्याचे मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, ऑल इंडिया पॅंथर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, गब्बर एक्शन कमिटी निकाल निवेदने देऊन सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी केली. आंतर सेनेने जिल्हाधिकार्‍यांना … Read more