पैठण एमआयडीसीतील मेट्रिक्स कंपनीत भीषण आग

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या पैठण एमआयडीसीतील मेट्रिक्स कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

या आगीत मिथेल कंटेंनर ने आग पकडल्याने स्फोटासारखे आवाज येत असल्याचे तसेच नवीन प्लांट चे काम सुरूअसल्याने तसेच मिथेल कंटेंनरच्या मागेच असलेल्या पेट्रोलजन्य साठ्यास आग लागल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याठिकाणी आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

तसेच त्याठिकाणी कामगार अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.